पिरळे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पणण सोहळा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
 

पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी  सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या वतीने योजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमत माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटीलयांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजल योजनेतील  82000 लिटर  क्षमतेची उंच पाणी टाकीचे लोकार्पण सोहळा,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून काशी विश्वेश्वरकाशी  सभामंडप उद्घाटन तसेच आमदार राम सातपुते यांच्या निधीतून मंजूर झालेल्यामहादेव मंदिर सभा मंडप चे भूमिपूजन व हायमस पोलचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.हा कार्यक्रम  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते व शिवामृत संघ चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार असून या कार्यक्रमास पंचक्रोशीतील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित असणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक यांच्यावतीने करण्यातत आले आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योजक संदीप तात्या नरोळे यांनी केले आहे.