माळशिरस तालुका

कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा माळशिरस पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे…विकास दादा धाइंजे

कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा माळशिरस पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे…विकास दादा धाइंजे

गणेश गायकवाड (तात्या) मौजे कारुंडे ता.माळशिरस जि. सोलापूर यांना शासनाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर मिळाला याचे पूजन dr. कुमार लोंढे,संतोष माने,दादा जाधव,सचिन लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी प्रास्ताविक विशाल साळवे यांनी तर ऍडओकेट सुमित सावंत,धनाजी शिवपालक, एन डी एम जे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी प्रमुख भाषणात बोलताना विकास दादा धाइंजे म्हणाले की माळशिरस तालुक्यात 127 ट्रक्टर बौद्ध, मातंग,चर्मकार, यांच्यासह विविध जातींच्या समूहांना मिनी ट्रॅक्टर ची योजना मिळवून देऊन कार्यकर्ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आज त्यांची कुटुंब चांगल्या प्रकारे रोजगार मिळवत आहेत हा माळशिरस तालुका पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणे काळाची गरज आहे
यावेळी डॉक्टर कुमार लोंढे केेेेे रिपाई जिल्हा युवक संघटक महेंद्र गायकवाड सर, विशाल साळवे, ऍड .सुमित सावंत संपादक प्रमोद शिंदे ,उपसंपादक प्रशांत खरात, एन डी एम जे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, रंजीत कसबे दत्ता कांबळे ,विषाल झेंडे , सचिन झेंडे धनाजी ,शिव पालक संजय नवगिरे ,गोरख गायकवाड रवी झेंडे ,महादेव गायकवाड, गणेश गायकवाड , विशाल गायकवाड, शिवाजी साळे बाळासाहेब सावंत, धीरज सावंत, माळशिरस तालुक्यासह विविध तालुक्यातील फुले शाहू,आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या चळवळीतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच अमर जगताप यांच्या प्रयत्नांना यश तलावात पाणी सोडण्यास मंजुरी*

सरपंच अमर जगताप यांच्या प्रयत्नांना यश तलावात पाणी सोडण्यास मंजुरी*
नातेपुते( प्रमोद शिंदे)- कारुंडे तालुका माळशिरस येथील लघुपाटबंधारे तलाव कोरडा पडला असल्याने कारुंडे गावात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कारुंडे या भागात विहिरी नाले बोरवेल याचे पाणी आटले आहे. त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने धीम बलवाडी धरणातील पाणी कारुंडे तलावात सोडण्याची मागणी सरपंच अमर जगताप व ग्रामस्थांनी दिनांक  26 /9 2019 ग्रामसभेचा ठराव करून केली होती.लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती याची दखल घेत लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता बोडके यांनी दिनांक 30/9/2019 रोजी पाणी सोडण्याची मंजुरी पत्राद्वारे दिली आहे.लवकरच तलावामध्ये पाणी सोडले जाईल अशी माहिती सरपंच अमर जगताप यांनी दिली.

माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण

माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण,
माळशिरस( प्रमोद शिंदे) 2015 मध्ये माळशिरस येथे ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली यावेळी या ठिकाणी कार्यरत असणारे अनेक कर्मचारी आकृतीबंध नुसार कमी करण्यात आले,याचा फायदा घेत तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी व भरती प्रक्रियेशी निगडीत सर्व अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मुळ पात्रताधारकांना बाजूला करून त्यांचे ठिकाणी इतर लोकांना कामाला लावले आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदेशीर व अनाधिकृत आहे .सध्या हे लोक नगरपंचायत मध्ये स्वतःचा एकाधिकारशाही नुसार कार्यभार सांभाळत आहेत माळशिरस या नगरपंचायती मध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या लोकांना व्यवस्थित बोलत नाही त्यांची कामे वेळेत करत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश थोरात यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये संबंधित विभागाकडून या कर्मचारी भरती ची संपूर्ण माहिती मागवली असता त्यामध्ये त्यांना तफावत दिसून आली त्यानुसार त्यांनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व ही बेकायदेशीर झालेल्या कर्मचारी -अधिकारी नियुक्तीची चौकशी करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी मा.मुख्याधिकारी नगर पंचायत माळशिरस सोलापुर येथील वरिष्ठ म्हणजेच मा.जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे वेळो-वेळी कागदोपत्री पाठपुरावा केला मात्र , तक्रारदारांचे पदरी निराशाच पडली. संबंधित अधिकारी या प्रकरणी मौन बाळगून होते , त्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही उलट याप्रकरणी अधिकारी जाणीवपुर्वक उदासीनता दाखवित असून त्या ठिकाणी सुध्दा,आर्थिक व्यवहार झाले असल्याचे मंगेश थोरात यांचे म्हणणे आहे .त्यानुसार यापुढे मा.विभागीय आयुक्त सो,(महसुल)पुणे यांचे यांचे कार्यालयात सुद्धा या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला, मात्र ,अद्यापि त्या ठिकाणी ही कोणतीच कार्यवाही, कारवाई झालेली दिसून आलेली नाही , त्यामुळे या सर्व भ्रष्ट प्रशासनाच्या निषेधार्थ मा.विभागीय आयुक्त सो (महसूल) पुणे,विधानभवन, यांचे कार्यालयासमोर दि. १ ऑक्टोबर २०१९ रोजी, सकाळी ९ वाजता आमरण उपोषणास बसणार आहे अशी माहिती मंगेश थोरात यांनी दिली,यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुनील ओवाळ, आदी उपस्थित होते.

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली. सविता ढोबळे

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली. सविता ढोबळे

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली.
सविता ढोबळे
नातेपुते ( प्रतिनिधी)
कृष्णामाई माने पाटील या आदर्श माता होत्या. त्यांनी आपल्या मुलांवर सामाजिक कार्याचे संस्कार केले. त्यांच्या प्रेरणेमुळेच सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात क्रांती केली असे मत साविता ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.
मोरजाई विद्यालय मोरोची ता माळशिरस येथे कृष्णामाई माने पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यातआली त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक विकास सुर्यवंशी, रामहरी आचार, बाळासाहेब बळवंतराव , फिरोज आतार, संपत रुपनवर, आशा महामुनी, दिपाली जाधव, सुनंदा वजाळे, रणजित बाबर, बाळासाहेब लवटे, विठ्ठल लोंढे उपस्थित होते . यावेळी कु केतकी पाटील, पुनम अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना सौ ढोबळे म्हणाल्या की, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरसच्या माळरानावर सहकार, शैक्षणिक,कृषी औद्योगिक , दुग्ध क्रांती केली आहे. त्यांच्या मातोश्री कृष्णामाईनी लहानपणी केलेल्या सामाजिक कार्याच्या संस्कारामुळे , कृष्णामाईनी आपली तिन्ही मुले कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, धर्मवीर सहाशिवराव माने पाटील, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांना आदर्श घडवण्यासाठी प्रयत्न केले. इथल्या सामान्य लोकांचे दुःख दुर व्हावे यासाठी सहकारी संस्था स्थापना करुन जीवनमान उंचावण्याची प्रेरणा त्यांनी दिली . त्यांचे स्वप्न आज प्रत्येक्षात उतरलले पहावयास मिळत आहे. सहकारमहर्षिनीं स्थापन केलेल्या संस्था गरीबांची आश्रयस्थाने बनलीआहेतअसे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक भागवत यांनी केले तर आभार प्रथमेश पाटोळे यांनी मानले..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने डॉक्टर एम के इनामदार यांना सन्मानपत्र देण्यात आले

महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड संकल्पनेतून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल ने झाडे लावा झाडे जगवा अभियान राबवले होते या अभियानात सुप्रसिद्ध हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर एम के इनामदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून सहकार्य केल्याबद्दल त्यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले

You may have missed