माळशिरस सिद्धार्थ नगर येथे शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- नालंदा बुद्ध विहार सिद्धार्थनगर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माळशिरस नगर पंचायतचे मुख्य अधिकारी डॉ विश्वनाथ वडजे माळशिरस पोलिस स्टेशनचे पी आय गायकवाड साहेब तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सिद्धार्थ नगर व परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी केले होते. या कार्यक्रमास मुख्य अधिकारी डॉक्टर विश्वनाथ वडजे पीआय गायकवाड साहेब,एपीआय महानवर साहेब,रिपाईचे ज्येष्ठ नेते दयानंद धाईंजे,दत्तू कांबळे,धनाजी पवार, बाबाजी सावंत,अशोक बापू धाईंजे,डॉ.कुमार लोंढे,विशाल साळवे,पत्रकार प्रमोद शिंदे,प्रदीप धाईंजे, महेश शिंदे,प्रा.ढोबळे सर,राम कांबळे, किरण धाईंजे श्रीकांत सावंत,दत्ता सावंत,बुद्धभूषण धाईंजे,रणजित धाईंजे आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस सिद्धार्थ नगर येथे शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम
सिद्धार्थ नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना मुख्याधिकारी वडजे साहेब
पीआय गायकवाड साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप