अजित पवारांनी दादागिरी करून आरक्षणाला स्टे दिलाआहे -आ.गोपीचंद पडळकर

अजित पवारांनी दादागिरी करून आरक्षणाला स्टे दिलाआहे -आ.गोपीचंद पडळकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते तालुका माळशिरस येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते.ही बैठक ओबीसी आरक्षणासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केले होती.या बैठकीत गोपीचंद पडळकर यांनी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली.ते म्हणाले की अजित दादांनी दादागिरी व मनमानी करून पदोन्नती आरक्षणाला स्टे दिलाआहे.अजित पवारां सारखा माणूस आपल्यावर अन्याय करत असेल तर सर्वांनी पेटून उठले पाहिजे.मराठा आरक्षण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे टिकू शकले नाही. यामुळे अनेक लोकांचे नुकसान होत आहे.सरकारमधील नेत्यांनी समाजात संभ्रम निर्माण केला आहे.ओबीसीच्या आरक्षणास राज्य सरकारने फक्त तारखा घेतल्या राज्य सरकारने मागास आयोग घटित करण्यासाठी उशीर केला आहे.ओबीसीच्या 346 जाती आहेत या सर्वांचं संघटन आपण करूय.
फक्त महाराष्ट्रातच ओबीसीचे आरक्षण काढले आहे. राजकीय आरक्षण पुनर प्रस्ताव मांडला पाहिजे ही बैठक राजकीय नसून उपेक्षित वंचित लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आहे.अशा प्रकारची आपल्या शैलीतील टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.    माजी सरपंच ऍड.बी.वाय राऊत म्हणाले की ओबीसीला सारथी सारखे मोठ्या प्रमाणात अनुदान मिळाले पाहिजे.तसेच या बैठकीसाठी भाजपा नेते सोपान काका नारनवर,प्रवीण काळे,योगेश कोकरे, ज्येष्ठ पत्रकार सुनील,राऊत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,अतुल बावकर,भैय्यासाहेब चांगण,शशी कल्याणी,नागेश वाघमोडे,अजित मासाळ,वैभव मासाळ,माऊली हळनवर,तसेच नातेपुते व परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.