मनसे च्या वतीने ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्याच्या विरोधात निवेदन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर सहकार महर्षी साखर कारखाना यशवंतनगर पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर माळी शुगर सहकारी साखर कारखाना माळीनगर ओंकार प्रायवेट लिमिटेड चांदापुरी यांनी अजून दर जाहीर केला नाही तसेच पुणे सांगली सातारा येथील काही कारखाने ऊस घेऊन जात आहेत ते पण अजून दर जाहीर करीत नाहीत
तसेच काही कारखाने ऊस गाळप परवाना नसताना सुरु केले जात आहेत त्यांच्या वर कारवाया केल्या नाहीत तर मनसे खर्डा भाकरी आंदोलन व बोंबाबोब आंदोलन करण्यात येईल व परवाना नसणाऱ्या कारखान्याच्या चेरमनला तालुक्यामध्ये फिरू देणार नाहीअसे निवेदन तहसीलदार निंबाळकर यांना देण्यात आले त्यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने तालुका उपादक्ष्य बाबा ननावरे व इतर मनसैनिक उपस्थित होते

You may have missed