साई सेवा दल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न*


नातेपुते प्रतिनिधी( प्रमोद शिंदे )

नातेपुते येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या आई सेवादल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार राम सातपुते व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. साई सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्रत अनेक उपक्रम राबवले जातात अनेक गरजू व गरीब लोकांना मदत केली जाते.साई सेवा दलाच्या वतीने गरजू व गरीब लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा दिली जाते आशा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेच्या दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते,कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील शाहिद भाई मुलांनी,अविनाश दोशी बाबा बोडरे डॉक्टर साईनाथ भोसले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व साई सेवा दलाचे संस्थापक गुरु कर्चे,अध्यक्ष बाबा कांबळे,सचिव सोमनाथ भोसले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed