दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मा.एच.एल.दत्तू यांना एन.डी.एम.जे.संघटणेचे साकडे*

दिल्ली ( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क)-दलीत मानव अधिकार कार्यकर्त्यांवर खोटी केस करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाईची मागणी…

ऍड.डॉ.केवल उके यांनी महाराष्ट्रातील खोट्या केसेसबाबत जोरदार युक्तिवाद करत आयोगासमोर प्रभावीपणे बाजु मांडली.

नवी दिल्ली, इंडीयन सोशल इंस्टीट्यूट, लोधी रोड
येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मा.एच.एल.दत्तू (माजी न्यायाधिश, मा.सर्वोच्च न्यायालय) यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेचे पदाधिकारी यांनी भेटून निवेदन सादर केले. यावेळी एन.डी.एम.जे.संघटणेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप दिपके यांना खोट्या केसमध्ये गुंतवणाऱ्या पोलिस निरीक्षक वैजीनाथ मुंढेंवर कारवाही करण्याची मागणी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉ.रमेश नाथन यांनी केली.

याबाबत अधिक माहीती अशी की हिंगोली जिल्ह्यात जगदीप दिपके हे सामजिक कार्य करत असतांना पोलिसांना अनेकदा अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असतात. याचा राग मनात धरून औंढा नागनाथ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वैजनाथ मुंढे यांनी जगदिप दिपके सह मोहन दिपके यांचेवर पोक्सो कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला व नंतर दुधाळा गावातील सुधिर गिरी यांना हाताशी धरून जगदिप दिपकेंचे घर जाळले व त्यांच्या आई-वडिलांवर हल्ला केला होता.

पोलीस निरीक्षक मुंढे यांचे दलित मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पोक्सो सारखे खोटे गुन्हे दाखल करने हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. याचा निषेध म्हणुन पो.नि.मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी एन.डी.एम.जे. संघटनेच्या राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके, राज्य सचिव वैभवजी गिते, राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर व मुंबई-ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मा.एच.एल.दत्तू.यांना प्रत्यक्ष भेटुन लेखी निवेदन सादर केले. मा.एच.एल.दत्तू.साो यांनी सदर पोलीस निरीक्षक मुंढे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती एन.डी.एम.जे. संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी दिली.

You may have missed