गणेश आगमनानिमित्त विश्वविनायक मंडळाच्या वतीने मोरगाव ते पिरळे प्रेरणा ज्योत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- श्री गणेश आगमन निम्मित पिरळे ता.माळशिरस येथील श्री विश्वविनायक गणेश मंडळ यांच्या वतीने मोरगाव ते पिरळे तरुण युवकांच्या साह्याने पायी प्रेरणा ज्योत आणण्यात आली.मोरगाव ते पिरळे सुमारे 70 किलोमीटर अंतर युवकांनी चार तासात पार केले असून बारामती येथे आगमन होताच सागर देवकाते बारामती युवा नेते, आण्णासाहेब गुणवरे यांनी प्रेरणा ज्योतीचे जल्लोषात स्वागत केले. तसेच पिरळे येथे आगमन होताच ग्रामस्थांनी हे स्वागत केले गणेश मूर्ती व प्रेरणा ज्योतीचे बँजो, डीजे हलगी च्या साह्यान वाजत गाजत मिरवणूक काढून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रेरणा ज्योत आणण्यासाठीसचिन सूर्यवंशी, सोमनाथ लवटे,दीपक शिंदे,गणेश वाघमोडे,सोमनाथ लोहार,आकाश लोंढे,काशिना दादासाहेब शिंदे अमर सूर्यवंशी, गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मंडळास समजरत्न मानसिंगराव शिंदे प्रतिष्ठान यांच्याकडून विशेष सहकार्य करण्यात आले.