मुलींच्या स्वागतासाठी संदीप नरोळे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे-धैर्यशील मोहिते-पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रमोद शिंदेमुलींच्या स्वागतासाठी संदीप नरोळे  यांनी उत्कृष्ट काम केला आहे.सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात गावचा विकास केला आहे.असे प्रतिपादन शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पिरळे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.  ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली विविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते  सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी  मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान आ.राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता  ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदम सर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे शंकर जानकर, शांतिनिकेतन साळवे ,सुनील बनकर ,

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा चे प्रास्ताविक   संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

You may have missed