प्रमोद शिंदे

पिरळे येथे गँगवार लोखंडी गज व तलवारीने हाणामारी,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*

पिरळे येथे गँगवार,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) मौजे पिरळे(ता.माळशिरस) दि.२१ जून रोजी सकाळी १०.३०वा येथील राजेश नाथा दडस व नवनाथ तांबीले ( दोघेही रा.पिरळे, ता. माळशिरस ) हे दोघे चव्हाणवाडी (बांगार्डे) येथील बिरोबा देवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.या ठिकाणी त्यांच्यावर सहा जणांनी नातेवाईकांना झालेला मारहाणीचा वादाचा राग मनात धरून तलवारी व लाठया काठ्यानी वार करून‌ गंभीर जखमी केले घटना घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर हकिकत अशी‌ की; सुरुवातीला अण्णा बुधावले व तुकाराम लवटे यांच्यात भांडणे झाले असतात त्यानंतर दत्तू लवटे,तुकाराम लवटे,बापू लवटे, नाथा लवटे ,नाना लवटे,यांनी शिवनेरी हॉटेल समोर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अण्णा बुधावले व अंकुश चव्हाण यांना लोखंडी गज व काठीने मारहाण केली त्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू आहेत यासंदर्भात नातेपुते पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी चव्हाणवाडी येथील बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या राजेश दडस ,नवनाथ तांबीले यांना सचिन विठ्ठल बुधावले, दिपक विठ्ठल बुधावले, बिरू बिट्टू बुधावले ,राजू भाळे, शंकर बोडरे, अमोल जाधव,या इसमानी दुचाकीवरून येवुन तुमचे नातेवाईक दत्तू लवटे यांनी, आमचे नातेवाईक सुकुमार उर्फ अण्णा बुधावले ,अंकुश चव्हाण यांना का मारहाण केली यांचा जाब विचारत हल्ला करत राजेश दडस व नवनाथ तांबीले यांच्यावर या सहा इसमांनी तलवारीने व लोखंडी पाईप तसेच लाठी काठीने जोराचे वार केले .यामध्ये राजेश व नवनाथ दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत . नातेपुते पोलीस स्टेशन येथे राजेश‌ नाथा दडस यांनी या सहा इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा रंजि.नं १८५ /२० भा.द.वि कलम ३०७,५०४,५०६, १४३,१४७,१४९तसेच शस्त्र अधिनियम मु.का १३५ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.घटनेतील सर्व संशयित आरोपी फरार असून .सदर घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय युवराज खाडे करीत आहेत. या घटनेमुळे पिरळे आणि परिसरातील वातावरण दहशतीचे निर्माण झाली आहे तसेच पिरळे ग्रामस्थांकडून कायम शांतता राहण्यासाठी पिरळे येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी करण्यात यावी व येथील अवैद्य दारूचे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच एका महिन्यामध्ये कलम 307,326,324 ॲट्रॉसिटी सारखे गंभीर प्रकारचे सात गुन्हे दाखल झाले असून येथील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेळीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात यावी व शांतता कमिटीची बैठक घेण्यात यावे या संदर्भात ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

नातेपुते महावितरण च्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा

नातेपुते महावितरण च्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा

नातेपुते (प्रमोद शिंदे )-
एक शिव तालुका माळशिरस येथे लाईट जोडणे संदर्भात अमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडी एकशिव आयु दिपक अशोक झोडगे निकेतन साळवे व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे की मौजे एकशिव नविन गावठाण येथे गेली 25 वर्षे नविन गावठाण लोक वस्ती आहे .येथे एकशिव वाँटर सप्लाय डि,पी कडुन लोकवस्ती साठी लाईट सप्लाय हा कित्येक दिवसापासुन होत आहे. नविन गावठाणात अनेक अधिकृत कनेक्शन आहेत परंतु गावठाण लोक वस्तीसाठी शेप्रेट असा गावठाण डि.पी नाही शेतीच्या डिपी वरुनच लाईट लोकवस्तीला मिळत आहे.तरी या लोकवस्तीत अधिकृत अनेक लाईट कनेक्शन असताना सुध्दा शेती लाईट डि,पीनेच लाईट सप्लाय होत आहे.या शेती डिपीवर अनेक शेतीपंप मोटारी आहेत व सोबत एकशिव ग्रामपंचायत पाणी पुरवठा व करलवस्ती म्हणून 1100 लोकवस्ती याला जोडली आहे.व शेती लाईट फिडर वेगळा आहे त्यामुळे या डिपीवर जादा लोड आहे म्हणून गेले 15 दिवसतर नविन गावठाण एकशिव या ठिकाणी लाईटच नाही तरी आम्ही आमच्या लोकवस्तीसाठी एकशिव गावातील नागरिक सध्या एकशिव गावठाण लगत कित्येक दिलस बसवलेल्या नविन डि पी गावासाठी पण जोडला नाही त्यातुन जुन्या गावठाण गावाला व नविन गावठाण लोक वस्तीला दोन लाईट पोल टाकुन लाईट तारा जोडणे बाबत मागणीसाठी नातेपुते कार्यालयासमोर दि.22-06-2020 रोजी दुपारी 12 पासुन अमरण उपोषण करत आहोत. तसेच आमच्या हक्काच्या लाईट ची तातडिने सोय होई पर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार आहोत. अशा आशयाचे अनिवेदन
पालकमंत्री सोलापूर जिल्हा ,तहसिलदार माळशिरस .विधानपरिषद आमदार,विधानसभा आमदार,पं स.माळशिरस सभापती. उपसभापती. मुख्य अभियंते अकलुज.ग्रामपंचायत एकशिव

चीनला धडा शिकविण्यासाठी चीनमधून कोणतीही सामुग्री निर्यात करू नका;चिनी मालावर बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  

चीनला धडा शिकविण्यासाठी चीनमधून कोणतीही सामुग्री निर्यात करू नका;चिनी मालावर बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई( प्रमोद शिंदे) दि. 18 – चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्यांनी लडाखच्या गलवाण मध्ये भारतीय सैन्यावर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो.चीन ला धडा शिकविण्यासाठी एकदा चीनशी आरपार चे युद्ध लढले पाहिजे तसेच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.त्यासाठी भारतीयांनी चीनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार उद्योग जगातला माझे नम्र निवेदन आहे की चीन मधून कोणत्याही प्रकारच्या सामुग्री ची निर्यात करू नका ; चीन मधून मालाच्या इम्पोर्टवर बंदी आणावी; निर्यातबंदी कारावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

लडाख च्या गलवाण भागात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने कपटबुद्धीने नियोजन करून धोका देत क्रूर हल्ला केला. हा हल्ला भ्याड हल्ला होता. चिनी हल्ला भारतीय सैनिकांनी परतवून लावता आपले शौर्य सिद्ध केले. या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले.त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीन धोका देत राहून युद्धाची खुमखुमी दाखवीत असेल तर एक दिवस आरपार चे युद्ध लढून चीन ला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे. असा ईशारा ना रामदास आठवले यांनी दिला आहे.

         

महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

’ महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क देविदास माने सोलापूर प्रतिनिधी

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे हरविलेले एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शोधून ज्यांचे आहेत त्यांना परत करण्यात आले. ही घटना गुरुवारी अक्कलकोट शहरामध्ये दुपारी 01:00 वाजे च्या दरम्यान घडली.

चांगुबाई श्रीमंत राठोड राहणार-बोरोटी ता अक्कलकोट यांनी ‘ अक्कलकोट शहरातील सोन्याच्या दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र, कानफुले पैंजण,जोडवे, असे एक लाख आठहजार किंमतीचे खरेदी केलेले ‘सोने – चांदीचे’ दागिने खरेदी केले होते. घाई गडबडीत मुख्य रस्त्यावर कुठे तरी पडून ते दागिने हरवले आहेत असे सांगत सदरची महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. सदर घटनेचे ‘ गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी यांनी ‘तात्काळ डी बी पथकातील पोना चिंचोळकर , पोका राठोड,पो कॉ शिंपाळे यांना मुख्य बाजार पेठेत पाठवले. सदर कर्मचारी यांना आजूबाजूच्या ‘सिसिटीव्ही’फुटेज पाहून चंद्रकांत कटारे यांच्या दुकानात चौकशी केली असता कटारे यांनीही सदरचे सोने-चांदीचे दागिने’ सापडले आहेत. असे प्रामाणिकपणे कबूल केले. त्याबद्दल पो निरीक्षक पुजारी यांनी ‘ चंद्रकांत कटारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून ज्या महिलेचे सोने-चांदी हरवले आहे.

त्यांनाही पोलीस ठाण्यास बोलावून सोने चांदीची खात्री करूनच सुपूर्त करण्यात आले. त्यावेळी त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान सर्वाना खुपच आनंद देऊन जाणारे होते. उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याच्यां सतर्कतेमुळे एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोने चांदी दागिने परत मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचें नागरिकातून अभिनंदन केले जात आहे.

वाशीम येथे एनडीएमजे च्या वतीने जीवनावश्यक वस्तू चे वाटप…

वाशीम येथे एनडीएमजे च्या वतीने जीवनावश्यक वस्तू चे वाटप…
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (वाशिम)-


नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव तथा सदस्य आंतरजातीय विवाह मसुदा समिती व आकस्मिकता योजना मसुदा समिती चे मंत्रालयीन सदस्य मा एड डा केवल ऊके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सहसचिव पी एस खंदारे यांच्या नेतृत्वात आणि एनडीएमजे चे विदर्भ विभागीय समन्वयक डाॅ. रामकृष्ण कालापाड, जिल्हा संघटक रामदास वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण सरकटे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत गवई,जिल्हा कोषाध्यक्ष कुसुमताई सोनुने, मालेगाव तालुका अध्यक्ष महादेव कांबळे, मालेगाव तालुका सहसचिव विश्वास कांबळे, मालेगाव तालुका प्रतिनिधी अर्जून लबडे, मोहन पठाडे यांच्या हस्ते अत्याचार पिडीत व गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले या मध्य वानखेडे नगर वाशिम येथील पाच कुटुंबाला तर झोडगा बु. येथील दहा कुटुंबाला आणि झोडगा खुर्द येथील अकरा कुटुंब असे एकूण सव्वीस कुटुंबाला प्रत्येकी एका कुटुंबाला अन्नधान्याची किट जीवनावश्यक वस्तू दिल्या गेल्या विविध प्रकारचे वस्तू वाटप केल्याने पिडीत कुटुंबाच्या चेह-यावर खुप मोठे समाधान व आनंद दिसुन आला.
प्रारंभी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य सहसचिव पी एस खंदारे यांनी कोरोणा व्हायरस च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पावसाळ्यात संसंर्ग व साथरोग संदर्भात सुरक्षितता पाळून कुटुंबाला आजारापासुन वाचविण्यासाठी माहिती दिली व काय उपाययोजना करायला पाहिजे या बद्दल मार्गदर्शन केले.
या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे मालेगाव तालुका व स्थानिक कार्यकर्ते गौतम गवई, विश्वास कांबळे, रमेश ताजणे, कांशीराम गवई, भीमराव गवई, कमलाबाई अडांगळे, मैनाबाई गवई, सुलाबाई ताजणे, अनिता गवई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी एनडीएमजे च्या कामाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे

प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नातेपुते प्रतिनिधी..
कोरोना covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आहे या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे महाराष्ट्र शासनाने टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे व पालकांवर शिक्षकांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने covid-19 विषाणूचा संसर्ग जलदगतीने विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या व सर्वच प्रकारच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा काढावा यासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम अटी ठेवू नयेत.आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक आहे.
काही ठिकाणी डिजिटल वर्ग सुरू झालेत परंतु लाखो विद्यार्थी गरीब असल्यामुळे त्यांच्या कडे लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट अशी अद्ययावत साधनसामग्री नसल्यामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे राज्य शासनाने सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे आणि मगच डिजिटल शिक्षण पद्धती सुरू करावी देशात लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही हे कामकाज सुरू करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना covid-19 विषाणूचा संसर्ग खासदार व आमदारांना होऊ नये म्हणून खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे अशी परिस्थिती असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय आत्मघाती निर्णय होऊ शकतो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता वर्ग अपुरे पडू शकतात योग्य फिजिकल डिस्टन्स ठेवता येणार नाही अगोदरच विद्यार्थ्यांची संख्या जास्त व बसण्याची क्षमता व वर्ग कमी आहेत ही सत्यता आहे.
त्यामुळे सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचा एक कोटी रुपयांचा विमा काढून प्रत्येकास लॅपटॉप कॉम्प्युटर व इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे सर्व प्रतिबंधात्मक सोयी सुविधांच्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात शासनाने योग्य उपाययोजना न करताच शाळा सुरू केल्यास प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्यास आणि सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांबाबत कोरोना covid-19 विषाणू संसर्गाबाबत अनुचित घटना घडल्यास त्यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असेल
असे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्या नेतृत्वात माळशिरस प्रांत अधिकारी शमा पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, सौरभ वाघमारे,धनाजी शिवपालक,संभाजी साळे हे उपस्थित होते.निवेदनाच्या प्रती शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत अशी माहिती एन.डी.एम.जे चे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांनी दिली आहे

* दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून60 गरजूंना केली मदत*

* दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून60 गरजूंना केली मदत*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- शिवपुरी तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते एन डी एम जे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गरजूंना केली मदतलॉकडाउनच्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही त्यामुळे मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात घेता शिवपुर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी विकास दादा धाइंजे व एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब साठ शेती महामंडळातील कामगारांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे स्वतःच्या वाढदिवसाचा होणारा वायफळ खर्च टाळून गरजूंना मदत केल्यामुळे परिसरात दत्ता कांबळे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा मास्क सानेटायझर जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग नियम पाळणे करण्यात आला. यावेळी माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाईंजे,एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गीते,  पत्रकार प्रमोद शिंदे, श्रीकांत बाविस्कर, सुनील गजाकस, विलास भोसले, प्रशांत खरात, शहाजी धायगुडे. कार्यकर्ते उपस्थित होते. 

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे)- कृषी अधिकारी शिवलाल गेना कांबळे हे कृषी खात्यातून कृषी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले असल्याने पिरळे येथील अर्जुन नगर येथे प्रमोद भोसले मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला शिवलाल कांबळे हे इंदापूर तालुक्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी व मित्र परिवाराने त्यांना प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच पिरळे येथे ही त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी साई उद्योग समूहाचे मॅनेजर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोसले,मित्रपरिवार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक नातेपुते मॅनेजर बबन गुलाब धाइंजे उपस्थित होते.

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा सपत्नीक पिरळे येथे सत्कार

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -( प्रमोद शिंदे)- कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी 15 जून 2020 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे.
आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिकपणे काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने आश्वासने देऊन शासनामार्फत व प्रशासनामार्फत या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली ,कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड-१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला आहे. कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत असतांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, शासनाने समान काम समान वेतन याची घोषणा केली आहे परंतु यावर शासनाने कसल्याही प्रकारचे वेतन वाढ कर्मचाऱ्यांना दिली नाही .शासनाला आमची गरज नसल्यास, आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसुन येत आहे.
आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १७००० रिक्त पदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे मा. आरोग्यमंत्री साहेबांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचारी मध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळली आहे. पत्र संदर्भ क्र ४ व ५ नुसार राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतलेली नसल्यामुळे दि.१५/०६/२०२० पर्यंत शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी दि.१५ जुन २०२० पासुन महासंघाकडुन राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच या आंदोलनात जे काही नुकसान होईल यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन शासनाला कंत्राटीी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष नंदू कासार व संघटने च्या पदाधिकारी यांनी दिले आहे .शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभरातून करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

प्रांतअधिकारी यांच्याकडून हनुमान गणेशउत्सव मंडळ नातेपुते यांचे कौतुक

प्रांत अधिकारी यांच्याकडून हनुमान गणेश उत्सव मंडळ नातेपुते यांचे कौतुक
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)-Covid-19 प्रादुर्भाव कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते शहरातील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ, मंडईचा राजा नातेपुते.यांनी लॉकडाउन च्या काळात गरजू लोकांना अन्नदान केले, लॉकडाउन च्या काळात माणसा पासून माणसं दूर असताना आमच्या मंडळांनी माणुसकीच्या नात्याने सर्वांना एकत्र येऊन नातेपुते येथील नागरिकांच्या सहकार्याने घरपोच अन्नदान सेवा करण्यात आली या कामाची दखल घेत प्रांत अधिकारी शमा पवार मॅडम यांनी हनुमान गणेशोत्सव मंडळ नातेपुते यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक केले आहे. प्रशासनाने घेतलेल्या सामाजिक कामाच्या दखल मुळे मंडळातील कार्यकर्ते प्रोत्साहित झाले असून यापुढेही असेच सामाजिक बांधिलकी ठेवून काम करू से आश्वासन मंडळातील कार्यकर्त्यांनी दिला आहे तसेच त्यांनी नातेपुते येथील अन्नदाते यांचे आभार व्यक्त केले आहेत. हा उपक्रम पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.

You may have missed