दहिगाव हायस्कूलचे संस्थापक विठ्ठलराव पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त दहिगाव हायस्कूल येथे विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

दहीगाव हायस्कूल दहिगाव चे तसेच प्रगत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. विठ्ठलराव पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष वंदना देवी मोहिते यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधान परिषद सदस्य मा.आ.रामहरी रुपनवर तर प्रमुख अतिथी म्हणून  भारतीय सैन्य दलातील कॅप्टन विवेक मोरे हे होते.रामहरी रुपनवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अंगी जिज्ञासा असली पाहिजे शून्यातून जग निर्माण करता येते.कोणत्याही गोष्टीच स्वप्न पाहिल्या शिवाय ते पूर्ण करता येत नाही.नानांनी नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध खडतर परिश्रम करून संस्थानावारूपाला आणली आहे.तसेच  कॅप्टन विवेक  मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले जीवनात स्वतःला घडवायचा असेल तर चांगल्या सवयी आणि चांगली संगत असली पाहिजे संगत माणसांना घडवते आणि बिघडवते .आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते तसेच माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराज फुले यांनी विद्यार्थी शिक्षक व पालक यांना मोबाईल पासून दूर राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वंदना मोहिते संचालक वनिता पाटील,सचिव वर्षाराणी पाटील,चेअरमन रामचंद्र पाटील, सत्यशील पाटील ह भ प ज्ञानेश्वर फुले, महाराज मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, किर्दक सर ,पत्रकार प्रमोद शिंदे,पोलीस पाटील विठ्ठल मोरे, माजी सैनिक महेश चिकणे,धन्यकुमार खिलारे, मुलानी सर,लवटे सर शिक्षक स्टाफ विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed