महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या मराठवाडा महिला उपाध्यक्ष पदि अभिनेत्री कांचन शिरभे ची नियुक्ती


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जालनायेथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कांचन शिरभे यांची महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या महिला मराठवाडा उपाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.
कांचन शिरभे यांना नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजुभाई साबळे यांच्या हास्ते व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे,प्रदेश महासचिव प्रदिप इंगोले,चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे, नृत्य विभागाचे प्रदेश अध्यक्ष टि.श्यामसुंदर, प्रदेश कार्याध्यक्ष राहूल गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थीत देण्यात आले.
या वेळी संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजूभाई साबळे यांनी आपल्या भाषनात सांगीतले की, सध्या महाराष्ट्रातला कलाकार सुरक्षीत नाही तसेच कलाकारांना कोणीही वाली नाही,कलाकारांचा फक्त वापर करणे चालू आहे, हे कोठेतरी थांबले पाहिजे म्हणून चित्रपट आघाडीच्या माध्यमातून सिने कलाकारांना संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार आसल्याचे ते बोलत होते.
या कार्यक्रमास मराठवाडा अध्यक्ष महेंद्र भारसाखळे, मराठवाडा उपाध्यक्ष नितीन पगारे, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे,जालना जिल्हाध्यक्ष गौतम शेळके,महिला जिल्हा प्रमुख कल्पना जमधडे,शहर अध्यक्ष गणेश साळवे,महिला जिल्हा सचिव पुनम चाटसे, शहर अध्यक्ष भगवान सुर्यवंशी,महिला शहर अध्यक्ष योगीता वाघ,गणेश भालेकर यांच्या सह अदि पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या वेळी अभिनेत्री कांचन शिरभे यांना नियुक्ती बद्दल व वाढदिवसा निमीत्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या मराठवाडा महिला उपाध्यक्ष पदि अभिनेत्री कांचन शिरभे ची नियुक्ती

You may have missed