आम्हाला राग धरून काम करायचं नाही, ट्रोलिंगला कामातून उत्तर देऊ- खा रणजितसिंह निंबाळकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते ( प्रमोद शिंदे)-
आम्हाला राग धरून काम करायचं नाही तर सर्वांना सोबत घेऊन काम करायचा आहे सोशल मीडियावर ट्रोलिंगकरणाऱ्यांना  कामातून उत्तर देऊ असे प्रतिपादन माढा लोकसभा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नातेपुते येथे घेतलेल्या दिवाळीनिमित्त स्नेह मेळाव्या दरम्यान मनोगत व्यक्त केले.पुढे बोलताना ते म्हणाले आतापर्यंत रस्ते पाणी रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले आहेत.आम्ही सर्व जुने सहकारी मिळूनमतदार संघातील चेहरा मोहरा बदलणार आहोत.तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे.काही लोक स्टेजवर नाहीत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पक्षाने मला काम करायला सांगितल आहे.अशाप्रकारे मोहिते-पाटील कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चिमटा काढला.तसेच यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर,आमदार शहाजी पाटील,आ जयकुमार गोरे, मा आमदार दीपक आबा साळुंखे,सदाभाऊ खोत यांनी खासदार रंजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला.याप्रसंगी भाजपचे श्रीकांत भारतीयांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास दूध संघाचे रणजितसिंह शिंदे,ज्योतीताई पाटील चेतनसिंह केदार,राजकुमार पाटील,शिवप्रसाद चे शरद मोरे,महेश चिवटेआप्पासाहेब देशमुख, माऊली पाटील तसेच महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन के.के पाटील,बाळासाहेब सरगर,संजय देशमुखव पदाधिकारी यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक के के पाटील यांनी केले तर आभार बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केले.

– *स्नेह मेळाव्यास स्थानिक  आमदारांची दांडी * 

कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना आमदारत  रणजीत सिंह मोहिते पाटील,आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक,जयवंतराव जगताप यांची कार्यक्रमाला दांडी  असल्याने , कार्यक्रम संपल्यानंतर दबक्याआवाजात मोहिते पाटील गट व समर्थक नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले*

You may have missed