कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंखे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते कृषी मंडळ भागातील कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंखे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले आहे. हल्ली वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते अधिकारी हार-तुरे केक पार्टी साठी अनाठाई खर्च करत असतात व त्यामध्ये हजार रुपये खर्च करतात परंतु असाच कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल आवाहन केले होते की सध्या देशामध्ये कोरणा प्रादुर्भाव ने थैमान घातले आहे गरीब लोकांच्या हाताला काम नाही याचा परिणाम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून शैक्षणिक साहित्य देण्यासाठी त्यांची परवड होत आहे तर अशा लोकांना अधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून शैक्षणिक साहित्याचे मदत करावी असे आव्हान संपादक प्रमोद शिंदे यांनी केले होते याच आवाहनाला प्रतिसाद देत कृषी अधिकारी कृषी सहाय्यक संघटना तालुकाध्यक्ष उदय तुकाराम साळुंखे साहेब यांनी त्यांच्या वतीने व संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंके साहेब. पांढरे साहेब ,सचिन दिडके, पत्रकार सचिन रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंखे साहेब यांनीवाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना दिले शालेय साहित्य
साळुंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने सन्मान
पत्रकार सचिन रणदिवे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना
कृषी अधिकारी पांढरे साहेब यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालय सदिच्छा भेट
कृषी अधिकारी साळुंके साहेब यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान

You may have missed