प्रमोद शिंदे
नातेपुते नगरीमध्ये तरुणांनी राबवला अनोखा उपक्रम!!!
*नातेपुते नगरीमध्ये तरुणांनी राबवला अनोखा उपक्रम!!! पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपूते (प्रमोद शिंदे)-सध्याच्या कोरोनाच्या भयानक परिस्थिती बर्याच गोरगरीबांना, कामगार वर्गाला काम नसल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि याचाच विचार करुन नातेपुते मधील चार-पाच तरुणांनी एकत्र येऊन गावातील अशा गरजू लोकांची यादी केली व त्यांना स्वखर्चाने घरपोच जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. दोन-तीन दिवसांतच त्यांना गावातील बर्याच तरुणांनी साथ देऊन हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरुवात केली. गावातील सधन कुटुंबांनी त्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली.आज हे तरुण रोज सायंकाळी ४००ते ४२५ लोकांना एक भाकरी, वेगवेगळी भाजी व ठेचा या स्वरुपात जेवण घरपोच करतात.या भयावह परिस्थिती मध्ये गरजूंना मायेचा एक घास देऊनमाणूसकी जपण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे हा उपक्रम या तरुणांनी *समस्त ग्रामस्थ नातेपुते* या नावाने राबवला आहे म्हणजे याचे श्रेय या तरुणांनी स्वता: किंवा कोणत्याही एकाच व्यक्तीला किंवा एकाच मंडळाला दिलेले नाही.या उपक्रमासाठी खालील दानशूरांनी आर्थिक मदत केली.अन्नदाते* -हनुमान गणेश मंडळ,श्री अमोल (अध्यक्ष) कुंडलिक उराडे,श्री प्रितम शिरीन दोशी,श्री हितेश हुकुमचंद दोशी,श्री मंदार शशिकांत देशपांडे,श्री रुपेश लक्ष्मीकांत इंगोले, रत्नत्रय परिवार सदशिवनगर संस्थापक श्री अनांतलाल रतनचंद दोशी, श्री महावीर जिवनचंद दोशी, श्री शितलकुमार माणिकचंद दोशी,स्वामी विवेकानंद गणेशोत्सव मंडळ,श्री सखाराम महादेव भिसे,प्रितम ट्रेडिंग कंपनी,१२ शास्त्र २००८ बॅच डॉ बा.ज. दाते प्रशाला, चि.भाविक जितेश शहा, कु जुई व योगेश सुरेश कुलकर्णी,श्री सुधीर – जितेंद्र जिवांधर दोशी,हर हर महादेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते हिंदु खाटीक समाज नातेपुते,श्रीराम सेल्स पटेल बंधू,श्री प्राजाल मदनकुमार दोशी,श्री शहाजीराव उर्फ बाबाराजे मुधोजीराव देशमुख,श्री माणिक (भाऊ)उराडे,श्री करीम रमजान शेख,श्री चांद महबुब काझी, चि ध्रुव अभिजीत दोशी,श्री जवाहर रघुनाथ इंगोले,विपुल ट्रेडिंग कंपनी,श्री मुबारक कासिम शिकलगार (गुरुजी),श्री राजेन्द्र तुकाराम भिसे,श्री दिलीप चानविरप्पा मुंजी,अहिल्यादेवी पथसंस्था नातेपुते,श्री अतुल(बापू) पाटील व श्री संदिप (दादा) ठोंबरे मित्र मंडळ,श्री सदाशिव शंकर पिसे गोरेगाव मुंबई,DK Electricals Natepute,चांगण व पिसे परिवार,श्री गणेश कुंडलिक उराडे (बापू), *विशेष सहकार्य* – श्री राजकुमार उराडे,श्री इम्रान बागवान (मेंबर),श्री नंदकिशोर धालपे, श्री प्रसाद उंडे,विशाल भंडारी,श्री सहदेव बबन खोमणे,श्री उदय मैड, डॉ संदिप महामुनी, चि.शार्दुल उराडे,श्री अमोल अनंता पवार, संजयकुमार अँड ब्रदर्स,श्री अनिल ठोंबरे,बालक मंदिर १२शास्त्र (१९९८),श्री पांडुरंग & गणेश पिसे,श्री गौतांचंद नेमचांद गांधी,हॉटेल हिरा देशमुख ,संतोष खिस्ती,कैलास दळवी,प्रदीप वणसाळे,सुरेश दोशी(बाबुशेठ),श्री विजय डफळ,श्री वैभव दिगंबर लाळगे, श्री केदार जगताप, कवितके कार्यालय,श्री बाळू जैन,श्री बाळासाहेब पांढरे, श्री संतोष भरते,श्री दादा ठेंगल श्री लक्ष्मण लवटे,श्री सुरेश बनसोडे,श्री अशोक कुंकरी,Star Girls Group १२ Science Natepute
वाढदिवसाचा खर्च टाळून कैलास गायकवाड यांनी मास्क सैनी टायझर केले वाटप*
*वाढदिवसाचा खर्च टाळून कैलास गायकवाड यांनी मास्क सैनी टायझर केले वाटप*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) कारुंडे तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास गायकवाड यांनी स्वतःचा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून . नातेपुते येथील पीएमपी कॉलेज येथे क्वाॅरंटाइन असलेल्या लोकांना तसेच कोरोना महामारी अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांना जेवण तसेच सॅनी टायझर, मास्क वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी आकाश(वस्ताद)भोसले, अक्षय शिंदे, वैभव गेजगे, अतिष गायकवाड, डी आर गेजगे, बाबासाहेब गायकवाड, प्रथमेश रणदिवे ,बादल सोरटे,गणेश खिलारे, अतिष खिलारे, शशिकांत गायकवाड व इतर मिञ परिवार उपस्थित होते.
*आद्यक्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्या वतीनेजीवनावश्यक वस्तूंचे वाटप *
*आद्यक्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
*नातेपुते (प्रमोद शिंदे)-शिवपुरी तालुका माळशिरस येथे आद्य क्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्यावतीने 75 किराणा किट व मास्क सेनिटायझर चे वाटप करण्यात आले वाटप करताना शासनाच्या नियमांचे पालन करून हे वाटप करणात आले तसेच सर्व पत्रकारांचे विशेष सत्कार करण्यात आले या वेळी एकशिव गावचे मा.सरपंच मा श्री.शहाजीदादा धायगुडे, अध्यक्ष लखनभाऊ चव्हान,मा.श्री.गुणवंत पाटील, ग्रा.सदस्य दशरथ जाधव,अय्याज मुलाणी,किरण जालोदे, पोपट, एन डी एम जे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, गुरसाळे गावचे सरपंच राहुल जगताप व शिवपुरी शाखेचे अध्यक्ष राहुलभाऊ सरगर, उपाध्यक्ष श्रीकेश वरूडे, खजिनदार महेश कांबळे,व सर्व सभासद ,किरण खरात, कुलदीप खांडेकर,सुमित चँकेश्वरा,प्रतीक वरूडे,अनिस मुलाणी,आसिफ मुलाणी,रुपेश वाघमारे, वाहिद मुलानी किसन रुपनवर सर्व शिवपुरी ग्रामस्थ उपस्तीत होते कार्यक्रमाचे सूत्रसनचन श्रीकेश वरूडे यांनी केले.
माळशिरस येथे विकास दादा धाइंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभजन थाळी चे वाटप
माळशिरस येथे मोफत शिवभजन थाळी चे वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)- माळशिरस येथे आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे मा.सरपंच विकास दादा धाईंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळी चे वाटप करण्यात आले कोरणा प्रादुर्भावामुळे अनेक गरीब लोकांची उपासमार होत आहे हाताला काम नाही त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे उपसणारे हाल होत असल्याकारणाने शासनाने शिव भजन थाळी अल्पदरात योजना आणली आहे परंतु अल पदराचे पैसेही देण्यासाठी लोकांकडे नाही याचा विचार करून विकास धाईंजे यांनी सोशल डिस्टंसिंग पळून मोफत 100 शिवभोजन थाळी पार्सल गरजूंना वाटप केले आले यावेळी विकासदादा धाईजे,एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते, पंचायत समिती सदस्य अजय सकट, पत्रकार प्रमोद शिंदे,संजय झेंडे, दत्ता कांबळे, प्रवीण नलावडे, शिवाजी साळे,व कार्यकर्ते उपस्थित होते.
लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा- सलमान शेख
– लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा- सलमान शेख
पुरोगामी महाराष्ट्र्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे
लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा मागणी मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती आरक्षण संघर्ष समन्वय समिती माळशिरस तालुका युवक नेते सलमान शेख यांनी मुख्यमंत्र्यांना केली
महाराष्ट्र राज्यकोविड१९ साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर सारे जग ठप्प झाले आहे राज्यात 18 मार्च पासून लॉकडाऊन घोषित केल्यापासून आजपर्यंत अनेकांचे उदरनिर्वाह करण्याचे साधन ही या आपत्ती मुळे कोलमडुन गेले आहे अनेक खाजगी कंपन्यांनी कर्मचारी यांना विनावेतन सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे गोरगरीब उपेक्षित वंचित व मागासवर्गीय लोक फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत समाजातील जास्तीत -जास्त लोकांना एकमेव मजुरीचा आधार असून त्यांना शेती नाही त्यांचे उद्योगधंदे व्यवसाय नाहीत त्यामुळे हे लोक आता फार मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांना या अडचणीच्या काळात प्रशासनाच्या वतीने आधार देणे फार महत्त्वाचे आहे
ग्रामीण व मध्यम शहरी भागात या लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे राज्याला अन्नधान्य पुरवठा करणारा बळीराजाही दळणवळण ठप्प झाल्यामुळे चिंताग्रस्त आहे. पिकवलेला माल कवडीमोल किंमतीत खरेदी होत असून काहींनी तर सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान केले आहे तर अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी ,मजूर ,वेठबिगारी चाकरमानी व छोटे व्यवसायिक यांना आपल्या सरकार कडून खारीचा वाटा या आशयाप्रमाणे सण २०२०-२०२१ या चालू वर्षात आकारण्यात येणारे विज बिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी ही करआकारणी राज्य सरकारने सरसकट माफ करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
कळावे
आपला विश्वासू
सलमान शेख
AIMIM नेते माळशिरस तालुका
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र
पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश
पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे( नातेपुते)- पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार असल्याची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन डी एम जे) या संघटनेने ग्रामसेवक डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमाणे पत्रकारांनाही 50 लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती पत्रकार हा स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतो व सत्य परिस्थिती आढावा वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचत असतो परंतु हे काम करत असताना पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नव्हते. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून इतर कर्मचाऱ्यांना बरोबर पत्रकारांनाही कोरोना धोका आहे. त्यांनाही विमासंरक्षण मिळाले पाहिजे. मुंबईमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाआहे ही गोष्ट लक्षात घेत यावर आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संपादक महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे,पत्रकार प्रशांत खरात यांनी 50 लाख रुपयांचा विमा पत्रकारांना देण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार याची घोषणा केली आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे व त्याला कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाल्यास तात्काळ हे 50 लाखाचे विमा संरक्षण मिळणारआहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व पत्रकार बांधवांकडून स्वागत केले जात आहे.
महेश शिंदे यांचे वाढदिवसा निमीत्त आयोजीत शिबिरात 126 रक्तदान
महेश शिंदे यांचे वाढदिवसा निमीत्त आयोजीत शिबिरात 126 रक्तदान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन *मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे सदर आवाहानास महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने *डॉ. धवलसिंह मोहिते पाटिल* यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजीत करण्यात येत आहेत याच अनुषंगाने मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिंदे यांचे वाढदिवसा निमीत्त अकलुज येथील राणे हाॅस्पीटल येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केले होते . या शिबीरामध्ये माळशिरस तालुक्यातील मैत्री प्रतिष्ठानचे सदस्य इतर सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्ष व सर्व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.यामध्ये 126 रक्तदात्यांनी रक्तदान केले महेश शिंदे यांना अनेक मान्यवरांनी विकास दादा धाईंजे वैभव गीते सतीशनाना पालकर रोहन भैया सुरवसे पाटील ऍडव्होकेट बाबजी वाघमोडे विजय काका सगर अशा अनेक वरिष्ठ लोकांनी भेटी दिल्या समक्ष व सुजयभैया माने पाटील तसेच श्रीलका (माँ) पाटील व अनेक वरिष्ठ मित्र परिवारांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबीराचे उदघाटन उपस्थीत सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले शिबीर यशस्वी करण्यासाठी
इत्यादींनी परिश्रम घेतले.
सदर रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बॅंकेचे
यांचे विशेष सहकार्य लाभले
या शिबीर मध्ये सहभाग घेतलेबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश शिंदे यांनी मानले.
नातेपुते परिसरात वादळ वाऱ्याचा शेतकऱ्यांना तडाखा
नातेपुते परिसरात वादळ वाऱ्याचा शेतकऱ्यांना तडाखा*
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते तालुका माळशिरस परिसरात पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहेत वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना चांगला तडाखा बसला आहे. पावसासह वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यात शेतामध्ये उभी असलेली पिक कोसळले आहेत त्यामध्ये केळी मका अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे सध्या कोरोना चा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे गेली तीन महिने पासून शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे त्याला भाव नाही त्यामुळे आधीच तो अडचणीत आला आहे त्यात आता या वादळा वाऱ्याने तडाखा दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाले असून प्रामुख्याने शेती ही त्याच्या उपजीविकेचे साधन असून त्या शेतीवर कोरणा मुळे संकट आले आहे व आता निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर कोपत आहे. अशात शेतकऱ्याने करायचं तरी काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे? शेतकऱ्यांकडून सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी शासनदरबारी होत आहे परंतु शासन या शेतकऱ्यांची दखल घेणार का? हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.