आदर्श शिक्षिका कु सविता साळवे मॅडम यांच्या जाण्याने, शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे या शाळेतील उपशिक्षिका व सध्याच्या एकशिव शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका कु.सविता भालचंद्र साळवे मॅडम यांचे दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्या अतिशय कामसू ,कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका तसेच इंग्रजी गणिताच्या उत्तम शिक्षिका होत्या व स्वतः महाविद्यालय काळात क्रिकेट कबड्डी खो-खो राज्यस्तरीय खेळाडू असल्यामुळे उत्तम क्रीडा शिक्षिका सुद्धा होत्या. त्यांनी पिरळे कळंबोली एकशिव शाळेतील कार्यकाळात त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ आहेत. त्यांचं मुळगाव एकशिव पूर्ण शिक्षण वालचंद नगर येथे झाले सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे उल्लेखनीय काम पाहायला मिळाले आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा रुजवण्याचं काम त्यांनी केले आहे ग्रामीण भागात स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता स्त्रियांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता सतत शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडील भाऊ व त्यांचे पाठोपाठ यांचे निधन त्यांच्या पश्चात बहिण भाऊ असा परिवार आहे. 29 वर्षाच्या सेवाकाळात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या.त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण शिक्षण विभाग गहिवरून गेला आहे.माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचेमोठे नुकसान झाले असून.अनेक विद्यार्थी व सहकारी यांनी त्यांच्याप्रती भाव व्यक्त केले त्यांना पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्यावतीने मरणोत्तर सावित्रीबाई फुलेे आदर्श शिक्षिका जाहीर करण्यात आला आहे .

You may have missed