दहिगाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

दहिगाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न* 
नातेपुते (प्रमोद शिंदे)- श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव येथे सालाबाद प्रमाणे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला रथाची सुरुवात सकाळी सात वाजता भगवान महावीर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री अनिलकुमार प्रेमचंद दोशी तसेच दोशी परिवार व पायल सागर डूडू नातेपुते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मानकऱ्यांच्या यांच्या हस्ते पंचवार्षिक मानस्तंभ अभिषेक व मानस्तंभ पायाड उद्घाटन करण्यात आले. यंदाच्या रथ उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जैन मंदिरास 175 वर्ष पूर्ण झाले असून मानस्तंभ एकशे वीस वर्ष पूर्ण झाले आहेत. श्री भगवान महावीर यांच्या मूर्तीचे भव्य तीन मजली लाकडी रथा मधून मिरवणूक काढण्यात आली रथाच्या पुढे नातेपुते येथील बँड पथक तथा अकलूज येथील शांतीसागर ढोल पथक ढोल ताशे वाजून आपली कला सादर करत होते. या रथास शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत हा रथ दहिगाव व पंचक्रोशीतील सर्व समाजाचे लोक दोरीच्या सहाय्याने ओढून ग्राम प्रदक्षणा घालून वाजत गाजत रथ पंडितांच्या माळावर सभामंडपात नेण्यात आला. सभामंडपामध्ये मुनिश्री 108 विनिश्‍चलसगरजी महाराज यांचे प्रवचन घेण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांनी देखील हजेरी लावली होती विजयसिंह मोहिते पाटील राम सातपुते यांचा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त कार्यकारी सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अतिशय क्षेत्र दहिगाव जैन मंदिरा विषयी थोडक्यात..*

ऐतिहासिक वारसा लाभलेलं दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर, हे मंदिर पुरातन असून या मंदिरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिरा च्या ठिकाणी साक्षात भगवान महावीर हे एक रात्र वास्तव्य करून गेले असल्याचे सांगितले जाते. या मंदिरास 175 वर्ष पूर्ण झाले असून मंदिरासमोरील मानस्तंभास 120 वर्ष पूर्ण झाले आहेत. येथे प्राचीन कालीन भुयार आहे. या मंदिरामध्ये भगवान महावीर यांची काळ्या पाषाणातील पद्मासन अवस्थेत पाच फूट पाच इंच उंचीची विलोभनीय मूर्ती आहे, बाजूला श्री ब्रह्ममहती सागरजी महाराज चरण पादुका मंदिर आहे. त्याला चिटकून पार्श्वनाथ मंदिर आहे. तसेच सरस्वती भुवन ग्रंथालय असून भोयारा मध्ये विविध मंदिरे व मुर्त्या आहेत. त्यापैकी विद्यमान वीस तीर्थंकर संगमरवरी मुर्त्या आहेत व सहस्त्र कूट मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये श्री आदिनाथ मंदिर आहे .गाभाऱ्याच्या बाहेर पडताना श्री नेमिनाथ मंदिर आहे, त्यासोबत पार्श्वनाथ मंदिर व क्षेत्रपाल मंदिर आहे. तिथून पुढे वरती आल्यानंतर नंदीश्वर मंदिर, रत्नत्रय मंदिर पाठीमागच्या बाजूस महावीर स्वामी मंदिर आहे. पुढे वासुपूज्य मंदिर आहे. पुढच्या बाजूस बाहेर येताना धरणेंद्र पद्मावती मंदिर आहे .बाहेर मंदिराच्या डाव्या बाजूस भव्य अशी बाहुबली भगवान यांची संगमरवरी मूर्ती आहे. भिंतीच्या डाव्या बाजूला दहिगाव येथील पौराणिक मंदिराच्या इतिहासाचे तैल चित्रे रेखाटण्यात अली आहेत.

You may have missed