वंचित च्या वतीने एकशिव सिध्दार्थनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
*वंचित च्या वतीने एकशिव सिध्दार्थनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे)– मौजे एकशिव सिद्धार्थ नगर व साठेनगर येथे वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
काही दिवसापुर्वी मौजे एकशिव ता.माळशिरस येथे 1ला कोविड,कोरोना ग्रस्त पेशंट सापडला होता.म्हणून ज्या भागात कोरोना बाधित पेशंट सापडला तो भाग सिल करण्यात आला होता. हा भाग दलित लोकवस्ती असल्याने 200 कुटुंब अडकुन पडले होते सिल केलेल्या भागातून लोकांना बाहेर जाता येत नव्हते या वस्तीमध्ये सर्वच लोक मोलमजुरी करणारे व हातावर पोट भरणारे आहेत. परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे येथील लोकांना घरातच अडकून बसावे लागले. त्यामुळे अन्न धान्य व उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे दैनंदिन अडचणी लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी माळशिरस विधानसभा उमेदवार राज यशवंत कुमार यांच्या वतीने 101 गरजू लोकांना जिवनआवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या वेळी राज कुमार यांनी माळशिरस तालुक्यातील वंचित च्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की अशा परिस्थिती अडचणीत असलेल्या लोकांना वंचित आघाडीच्या वतीने तात्काळ मदत करा व काही अडचण आल्यासआमच्याशी संपर्क साधा असे आवाहन केले या वेळी वंचितचे एकशिव अध्यक्ष दिपक झोडगे,बन्नी साळवे,विजय जगताप, सुरज कांबळे, सनी बाबर,यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमास अभिजित गायकवाड ,सलमान शेख, प्रितम साळवे ,धर्माअशोक सावंत,रामभाऊ सावंत,हरीभाऊ साळवे, शांतिनिकेतन साळवे, सामाजिक कार्यकर्ते बाजिराव खताळ श्रीकेश वरुडे , प्रमोद साळवे ,रोहित असुदे उपस्थित होते.