रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संतूर रांगोळी स्पर्धा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क ( सदाशिनगर) रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे आणि विप्रो एंटरप्रायझेस प्रा. लिमिटेड (संतूर) यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांत उत्सवानिमित्त महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 7 रोजी करण्यात आले. यामध्ये एकूण 57 महिलांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रथम बक्षीस पैठणीसाडी- सौ. धनश्री मनोज दोशी, द्वितीय बक्षीस -टॉवर फॅन सौ.सारिका ज्ञानेश राऊत, तृतीय बक्षीस -वॉटर जीआर 15 लिटर सौ. रेश्मा वैभव दोशी यांना मिळाले व एकूण दहा स्पर्धकांना (अचल अनुप गांधी, अश्विनी दैवत वाघमोडे, निकिता ज्ञानदेव नाळे,सोनाली कर्णे, सुजाता चव्हाण,सुष्मा
थोरात , वंदना तानाजी केते, अनिता पिसे, प्रलगभा कारंडे, राजश्री राजगे ) उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सुप्रीम चिप्सर देण्यात आले. याप्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा) दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी, मार्गदर्शिका सौ. पूनम प्रमोद दोशी, अमित पुंज उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पंकज पानसरे सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणुगोपाल कोंडासाहेब ,सेल्स ऑफिसर विप्रो यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सकट ,जूनियर सेल्स ऑफिसर व आभारप्रदर्शन रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक समीर देशपांडे सर यांनी केले.

You may have missed