बाह्य शरीरासोबत आत्म्याचा सुद्धा उपचार केला पाहिजे- मुनी श्री आचार्य सुयश सागरजी महाराज
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-
*श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव यांच्यावतीने अलाबाद प्रमाणे आरोग्य मी शिबिर घराच्या आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जैन मुनि आचार्य सुयश सागरजी महाराज यांनी उपस्थितताना मार्गदर्शन करताना म्हणाले बाह्य शरीरासोबत आत्म्याचा सुद्धा उपचार केला पाहिजे.जसे की लोक आजरी पडल्यावर बाह्य शरीराचा दवाखान्यात जाऊन उपचार घेतात असतात आत्म्याचा सुद्धा उपचार घेतला पाहिजे. आत्मा हा शाश्वत आहे. आपले शरीर हे आपले नोकर आहे. आपण सर्वजण मिळून एकत्र असलं पाहिजे तेव्हाच चैतन्य निर्माण होते.या प्रसंगी शुभम कीर्ती महाराज हे सुद्धा उपस्थित होते.. हे 24 वे शिबिर असून आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.यामध्ये अस्थिरोग, स्त्रीरोग ,मधुमेह, कॅन्सर ,नेत्ररोग या वेळेस हृदयरोग या सारख्या आजारांवर निदान करण्यात आले.शिबिराचे अध्यक्ष बारामती येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रमेश भोईटे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.तसेच दहिगाव येथील आजी-माजी सरपंच, पदधिकारी ग्रामस्थ व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर तेजस चांकेश्वरा यांनी केले. डॉ.सौरभ गांधी, डॉ. चिराग होरा,डॉ.विश्वनाथ चव्हाण, माधव लवटे डॉ. आशुतोष बंडगर, अक्षय दोशी डॉ. ,सनी गांधी यांनी रुग्णांना सेवा दिली.या कार्यक्रमास उद्योजक शरद मोरे,सरपंच सोनम खिलारे,संभाजी फुले सर,संदीप सावंत ऍड रणधीर पाटील, बाळासाहेब कदम, व्ही डी पाटील, रामचंद्र पाटील,विठ्ठल मोरे,नरेंद्र भाई गांधी, डॉ. प्रशांत गांधी, डॉ. उदय कुमार दोशी, शितल गांधी, संजय गांधी, वैभव शहा,अमित शहा,अविनाश दोशी तसेच दहिगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधवांनी परिश्रम घेतले.