पिरळे येथे दोन ऑक्टोबर पर्यंत स्मशानभूमीचे काम सुरून केल्यास आंदोलन करणार – प्रमोद शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


पिरळे येथे दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत स्मशानभूमीचे काम तात्काळ सुरू केल्यास २ ऑक्टोबर रोजी,तहसील प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एकाच दिवशीआमरण उपोषण व धरणे आंदोलन करणार असल्याचा एन डी एम जेसंघटनेच्या वतीनेकरण्यात येणार असल्याचा इशारा एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेदन दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धाअद्याप पिरळे ता माळशिरस येथे स्मशानभूमी झालेली नाही.गावामध्ये दलित व पिचडावर्ग इतराज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून मयत झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते.व उघड्यावर अंत्यविधी करताना ताण-तणाव निर्माण होतो.त्यातून जाती-अत्याचारासारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अगोदर सुद्धास्मशानभूमी संदर्भात10 ऑक्टोबर 2022 रोजी माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्यात आले होते.त्यावर ग्रामपंचायत पिरळे यांनी अंदाजे जवळ पास एक कोटी २० लाख रुपये स्मशानभूमीचा प्रस्तावपुढील कार्यालयाकडे पाठवला होता.स्मशान भूमीसाठी ग्रामपंचायतकडे पुरेशी जागा सुद्धा उपलब्ध आहे.त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.त्यामुळे तात्काळ सुशोभित,हायटेक,आरसीसी स्मशानभूमी चे कामतात्काळ सुरू करण्यात यावे.तसेच लिंगायत समाज व मुस्लिम समाज दफनभूमी चे ही काम सुरू करण्यात यावे.दोन ऑक्टोबर पर्यंत काम न सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.

उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देताना राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना