विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मोहिते कलेक्शन चे उद्घाटन थाटात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) नातेपुते येथे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मोहिते कलेक्शन अँड होलसेल डेपो या भव्य दुमजली कापड दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,माजी उपसरपंच अतुल पाटील,एडवोकेट शिवाजी पिसाळ,एडवोकेट रणधीर पाटील, गुरु कर्चे व इतर मान्यवर उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांनी मोहिते कलेक्शन च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशांत मोहिते व निखील मोहिते यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसे चे नेते आप्पासाहेब कर्चे यांनी केले. मोहिते कलेक्शन या नवीन कापड लोकांमध्ये नवनवीन कपड्यांच्या व्हरायटीज असून दिवाळीनिमित्त ग्राहकांना 20 टक्के पर्यंत डिस्काउंट दिला आहे.