दहिगाव येथे ओबीसी आरक्षण संदर्भात आ.गोपीचंद पडळकर यांची घोंगडी बैठक


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते(प्रतिनिधी)दहिगाव तालुका माळशिरस येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते . बैठकीची सुरुवात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या बैठकीत गोपीचंद पडळकर म्हणाले की हा घोंगडी बैठकीचा दौरा राजकीय दौरा नसून उपेक्षित ओबीसी लोकांच्या हक्कासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केली आहे. या बैठकीचा शुभारंभ पंढरपूर पासून सुरू झाला आहे.सर्व ओबीसी समाजातील नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे.मराठा आरक्षण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे टिकू शकले नाही.ओबीसी मध्ये 340 जातीचा समावेश आहे.या सर्व जातींनी एकत्र आलं पाहिजे तसेच रामोशी समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याचे त्यांनी या बैठकीदरम्यान रामोशी समाजाचे अध्यक्ष अजित शिरतोडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.हे निवेदन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य दौलत नाना शितोळे व आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक भटक्या विमुक्त क्रांती असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लखन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते सुदाम बुधावले यांनी दिले.निवेदनात रामोशी बेडर या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यात यावा.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी,.रामोशी समाजाचा विकास आराखडा तयार करावा तसेच रामोशी समाजाला प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वस्तीग्रह मिळावे.अशा अनेक मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले.यावेळी भाजपाचे नेते सोपान काका नारनवर,सरपंच ऍड.रणधीर पाटील,विजयसिंह पाटील,जय मल्हार क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष अजित शिरतोडे,हनुमंत बुधावले,बापूसाहेब पाटोळे बाळासाहेब जगन्नाथ फुले, बाळासाहेब चव्हाण ,तुकाराम चव्हाण,प्रशांत साळवे,संतोष शिरतोडे,दादा मदने, ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांना रामोशी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले
रामोशी समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारताना आमदार गोपीचंद पडळकर
ओबीसी आरक्षण संदर्भात मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पडळकर