धवलसिंह मोहिते-पाटील यांचा वीज वितरण संघटनेच्यावतीने यांचा सत्कार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कर –भारतीय काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष. .धवलसिंह(दादा)प्रतापसिंह मोहिते पाटील यांची अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या सोलापुर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वीज काँग्रेस(इंटक) संघटना सोलापूर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. श्री शिवशंकर वीज कामगार पतसंस्था अकलूज येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास माजी आमदार श्री. रामहरी रुपनवर सौ. शेख मॅडम महिला काँग्रेस अध्यक्ष सोलापूर ,आनंदराव पाखरे साहेब कार्यध्यक्ष इटंक जयकुमार वनकुंदरे साहेब जिल्हा समन्वय समिती प्रमुख इंटक संघटना सोलापूर प्रदीप सुरवसे साहेब चेरमन श्री.शिवशंकर वीज कामगार पतसंस्था अकलूज श्री.राजाराम घुगेसाहेब सर्कल सेक्रेटरी,सोलापूर लेरेंस डोंगरे, युवराज यालगुलवर,.कुबेर बोबडे विभागीय सचिव अकलूज विभाग, महावीर जाधव विभागीय सचिव, पंढरपूर सौ संगीता अकोले मॅडम विभागीय सचिव, सोलापूर ग्रामीण विभाग आदी उपस्थिती होते. या कार्यक्रमाच्या वेळी लाईनमन संतोष शिवाजी चव्हाण यांची महाराष्ट्र वीज कामगार काँग्रेस इंटक संघटना नातेपुते उपविभाग सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली तसेच.संतोष विठ्ठल पवार यांची माळशिरस उपविभाग सेक्रेटरी या पदी निवड करण्यात आली. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.