होलार समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पाठीशी घालणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी फलटन यांच्याकडून तपास काढून घ्या…..निवृत्ती रोकडे

जिल्हाधिकारी सातारा यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन सादर

मुख्यमंत्र्यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा प्रतिनिधी
राज्यात बौद्ध,मातंग,होलार व अनुसूचित जाती-जमातींच्यावर अन्याय अत्याचार वाढले असून शासनाची दलित विरोधी भूमिका व प्रशासनाची कचखाऊ अनास्था दिसून येत आहे.मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत परंतु दलित हत्या व दलित आदिवासींच्यावर सातत्याने वाढत असणारा अन्याय अत्याचार याबाबत मात्र भ्र शब्द काढायला तयार नाहीत मौजे उपळवे ता.फलटण जी.सातारा येथील अनुसूचित जातीच्या होलार समाजातील अक्षदा देविदास अहिवळे या अल्पवयीन मुलीची बेपत्ता झाल्याबाबत फलटन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी देविदास अहिवळे यांनी दिनांक 5/10/2020 रोजी दाखल होती
दिनांक 8/10/2020 रोजी उपळवे गावापासून लांब 5 किलोमीटर अंतरावर विहिरीत मृतदेह सापडला दिनांक 11/10/2020 रोजी मयत मुलीच्या शेजारी राहणारा आंबदास किसन कवीतके या नाराधमास आरोपीस अटक करून भा.द.वि.305,506,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)r, 3(2)5 ही कलमे लावून मे.विशेष न्यायालयात अहवाल पाठवला आहे.
सध्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण हे करीत आहेत.
मयत मुलीची आई लक्ष्मी देविदास अहिवळे या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना माझ्या मुलीची हत्या झाली आहे.असे सांगत असताना सुद्धा पोलिसांनी जाणून बुजून आत्महत्येची कलमे लावली आहेत.असा आरोप पीडित कुटुंबास भेटायला जाणाऱ्या संस्था संघटनांना व विविध पक्षांच्या नेत्यांना आणि प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.
तात्काळ फिर्यादी लक्ष्मी देविदास अहिवळे मयताची थोरली बहीण यांचा फेर जबाब,पुरवणी जबाब,घेण्यात यावा.
निव्वळ आरोपीच्या व त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून हत्येचा गुन्हा दाखल न करता आत्महत्यानुसार गुन्हा दाखल करणे हे न्यायोचित वाटत नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्याकडून तपास काढून घेऊन इतर कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तपास देण्यात यावा.
मा.पोलीस अधीक्षक ना.ह.सं. कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाचे म्हणणे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक ना.ह.सं यांच्याकडे पाठवावा.
मा.अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्या 9/9/2020 च्या परिपत्रकानुसार आरोपी व इतर साक्षीदार लाय डिटेक्टर, पॉलिग्राफ,ब्रेन मॅपिंग,नार्को Analysis चिकित्सा करून गुन्ह्यातील सत्य परिस्थिती बाहेर काढावी.
परिस्थितीजन्य पुरावे योग्य पध्दतीने घेऊन तपासणीसाठी पाठवावे.
मे.विशेष न्यायालयात दोषारोपत्र पाठवण्यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक ना.ह.सं कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवावे त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात पाठवावे.
संवेदनशील खटले चालवण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी
सदरचा विषय व निवेदन मा.जिल्हाधिकारी महोदयांच्या अंतर्गत होणाऱ्या आगामी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासिक बैठकीत ठेवून जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.
अन्यथा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे यांनी दिली आहे.वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा व साहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी सातारा यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनावर एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे,विधी सल्लागार ऍड. हौसेराव धुमाळ ऍड.दयानंद माने यांच्या सह्या आहेत.

You may have missed