माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील समस्याबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती उपकेंद्रात करणेची पंचायत समिती सदस्यांची मागणी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस
माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील विविध समस्याबाबत व उपकेंद्रात बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करणेची माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व पंचायत समितीचे गटनेते रणजितसिह जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांची भेट घेऊन मागणी केली आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील खालील समस्यांबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करावी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाकडे बी.ए.एम.एस. डॉक्टराची नियुक्ती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात करण्याच्या संदर्भात 2017 पासून आमचा सतत पाठपुरावा आहे. त्या अनुषंगाने शासनाने अनेक जिल्ह्यामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये केलेली आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय आरोग्य यंत्रणा बर्यापैकी काम करत असून याहीपेक्षा उत्तम आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यासाठी सोलापूर जिल्हा तसेच माळशिरस तालु्नयातील 76 आरोग्य उपकेंद्रामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती तत्काळ करण्यात यावी त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी व सीईओना करावेत जेणेकरुन ते तत्काळ नियुक्ती करतील त्याचप्रमाणे माळशिरस तालुख्यातील नातेपुते,माळशिरस व अकलूज उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना चालू करावी,माळशिरस तालुक्रातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरीत भरण्यात यावीत तसेच जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांची पदेही त्वरीत भरण्यात यावीत,नातेपुते व माळशिरस या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात यावा,निवृत्त वैद्यकिय अधिकाऱ्यांना मानधन तत्वावर ओपीडी करन्यास परवानगी द्यावी,अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचे असून शासनाकडून 100 बेडसाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे परंतू जागा नसल्याने इमारत उभी नाही परंतू सध्या कोरोना परिस्थिती असल्याने आहे त्या 50 बेडच्या उपरुग्णालयात 100 बेडची आकृतीबध्द (वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी) निर्माण करण्यात यावेत जेणेकरुन त्या पदाचा वापर करीत अकलूज व परिसरात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबविण्यात येईल तसेच या उपजिल्हा रुग्णालयात एम.डी.जनरल फिजीशीयन व मेडीशीयन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात याव्यात या पध्दतीने आरोग्य विभागाच्या अडचणी दूर झाल्यास ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांला त्याचा लाभ होईल व ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सुटल्या जातील