पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने संविधान दिन उत्साहात, केक कापून आनंदोत्सव साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नातेपुते (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज व जि प शाळा पिरळे यांच्या वतीने 74 वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ,शालेय साहित्य संविधान उद्देशिका,मान्यवरांना संविधान ग्रंथ वाटप वृक्षारोपण तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ,राज्यस्तरीय रंग भरण व चित्रकला स्पर्धेचेउद्घाटन करण्यात आले,तसेच भारतीय संविधानाला 75 व वर्ष लागल्यामुळे केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.पुरोगामी महाराष्ट्र व डी.एच.डी मित्रपरिवार दहिगाव हायस्कूल दहिगाव व जि प शाळा पिरळे यांना शाळेचे बांधकाम व सुशोभीकरणासाठी पंधरा हजार रुपये चा धनादेश देण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,प्रमुख अतिथी म्हणून दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाईंजे, एन डी एम जे राज्यसचिव वैभवजी गीते ,संविधान अभ्यासक एड.सुमित सावंत, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वंदना देवी मोहिते हे होते. धनंजय देशमुख बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भारतीय संविधानच आहे.वैभव गिते बोलताना म्हणाले भारतीय संविधानावरती आपला देश चालतो बाबासाहेबांना अथक प्रश्न प्रयत्न करून तुमच्या आमच्यासाठी संविधान निर्माण केलं,पी आय प्रवीण संपांगे म्हणाले संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. आपल्या देशातील लोकांना न्याय देण्याचं काम संविधानाने केला आहे.पुरोगामी महाराष्ट्र काम अतिशय चांगले आहे.ऍड .सुमित सावंत यांनी विद्यार्थ्यांना संविधाना संदर्भात मार्गदर्शन केले .विकासदादा धाईंजे ,संदीप शेठ नरोळे, कवी सु.ग साबळे औदुंबरऔदुंबर बुधावले यांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास महाराष्ट्र विद्युत नियमक मंडळ आयोग सदस्य श्रीकांत बाविस्कर, संपादक अभिमन्यू आठवले सहाय्यक अभियंता दीपक कंकाळ,अवधूत कांबळे, मुख्याध्यापक शंकर शिंगाडे,सरपंच गणेश दडस,मा.उपसरपंच उद्योजक संदीप तात्या नरोळे, अध्यक्ष आनंदराव लवटे,माजी सरपंच संभाजी साळवे, महादेव शिंदे,अशोक तोडकर, ग्रामस्थ तसेच शिक्षक स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसंजय ढवळे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ढवळे सर, निगडे सरजब्बर मुलानी सर,अमोल खरात सर,फुले सर,मुल्ला मॅडम शेंडगे मॅडम सर्व शिक्षक स्टाफ यांनी अथक परिश्रम केलेया कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद शिंदे केले.

You may have missed