जय भीम शिवपालक अध्यक्ष आमचा लढवय्या नेता गेला- वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
धनाजी तुकाराम शिवपालक यांचा दिनांक 25/12/2024 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रक्षा विसर्जन दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 7.30 वाजत होणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे नेते धनाजी शिवपालक यांच्या अकाली अचानक झालेल्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार राज्य महासचिव
ऍड. डॉ. केवलजी उके यांनी श्रद्धांजली पर मनोगतात सांगीतले.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले की आमचे नेते सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज,ढाण्या वाघ,
धनाजी शिवपालक यांच्या निधनाच्या नंतर आम्ही शिवपलक यांच्या कुटुंबीयांच्या सोबत शेवट पर्यंत आहोत.
सर्वांनी पार्थिवाचे अंतीम दर्शन घेतले.
धनाजी शिवपालक यांच्यासारखा निस्वार्थी वाघासारखा लढणारा शेवटपर्यंत साथ देणारा मित्रत्व जपणारा नेता आम्ही हरवला आहे… असे उदगार आंबेडकरी चळवळीचे नेते व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाईंजे यांनी काढले.
यावेळी मुंबईहुन उद्योजक सामजिक कार्यकर्ते विनोद जाधव व मुंबई प्रदेश सचिव शशीभाऊ खंडागळे, ऍड.सुमित सावंत,महेश शिंदे मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष हे उपस्थित होते. त्यांनीही शिवपालक यांना श्रद्धांजली दिली. हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले संविधान वय 10 वर्ष अनिरुद्ध 6 वर्ष अशी मुलांची नावे आहेत.
धनाजी शिवपालक हे अन्याय अत्याचाराच्या विरोध लढणारे एक लढवय्या योद्धा होते. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता.
धनाजी शिवपालक हे मातंग व बौद्ध समाजाला जोडणारा मौल्यवान महत्त्वाचा दुवा होते. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांच्या अडचणीमध्ये धावून जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे हा शिवपालक यांच्या स्वभावाचा एक भाग होता. आपल्या स्वभावाने माणसांना जोडत राहणे हा त्यांचा विशेष गुण होता.
उंबरे पागे तालुका पंढरपूर या गावात बौद्ध मातंग दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता हा अन्याय धनाजी शिवपालक यांनी मोडून काढला शिवपालक यांनी मंदिर प्रवेश करून मंदिर सर्वांसाठी खुले केले होते. पण ते स्वतः कधीही मंदिरात जात नव्हते.जे मंदिर सर्व समाजासाठी खुले आहे फक्त दलितांना सोडून ही बाब त्यांना खटकत होती. तहसील कार्यालय पंढरपूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलने मोर्चे काढून अनेक आंदोलन त्यांनी यशस्वी केली.
त्यामुळे धनाजी शिवपालक यांना समाजभूषण पुरस्कार,
फुले शाहू आंबेडकर पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वाशिम येथे घेण्यात आलेल्या महाअधीवेशन दरम्यान धनाजी शिवपालक यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यात बौद्ध मातंग चर्मकार होलार व अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे अकरा खून प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबीयांना शासकीय नोकरी जमीन व पेन्शन मिळवून देण्यात धनाजी शिवपालक यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग सिंहगर्जना केल्यासारखे भाषण, वाघाच्या डरकळ्या फोडल्यासारख्या महापुरुषांच्या घोषणा धणाजी शिवपालक द्यायचे.. आझाद मैदान मुंबई येथे देखील त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी कंटिजंसी प्लॅन लागू होण्यासाठी आंदोलन केले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील पंढरपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाल्याच्या नंतर संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी धनाजी शिवपाल हे सज्ज झाले होते. भारतीय संविधान व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास त्यांचा चालू होता.
धनाजी शिवपालक यांचे ऐतिहासिक सामाजिक कार्य पाहून शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने धनाजी शिवपालक यांना सोलापूर जिल्ह्याच्या सर्व शासकीय उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती वरती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
प्रांत,तहसीलदार,डी.वाय.एस.पी,पोलीस निरीक्षक यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे शासन निर्णय,परिपत्रकाचे दाखले देणे व गोरगरिबांची कामे करणे यामध्ये शिवपालक यांचा हातकंडा होता. अनेक नव्याने आंबेडकरी चळवळीत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी शिवपालक एक ऊर्जा स्त्रोत होते. नवख्या पदाधिकाऱ्यांना नवख्या नेत्यांना शिवपालक नेहमी मार्गदर्शन करायचे.

माझ्या खांद्याला खांदा लावून मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख बजावने, माझा शब्द खाली न पडू देने, माझ्या सुरक्षेची काळजी घेणे, असा ऑलराऊंडर नेता आज आमच्यात राहिला नाही. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे कायम अमर राहील.
धनाजी शिवपालक यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला. मातंग समाजाला आंबेडकर वाद शिकवणारा संविधान समजावून सांगणारा, मातंग व बौद्ध या दोन्ही समाजामध्ये समन्वय साधनारा सामंजस्य निर्माण करणारा कोहिनूर हिरा म्हणजे धनाजी शिवपालक होय.
सकाळी उठले की जय भिम, झोपताना जय भीम, जय भीम हा शब्द म्हणजे शिवपालक यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला.
मी महाराष्ट्रातली अनेक हत्या व हत्याकांड पाहिले आहेत. अनेक प्रकारच्या केसेस हाताळले आहेत परंतु माझ्या डोळ्यात कधी पाणी आणले नाही. आज धनाजी शिवपालक यांनी या दगडासारख्या मनाच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आणले.

माणुस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य धनाजी शिवपालक यांच्यासाठी तंतोतंत लागु होते.

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
सदस्य जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती पुणे
8484849480

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed