विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले उमेदवा, उत्तम जानकर यांच्या नावाच्या चर्चेने माळशिरस तालुक्यातील राजकारणाला कलाटणी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होण्याची शक्यता असून एकूण 12 जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना यापैकी एका जागेवर संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते. यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती.काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरले होते. त्याविषयी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाईल. काशी माहिती सूत्रांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरणाला कलाटणी मिळणार आहे उत्तम जानकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील गटाला टक्कर देण्यासाठी तसेच माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तालुक्यात जरी भाजप ची ताकत वाढले असली तरी राष्ट्रवादीची सुधा जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जर उत्तम जानकरांना विधानपरिषद मिळाली तर माळशिरस तालुक्यात तीन आमदार होतील. व या तीन आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याशिवाय राहणार नाही. विकास कामासाठी कोणता आमदार सरस ठरणार हा येणारा काळच ठरवेल.