प्रमोद शिंदे

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन* *जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

*उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ  येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन*
*जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ  येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन*
माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देताना आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे

   पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)    उत्तर प्रदेशातील हाथरस येथे नुकत्याच झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुक्त निष्पक्ष आणि निपक्षपाती तपास करून खटला जलदगतीने साठ दिवसात निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन  कुटुंबांना नैसर्गिक न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन माळशिरस तालुक्यातील प्रांताधिकारी तहसीलदार नातेपुते पोलीस स्टेशन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना  नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन डी एम जे ) संघटनेच्या वतीने देण्यात आले.       यावेळी .  या निवेदनामध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पीडित कुटुंबाला शेवटचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर पुरावा नष्ट करणे तिच्या शेवटच्या अंत्यसंस्काराचा अनादर करणे गैर कायदेशीररित्या बंदी करणे धमकी देणे पाडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे याकरिता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नियमानुसार कलम 3(1)r,s.,3(2)(5अ)’IPC 1860 च्या कलम 297,201,323,324,340,342,504,506, नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.  या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत.  या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे नेते  विकास दादा  धाईजे एनडीएमचे राज्य सचिव वैभव गीते, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,रणजीत कसबे,सचिन रणदिवे आदींच्या सह्या आहेत.

बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि.8 – आरे कॉलनीत मजुरी करणाऱ्या दाम्पत्यांच्या अवघ्या साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा अमानुष प्रकार करणाऱ्या पशुहून हीन वृत्तीच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा ; बलात्काराचे असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करुन कायद्याची जरब बसवावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.

आरे कॉलनीतील साडेचार वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या परिवाराची भेट घेऊन केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी रिपाइं तर्फे 50 हजार रुपयांची मदत केली जाहीर

आरे कॉलनी येथील युनिट नंबर 32 येथील साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांच्या आरे कॉलनीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली. अत्याचार पीडित मुलगी रुग्णालयात दाखल असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या परिवाराला रिपब्लिकन पक्षातर्फ़े 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; विजय कांबळे;धनराज; ऍड अभयाताई सोनवणे ; उषाताई रामळु आदी अनेक रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.

             

नातेपुते येथील समर्थ क्लीनिकल लॅबोरेटरीला कोविड -19 रॅपिड ऑंटीजन टेस्ट साठी अधिकृत मान्यता

  • नातेपुते येथील समर्थ लॅबोरेटरीला कोविड -19 रॅपिड ऑंटीजन टेस्टसाठी अधिकृत मान्यता
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे )- ज्ञादीप पॅरामेडिकल कॉलेज मधील समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी नातेपुते यास कोविड -19 रॅपिड अँटीजन टेस्ट प्रयोगशाळा म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली आहे, या प्रयोगशाळेचे उद्घाटन पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रि.पा.ई चे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन. के. साळवे , ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बावीसकर,आनंद लोंढे सर,प्रमोद शिंदे,मनोज राऊत,प्रशांत खरात संस्थेचे अध्यक्ष प्रा. ढोबळे एम. डी, प्रयोग शाळेचे संचालक डॉ.हनुमंत माने, आप्पा शेंडगे, इंजिनीअर कोडलकर साहेब आदी उपस्थित होते, यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. ढोबळे व प्रयोग शाळेचे संचालक डॉ. हनुमंत माने म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागातील गर्भवती महिला व इमर्जन्सी पेशंट यांना कोविड -19 रॅपिड अँटीजन टेस्ट करणेस बऱ्याचदा अडचणी निर्माण होऊ लागल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी व समाजसेवा या उदात्त भावनेने रॅपिड ऑंटीजन टेस्ट अधिकृत प्रयोग शाळेसाठी प्रस्ताव दाखल केला व त्याची अधिकृतपणे मान्यता मिळाले आहे माळशिरस तालुक्यातील ही पहिलीच अधिकृत प्रयोगशाळा आहे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रयोगशाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली .

माजी एस.आर.पी.पोलीस शिवाजी मिसाळ यांचे दुःखद निधन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शिवाजी नामदेव मिसाळ माजी एस.आर.पी.पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांनी सेवेत असताना चांगल्या प्रकारे काम केले आहे त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात तीन मुली व नातवंड असा परिवार आहे पत्रकार बाळासाहेब रणदिवे यांचे के सासरे होते. त्यांच्या जाण्याने परिसरात दुःख व्यक्त होत आहे.

हाथतरस बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या मुस्लिम आरक्षण संघर्ष संघर्ष समन्वय समिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने युपी हाथरस मध्ये दलित समाजातील मुलीवर जो आत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ व आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन माळशिरस तहसील कार्यालय येथे देण्यात आले त्यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य चे मिडिया प्रमुख-सलमान शेख शाहबाझ शेख, शौकत शेख, फिरोज मुल्ला, आफताब तांबोळी व आदि पदाधिकारी उपस्थित होते

शिंगणापूर घाटात वाहन चालकास आडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिंगणापूर घाटात वाहन चालकास आडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-फिर्यादी प्रकाश शामराव बोंद्रे राहणार निमसाखर बोंद्रे वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे त्यांचा दुधाचा टँकर यामध्ये दूध घेऊन कर्नाटक येथे येऊन परत दहिवडी शिंगणापूर मार्गे नातेपुते कडे येत असताना अज्ञात इसमांनी एक निळ्या रंगाची बिगर नंबरची कार आडवी लावून फिर्यादीला चाकु मारून जखमी केले व रोख रक्कम दहा हजार रुपये व एक मोबाईल जबरदस्तीने करून घेऊन गेले होते. त्याबाबत फिर्यादीने नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गु.र.न 277/ 2020 भादवि कलम 394,341,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत होते सदर गुन्ह्यातील तपास करीत असताना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक अरुण सावंत स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून तपासासाठी अनुषंगाने महत्वाची सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी नातेपुते पोलीस ठाणे कडील दोन तपास पथके नेमून गुन्ह्याचा तपास करीत होते गुन्ह्याचा तपास करत असताना वापरलेली निळ्या रंगाची मारुती कार संशईत रित्या फिरत असताना दिसून आल्याने ती कार ताब्यात घेऊन कारमधील इसमाला नाव विचारले असता त्यांनी आपले नाव गदर अशोक भोसले,शिवाजी रामदास मदने, समीर भारत जाधव, राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे असलेले वाहना बाबत चौकशी केली असता सदर वरील गुन्हा केल्याची कबुली देऊन इतर आरोपी महावीर सुखदेव खोमणे, रणजीत उर्फ पप्पू कुंडलिक बोडरे,दोघे राहणार चंद्रपुरी तांबेवाडी तालुका माळशिरस येथील प्रदीप उर्फ सोन्या मदने,रोहित बाबू भोसले दोघे राहणार तावशी तालुका इंदापूर सर्वांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी पाच जणांना अटक करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे व हा गुन्हा सात आरोपीने केल्याने भादवि कलम 395 कलम वाढवून अटक आरोपींना न्यायालयात पी सी आर करीता हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे करीत आहे सदरचा गुन्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक अरुण सावंत स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज खाडे, पो.हे.कॉ अनिल गडदे,रामलिंग कदम,अजित कदम, असलम काझी, पोलीस नाईक महेश पाटील,पो.कॉ.राकेश लोहार, अमित जाधव, तानाजी मुटकुळे, विशाल घाडगे, शाहू
काळदाते, दत्ता काटे सायबर शाखेचे रवी हातकिले यांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासात पोलिस आधिक्षक योगेश कुमार यांचा कार्यकाल सुवर्न आक्षरांनी लिहिला जाईल…. जगदिप दिपके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोलीजातिच्या नावावर शिक्षनात व नौकरित सवलत घेउन चांगल्या पदावर गेल्यावर सर्व विसरतात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते मोक्याच्या जागा जिंका म्हनजे सर्व बहुजन समाजाला न्याय मिळेल पन आज कित्येक अधिकारी आसे आहेत ते मोक्याच्या जागा जिंकुन देखिल आत्याचार ग्रस्तांना न्याय देन्यास त्यांची कार्यकृती कुचकामी ठरते,
इंग्लिश आनी हिंदी भाषेवर प्रभुत्व आसलेले योगेश कुमार साहेब अतिशय संवेदनशील आसुन त्यांचा आवडता छंद पुस्तक वाचने हा आहे,
कोनताही आन्याय आत्याचार ग्रस्त व्याक्ती पोलिस आधिक्षक योगेश कुमार साहेबांना भेटला आसता आत्याचार ग्रस्तांचे सर्व म्हनने ऐकुन घेउन लगेच सम्बंधित डि वाय एस पी किंवा पोलिस निरिक्षकांना सुचना देउन पिडितांना ईमान ईतबारे न्याय देन्याचं काम मा. योगेश कुमार साहेबांनी त्यांच्या तिन वर्षाच्या कार्यकाळात केले आहे, तसेच आन्याय आत्याचार होउच नये म्हनुन योग्य उपाययोजना करनारे अधिकारी म्हनजे योगेश कुमार साहेब…
संपुर्न जिल्ह्यामध्ये नॅनक्रप्टेट आधिकारी म्हनुन योगेश कुमार साहेबांची ओळख आहे….
आनुसुचित जाती जमाती च्या नागरिकाना पोलिस स्टेशन ला गेल्या नंतर त्यांना चांगली वागनुक मिळाली पाहिजेल, पोलिसांना तक्रार नोंदवन्यासाठी टाळाटाळ करू नये, पोलिसांनी पिडितांना जय हिंद म्हनावं, आत्याचार ग्रस्तांना बसन्या साठी सुवेवस्थित आसलेली खुर्ची द्यावी, त्यांना स्वच्छ ग्लास आनी त्या ग्लासामध्ये पिन्यासाठी स्वच्छ पानी द्यावं आशा सुचना जिल्ह्यातिल सर्वच पोलिस सस्टेशनला मा. योगेश कुमार साहेब यांनी दिल्या होत्या, एका ही आत्याचार ग्रस्त पिडित व्याक्तीचे पोलिस अधिक्षक योगेश कुमार साहेबांना भेटल्यावर समाधान झाले नाही असा एक हि पिडित शोधुन सुद्धा भेटनार नाही,
पोलिस स्टेशन ला गेल्या नंतर आत्याचार ग्रस्तांची तक्रार नोंदवन्यास पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी टाळाटाळ करत आसल्यास आगदी पोलिस अधिक्षक साहेब यांना फोन जरी केला तरी पिडितांचा गुन्हा दाखल करन्याच्या सुचना पोलिस स्टेशन ला देउन निष्ठेनं आत्याचार ग्रस्तांना न्याय देन्याचं काम मा. पोलिस अधिक्षक साहेब यांनी त्याच्या आज पर्यंतच्या कार्यकाळात केलं आहे…

हिंगोली जिल्ह्यातिलच नाही तर संपुर्न महाराष्ट्रातिल आरोपिवरती वचक राहावी यासाठी एकमेव कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक योगेश कुमार साहेबांसारखा आधिकारी या जिल्ह्याला या परिक्षेत्राला पुन्हा मिळनार नाही,
आरोपिचे मनोबल बाढु नये, आरोपीने पुन्हा अॅक्ट्रोसिटी सारखा गंभीर अपराध करू नये म्हनुन आरोपिंच्या तडिपारी पासुन ते त्याच्या मालमत्ता जप्ती चे आहवाल विषेश न्यायालयात पाठवन्याचे प्रयोजन करनारा एकमेव सच्चा पोलिस अधिक्षक योगेश कुमार साहेब यांचा कार्यकाल हिंगोली जिल्ह्याच्या ईतिहासात सुवर्न आक्षराने लिहिला जाईल…
योगेश कुमार साहेबा सारखे काम करने या आगोदर एका ही आधिकार्याला जमले नाही, आनी या नंतर देखिल त्यांच्यासारखं काम ईत्तर आधिकारी करतिल हे शक्य नाही मात्र योगेश कुमार साहेबांनी करून ठेवलेल्या कामा मुळे येनार्या आधिकार्याला देखिल चांगले कामे करावेच लागतिल यात शंका नाही, एकंदरित विचार केला तर योगेश कुमार साहेब म्हनजे वर्दितिल देव मानुस आहेत आसं म्हनटलं तरी वावग ठरनार नाही… आज त्यांची हिंगोली जिल्ह्यातुन बदली झाली आहे पन नक्किच हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासात योगेश कुमार साहेबांचे नाव सुवर्न आक्षराने लिहिले जाईल त्यांची कमी या जिल्ह्या नेहमिच जानवेल साहेब आपल्या सारखे पोलिस अधिक्षक महाराष्ट्रातिल प्रत्येक जिल्ह्याला लाभावेत योगेश कुमार साहेबां सारखं काम कुनी या अगोदर केलं नाही आनी म्हनुनच आमचा त्यांना सलाम
आहे……

सरकारला निधी वळवण्यासाठी फक्त आमचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागच का दिसतो?…वैभव गिते.

अनुसूचित जातीतील 59 जातींच्या प्रगतीचा निधी महाविकास आघाडीच्या सरकारने दिं.24 सप्टेंबर 2020 च्या शासननिर्णयाद्वारे वळवला

सरकारला निधी वळवण्यासाठी फक्त आमचा सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागच का दिसतो?……वैभव गिते.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अनुसूचित जातींमध्ये एकूण 59 जातींचा समावेश आहे.सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी वेगवेगळ्या लेखाशीर्षाअंतर्गत हा अर्थसंकल्पित निधी वित्त विभागाच्या परवानगीने प्रत्येक वर्षी खर्च करावा लागतो.अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या योजनेचा निधी खर्च करण्याचा राहून गेला तर तो आखर्चित निधी पुन्हा पुढच्या वर्षी खर्च करता येतो मार्च 2020 पासून अनुसूचित जातींच्या प्रगतीसाठी असणारा निधी शासनाने जिल्ह्यांना योजना अंमलबजावणी साठी वर्ग केलेला नाही.
त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हा निधी इतर विभागांना वळवेल असा संशय नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी व्यक्त केला होता त्याबाबत विविध वर्तमान पत्रात बातम्या आल्या होत्या सोशल मीडियावर सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारवर अक्षरशः टीकेची झोड उठली होती.
सामाजिक न्याय व विशेष सहायय योजनेच्या दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सण 2018-19 या आर्थिक वर्षाचा निधी सण 2020-21 च्या अर्थसंकल्पीय निधीतून वितरित करणेबाबत कार्यासन अधिकारी यांच्या सहीने वर्ग झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भाधिन क्रमांक 5 येथील प्रस्तावास अनुसरून सन 2018- 19 या वर्षातील अखर्चित निधी करिता सन 2020-21 करिता अर्थसंकल्पीय तरतुदीतून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांच्या करीता केंद्र व राज्य यांचा एकत्र मिळून एकूण 1070.67 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वर वितरित करण्यात आलेला आहे.
प्रत्येक वेळी कोणतेही सरकार असले तरी ही दुर्बल घटकांसाठी असणारा सामाजिक न्याय विभागाचा निधी जाणून-बुजून अखर्चित ठेवला जातो व खर्ची ठेवलेला निधी इतर विभागांसाठी वळवला जातो महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना यासाठी वारंवार आंदोलने करत असतात व निधी वळू नये म्हणून तेलंगणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बजेटचा कायदा करावा अशी मागणी जोर धरते परंतु ही मागणी प्रत्येक संघटना वेगळी करते एकत्र येऊन जनआंदोलन उभा करून ही मागणी केल्यास यात सर्व संघटना यशस्वी होऊ शकतात अन्याय अत्याचाराचे मूळ हे बजेटच्या कायद्यामध्ये लपलेले आहे गरिबांना अधिक गरीब करून हे सरकार मनमानी कारभार करून राज्य करत आहे ही एक प्रकारची हुकुमशाही आहे याचा आम्ही निषेध करतो आणि पुन्हा एकदा दलित आदिवासींचा अनुसूचित जाती जमातींच्या हक्कासाठी असलेला निधी सरकार दे इतर विभागांच्या योजनांचा साठी वळवू नये अखर्चित ठेवू नये यासाठी बजेटचा कायदा करावा अशी आम्ही मागणी करीत आहोत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे हे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत स्वर्गवासी पतंगराव कदम यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजीत कदम हे राज्यमंत्री आहेत हे दोन्ही मंत्री अनुसूचित जातीचा नीधी वळवू नये म्हणून बजेटचा कायदा करण्यासाठी अनुकूल व संवेदनशील नाहीत तसेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)या पक्षाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुद्धा ही गंभीर बाब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून देताना दिसून येत नाहीत.विरोधी पक्षात बसलेले पक्ष व त्यांचे नेतेही यासाठी विधानभवनात तसेच विधानपरिषदेच्या सभागृहात आमदार अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी लावत नाहीत
बौद्ध दलित आदिवासी अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा प्रगतीचा निधी अखर्चित ठेवू नये वळवू नये यासाठी बजेटचा कायदा करावा म्हणून राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेतर्फे हे मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत वैभव गिते यांनी माहिती दिली

मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या..*”अल्पवयीन शाळकरी चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशी होण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटणार–वैभव गिते”

मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या.. एन डी एम जे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दौंड प्रतिनिधी
दिनांक 26 सप्टेंबर 2020 रोजी कालिदास ईश्वर ताकवणे रा.पारगाव (सालू-मालू) ता.दौंड याने फरसान खाण्याच्या बहाण्याने मराठा समाजातील अल्पवयीन इयत्ता 6 वी मधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे.ही चिमुकली अजून घरी का येत नाही म्हणून पीडित मुलीची आई व आज्जी मुलीचा शोध घेत होते तेवढ्यात मुलीचा ओरडण्याचा व रडत असल्याचा आवाज ऐकू आला पीडिताने तिच्यासोबत घडलेली सर्व घटना आज्जीला सांगितली याबाबत मुलीची आजी यांनी यवत जी.पुणे या पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने भा.द वि 376 व बाललैंगिक अत्याचार अधिनियम (पोस्को ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे यवत पोलीस स्टेशन चे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कापुरे यांनी आरोपीस तात्काळ अटक करून महत्वपूर्ण पुरावा प्राप्त केला आहे.या घटनेची माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादा जाधव यांना मिळताच त्यांनी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांना सर्व हकीकत सांगितली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव. एम.डी. एम. जे पुणे जिल्हा निरिक्षक पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासानी. यशवंत वाघोले अमर जोगदंड. गावचे ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर साबळे .पोलिस मित्र रमेशजी चितारे यांनी पारगाव (सालू-मालू)या गावात पीडित कुटुंबांच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.घटनेची संपूर्ण माहिती घेतली कुटुंबाने व पीडित मुलीने सांगितलेली घटना ऐकताच राज्य सचिव वैभव गिते यांनी घटनास्थळावरूनच सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कडक कारवाई साठी फोन वरून चर्चा केली.पोलीस अधिकारी यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले याप्रकरणी एक बाब अधोरेखित झाली ती म्हणजे अल्पवयीन इयत्ता सहावी मधील मराठा समाजातील शाळकरी मुलीवर मराठा समाजातील लिंगपीसाट समाजाला कलंक असणाऱ्याने बलात्कार केला तरीसुद्धा एकही मराठा संघटनांनी या मराठा समाजातील पीडित कुटुंबास मदत केली नाही साधा निषेधही नोंदवला नाही परंतु नेहमीप्रमाणे कर्तव्यदक्ष एन.डी.एम.जे टीम ने या कुटुंबास शेवटपर्यंत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे दौंड शहरातील दादासाहेब जाधव व पांडुरंग गाडेकर यांनी पीडित कुटुंबास आधार दिला लवकरच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व राज्य महिला आयोगाची भेट घेणार असल्याचे राज्याचे नेते वैभव गिते साहेबांनी सांगितले तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र सचिव दादासाहेब जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली

पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती साजरी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –पिरळे तालुका माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालय व भिवाई देवी जुनियर कॉलेज येथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली covid-19 कोरणा प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय शाळा बंद आहेत परंतु शालेय कामकाज सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पिरळे येथे साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन महादेव शिंदे मुख्याध्यापक नानासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे उद्योजक प्रमोद डूडू सामाजिक कार्यकर्ते नाथा लवटे गणेश दडस संजय ठोंबरे भाऊसाहेब शिंदे सर व बंडू पवार इत्यादी उपस्थित होते.

पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती साजरी

You may have missed