मैत्री नेटवर्क सामाजिक संघटनेच्या वतीने ३ दिवसीय कार्यशाळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क मुंबई (संदेश भालेराव)दी.२७/१०/२०२१ रोजी नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके सरांच्या आदेशावरून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली
नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष
ॲड.प्रविण बोदडे यांनी सदर कार्यशाळेत ऍट्रॉसिटी ऍक्ट या विषयावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केले
तेव्हा मैत्री नेटवर्क या सामाजिक संघनटनेच्या माध्यमातून ३ दिवसांची कार्यशाळा आदरणीय रेश्मा ठोसर यांनी बांद्रा (बसस्टॅन्ड) retrete house या ठिकाणी आयोजित केली होती.या कार्यक्रमासाठी ऍट्रॉसिटी ऍक्ट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. प्रविण बोदडे यांना आमंत्रित केले होते. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टिस या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजय कांबळे उपस्थित होते. व मैत्री नेटवर्क सामाजिक संघटने चे पदाधिकाऱ्यांसह सदस्य उपस्थित होते.

You may have missed