ग्रामपंचायत पिंपळदरीचा गैरकारभार अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा एन डी एम जे तालुकाध्यक्ष राजरत्न भगत यांचा आरोप..

एन डि एम जे संघटना आक्रमक

पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर करनार बोंबाबोंब आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मोहन दिपके (हिंगोली)

मौजे पिंपळदरी ता. औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या गावामध्ये ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजनेच्या कामा मधुन पाच लाख रूपयांच्या निधी मधुन सिमेंट रोड चे काम करन्यात आले सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करन्यात आले असुन सदरचे काम हे ईस्टिमेंट नुसार करन्यात आलेले नाही सदर काम हे एका रात्रीत उरकुन जुन्या रोड वर एक इंचाचा थर देऊन निक्रष्ट दर्जाचे करन्यात करून लाखो रुपयांचा अपहार करन्यात आला आहे, त्याच बरोबर दलित वस्तीमध्ये ईलेक्ट्रेशनचे काम अत्यंत निकृष्ट करून त्यामध्ये देखिल लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करन्यात आला आहे एका महिन्यात सर्व पथदिवे बंद पडल्याने मागिल सहामहिन्यापासुन दलित वस्ती अंधारात आहे, त्याच बरोबर दलित वस्तिमध्ये पानिपुरवठा विद्युत पंप बंद असल्याने सहामहिन्यापासुन दलित वस्तिला होनारा पानिपुरवठा बंद आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातिल शौच्छालयावर लाखो रूपये खर्च करून देखिल सदरिल शौच्छालय वापरात नसल्याने रुग्णांना व गरोदर स्त्रिया यांना याचा नहकच त्रास सहन करावा लागत आहे.म्हनुन यासंदर्भात नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटना आक्रमक झाली असुन वरिल सर्व बाबींवर तात्काळ कार्यवाही करून भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक, सरपंच,प्रशासक, व अभियंता यांच्यावर गुन्हे नोंद करून निधिचा पुनरभर्ना करन्याची कार्यवाही करन्यात यावी गावामध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आन्यथा दिनांक 19/10/2020 रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर बोंबाबोंब आंदोलन करन्यात येईल असा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे औंढा नागनाथ चे तालुकाध्यक्ष राजरत्न आगस्ती भगत यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हाधिकारी हिंगोली व गटविकास अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथ यांना दिला आहे, सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवा जिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके,. ता. उपाध्यक्ष भीमराव इंगोले. मनोज भगत. तुकाराम खिल्लारे. जितेश पांढरे. महेंद्र भगत. अभयराज भगत

लाखो रुपये बजेटच्या रस्त्याची दुरावस्था
प्राथमिक आरोग्य केंद्रातील शौचालयाची अवस्था
यासंदर्भात रिपोर्टिंग करताना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे हिंगोली प्रतिनिधी मोहन दिपके

भ्रष्टाचाराची पोल खोल करताना एन डी एम जे टीम

You may have missed