पिरळे येथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक*

  • पिरळे येथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -प्रमोद शिंदे – नातेपुते सध्या कोरोना य प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर  शिक्षक आणि शिक्षण विभाग वेगवेगळ्या युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवून ते व्हिडीओ लिंक शिक्षकांच्या मोबाईल वरती पाठवले जातात. व शिक्षक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती पाठवतात तसेच आता शिक्षण विभागाकडून दर आठवड्याचा म्हणजे सोमवार ते शनिवार तासिका प्रमाणे शाळेचे वेळापत्रक तयार केले असून ते वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल वरती पाठवले जाते व त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करण्यासाठी सांगितले जात आहे.
  • विद्यार्थ्यांकडून अभ्यास सोडून घेऊन तो अभ्यास मोबाईल वरती व्हाट्सअप च्या माध्यमातून टाकण्यास सांगितला जातो व तो अभ्यास शिक्षक तपासून पाहतात त्यामध्ये काही चुका असल्यास ते व्हाट्सअप वरती विद्यार्थ्यांना सूचना देतात परंतु काही विद्यार्थ्यांना मोबाइल सुविधा नसल्याकारणाने स्वतः शिक्षक हे वेळापत्रक घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जातआहेत. पिरळे येथील जि.प शाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  खरात सर हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जात आहेत. व त्या विद्यार्थ्यांना वेळापत्रक देऊन त्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत.खरात सर हे स्वतः तोंडाला मास्क बांधून विद्यार्थ्यांशी सोशल डिस्टंसिंग ठेवून त्यांना अभ्यासाविषयी सांगताहेत तसेच जि.प. शाळा शिंदे वस्ती येथील शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे मॅडम ह्या सुद्धा लॉक डाऊन झाल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेही पंचक्रोशीत कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना कोरणा प्रादुर्भावामुळे शाळेत जाता येत नाही तरी सुद्धा शिक्षक सचोटीने विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास कसा पोचवता येईल विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल याचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत या प्रयोगांसाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
जि प शाळा येथील इयत्ता सहावीच्या शिक्षक खरात सर विद्यार्थ्यांना वेळापत्रक देताना
खरात सर विद्यार्थ्यांना अभ्यास संदर्भात माहिती देताना

You may have missed