ऍड.जितेंद्र मन्द्रे साहेब यांचा आज कोरोना प्रादुर्भावामुळे दुःखद निधन, दुःखद निधनापूर्वी यापूर्वी पत्रकार प्रमोद शिंदे यांना केला होता व्हिडिओ कॉल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )दुःखद बातमी ऍड.जितेंद्र मन्द्रे साहेब यांचा आज कोरोना प्रादुर्भावामुळे दुःखद निधन झाले.ॲड.जितेंद्र मन्द्रे साहेब अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती होते.माझे जवळचे निकटवर्ती मित्र होते.अनेक गरीब लोकांना त्यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली आहे व पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्याबाबत काल एक खूप खूप वाईट किस्सा घडला काल दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12:42 मिनिटांनी त्यांचा मला व्हिडिओ कॉल आला होता त्यावेळेस मी अश्विनी हॉस्पिटल नातेपुते डॉक्टर माधव लवटे यांच्या हॉस्पिटल ला होतो. त्यावेळेस मंद्रे साहेबांचा मला अचानक व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मध्ये त्यांच्या तोंडाला व्हेंटिलेटर लावलेला दिसत होता. त्यांना श्वास नाला व बोलायला त्रास होत होता.तरीदेखील त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल करून ,त्यांना मला काहीतरी बोलायचे होते. परंतु त्यांचा आवाज व्हेंटिलेटर लावल्यामुळे येत नव्हता त्यांचा आवाज ऐकण्याचा मी खूप प्रयत्न केला.त्यांना मी विचारलं साहेब काय अडचण आहे.तुमच्या सोबत कोण आहे त्यांना फोन द्या मंद्रे साहेब फक्त माझं बोलणं ऐकत होते व मला बोलण्याचा प्रयत्न करत होते.परंतु नेटवर्कमुळे आमच्या दोघांचं संभाषण एकमेकांना कळू शकले नाही.त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं त्यावेळेस मी अचानकपणे मोबाईल वरती हात फिरवला त्याचा स्क्रीन शॉट निघाला मी आणखीन एक स्क्रीन शॉट घेतला व त्यांना म्हणालो साहेब तुमच्याजवळ कोण असेल तर त्यांना मला फोन करायला सांगा परंतु हॉस्पिटलमध्ये नेटवर्क नसल्याने मी ही त्यांना बोलू शकलो नाही थोड्या वेळाने फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर माझे परममित्र दैनिक लोकमतचे वार्ताहर श्रीकांत उर्फ बापू बाविस्कर यांचा फोन झाला की पीडब्ल्यूडी चे कर्मचारी नातेपुते येथील रहिवाशी आमचे मित्र कन्हेरकर साहेब यांचं कोरोना ने दुःखद निधन झालं त्यांचाही नेहमी आमचं बसणे उठणे होते. त्यांची बातम्या ऐकताच वाईट वाटलं. बाविस्कर यांना त्यावेळी मी मंद्रे साहेबांचा हा किस्सा सांगितला व त्यांना म्हणालो मंद्रे साहेबांचा मला व्हिडिओ कॉल आला आहे.त्यांच्याजवळील कोण नातेवाईक असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा व त्यांची काय अडचण आहे ते जाणून घ्या त्यांचा नंबर मेळावा आपण त्यांना संपर्क साधून ते हो म्हणाले व त्या नातेवाईकांना बापूंनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.अखेर शेवटी आज सकाळी बातमी ऐकायला मिळाली मंद्रेसाहेब यांचे दुःखद निधन झाले.अत्यंत दुःख वाटले व डोळ्यात पाणी आले. शेवटच्या क्षणी आपल्याला व्हिडिओ कॉल केला ते काय सांगणार होते ते नेटवर्कमुळे कळालं नाही. त्यांना शेवटी मदत करू शकलो नाही हीच मोठी खंत मनाला लागून राहिली. साहेब तुम्ही शेवटपर्यंत आठवणीत राहाल.

ॲडव्होकेट मद्रे साहेब व कन्हेरकर साहेब यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली- पत्रकार प्रमोद शिंदे*

टीप- नातेपुते व परिसरातील सर्व हितचिंतक मित्र परिवार तसेच नागरिकांना विनंती आहे की आता तरी जागे व्हा कोरोना ला सहज घेऊ नका स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या सुरक्षतेसाठी प्रशासन ज्या काही सूचना देत आहे त्या सूचनांचे पालन करा स्वतःची टेस्ट करून घ्या वेळीच योग्य तो उपचार घ्या मृत्यूच्या पुढे काहीच नाही आपण जगला तर काहीही करू शकतो आपली समाजाला व परिवाराला गरज आहे* -पत्रकार प्रमोद शिंदे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार *

एडवोकेट जितेंद्र मंद्रे साहेब यांचा शेवटचा पत्रकार प्रमोद शिंदे व्हिडिओ कॉल
मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व एडवोकेट जितेंद्र मंद्रे साहेब
पीडब्ल्यूडी चे कर्मचारी माननीय कै.कन्हेरकर साहेब यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली

You may have missed