पिरळे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूूूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे तालुका माळशिरस येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लोकांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम आयुर्वेदिक गोळ्यांचे ह्युमॅनिटी बुस्टर होमिओपॅथिक डोस चे पिरळे ग्रामपंचायत च्या वतीने वाटप करण्यात आले.

हा उपक्रम पिरळे ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानदेव शिंदे यांच्या कल्पनेतून तसेच 14 वा वित्त आयोग फंडाच्या व्याजाच्या पैशातून करण्यात आला हा उपक्रम राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशाताई सेविका यांच्या मदतीने घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सरपंच ज्ञानदेव शिंदे,पत्रकार प्रमोद शिंदे,ग्रामसेवक रमेश जामदाडे,माजी सरपंच शिवाजी लवटे-पाटील महादेव शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता सूर्यवंशी, लैला आत्तार, मुक्ताबाई चव्हाण, मनीषा कांबळे, मदतनीस आत्तार मॅडम, भोसले मॅडम,नफिसा आत्तार, बुधावले मॅडम,तसेच आशा ताई सेविका सुवर्णा शिंदे, मंदाकिनी माने,पुष्पा पैलवान,इत्यादी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश खिलारे, अनिल वाघमोडे, नितीन खिलारे यांनी वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले.

You may have missed