पती मनोज राऊतने पत्नीला ठार करून,पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

 

पती मनोज राऊतने पत्नीला ठार करून,पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-  फोंडशिरस तालुका माळशिरस येथील संशयित आरोपी नामे मनोज पांडुरंग राऊत राहणार फोंडशिरस व इतर तीन आरोपी यांनी संगनमत करून मयत पत्नी सौ.पल्लवी मनोज राऊत वय 29 हिस मारहाण करून जागीच जीवे ठार केल्याची घटना घडली आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी नवनाथ माने पोलीस नाईक यांनी समक्ष हजर राहून जबाब दिला की दिनांक 29/6/2021 रोजी ठाणे अंमलदार एस.डी.राऊत यांनी आकस्मात मयत दाखल केले होते. त्यात खबर देणारे पोलीस पाटील लक्ष्मण भिमराव कुंभार हे पोलीस पाटील म्हणून काम करत आहेत.सुमारे दीड वर्षापासून मनोज राऊत व त्याची मयत पत्नी पल्लवी मनोज राऊत वय वर्ष 28 यांचे घरगुती कारणावरून तक्रार झाल्यानंतर पल्लवी राऊत ही घरातून न सांगता निघून गेली होती.    नंतर ती परत आली. दिनांक 28/6/2021 रोजी रात्री आठच्या सुमारास पल्लवी हिने घरात गळफास घेतल्याचे समजले.त्यावर पोलीस पाटील घटनास्थळी गेलेअसता.त्यांना पल्लवी मयत झाल्याचे व पोलीस ठाण्यात खबर दिली नाही व तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानभूमीकडे येऊन गेल्याचे समजले.यावर पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात यांनी पोलीस पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले तेव्हा पोलीस पाटलांनी मयत स्मशानभूमीकडे नेले आहे.अस सांगितले तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात स्मशानभूमीत दाखल झाले.तेव्हा स्मशानभूमीत पल्लवी मयत झाल्याने तिला स्मशानभूमीत चितेवर ठेवून आग लावण्यात आली होती.त्यावेळी तिथे एक स्त्री व तीन पुरुष होते.पोलिसांना पाहता ते तिथून निघून गेले. चितेवरील आग पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात व पोलीस पाटील कुंभार यांनी विझवली व नंतर पती मनोज राऊत यांच्याकडे विचारणा केली असता. पोलीस स्टेशनला का कळवले नाही असे विचारल्यानंतर त्याने सांगितले घरामध्ये गळफास घेऊन पत्नी मयत झाले आहे.मयत झाल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल थोरात यांनी मयत पल्लवी हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे शवविच्छेदना साठी आणला तिच्या अंगाला जखमा असल्याचे निदर्शनास आले.तसेच पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.तसेच ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी मयताचे झालेले पी.एम रिपोर्ट मध्ये मरणाचे कारण सांगितले.Death due to shock due to bilateral haemothorax with blunt trauma chest with fracture ribs with fracture right forearm bones with head injury या कारणाने मयत झाल्याचे सांगितले यावरून पल्लवी मनोज राऊत वय 29 राहणार फोंडशिरस हिस आरोपी नामे पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत,आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम गवळी दोघे राहणार दसुर यांनी मयत पल्लवी हिस मारहाण व गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची फिर्याद देण्यात आली आहे. यांचे विरुद्ध भा.द.वि कलम302,201,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून.पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने कबूली दिल्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले.पुढील तपास सपोनि मनोज सोनवलकर करीत आहे.