कृषी दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कृषी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- कृषी दिन व माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच कृषी सप्ताह चे औचित्य साधून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक शेतकरी व कोरणा काळात प्रशासनासोबत चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सर्व कृषी सेवक,कृषी पर्यवेक्षक,कृषी अधिकारी व कर्मचारी यांचा कोरणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.तसेच सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.तसेच कृषी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,पंचायत समिती सभापती शोभा ताई साठे,पंचायत समिती सदस्य ऍड ऍड.हसीना शेख मॅडम,हनुमंत आबा पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे संपादक प्रमोद शिंदे,कार्यकारी संपादक प्रशांत खरात,पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण साहेब, कृषी मंडलाधिकारी गुलाबसिंह वसावे,तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक,कृषी सेवक, कृषी पर्यवेक्षक,मंडलधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडलाधिकारी सतीश कचरे, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक अमित गोरे,रणजीत नाळे व कर्मचारी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे चे सचिन दुधाळ औदुंबर पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक ऍड डॉ केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपादक प्रमोद शिंदे कार्यकारी संपादक,प्रशांत खरात यांनी केले.

कृषी मंडळ कार्यालय नातेपुते यास महाराष्ट्रातील पहिले आय एस ओनामांकन झाल्याबद्दल मंडलाधिकारी सतीश कचरे साहेब यांचा विशेष सत्कार करताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईजे सभापती शोभाताई साठे,पंचायत समिती सदस्य ऍड.हसीना शेख मॅडम,संपादक प्रमोद शिंदे
तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे साहेब यांचा विशेष सत्कार करताना संपादक प्रमोद शिंदे
ट्राफिक हवालदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण साहेब यांचा सन्मान करताना
कृषी साहेब रंजीत नाळे साहेब यांचा सन्मान करतान
तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
सभापती शोभाताई साठे यांच्या हस्ते वृक्षारोपण
पंचायत समिती सदस्य हनुमंत आबा पाटील वृक्षारोपण करताना