आंतरराष्ट्रीय

शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर  शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून  फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना  रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण  करून  त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड  लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे  यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.

नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची वैभव गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले

नितीन आगे खून खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात मा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या यशस्वी आंदोलनांमुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाने नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवले आहे.वकिलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर प्रश्नचिन्ह आहे.
मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव तानाजी गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रालय शास्त्रीभवन दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन नितीन आगे खून प्रकरणात मंत्रालयीन अधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यासाठी निवेदन दिले यावर मा.मंत्री रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना गृह विभाग,विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यासाठी पत्र लिहले आहे यावेळी रिपाई (आठवले) राज्य सचिव हरेष भाई देखणे व एन.डी. एम.जे चे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे हे उपस्थित होते.

गटविकास आधिकारयांच्या आदेशाला ग्रामसेवकांकडुन केराची टोपली

गटविकास आधिकारयांच्या आदेशाला ग्रामसेवकांकडुन केराची टोपली…

शेकडो दिव्यांगासह एन.डि.एम.जे. संघटना करनार आंदोलन…

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -हिंगोली जिल्ह्यातिल औंढा नागनाथ तालुक्यामध्ये जवळ जवळ 101 ग्रामपंचायती आहेत, व तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमानात आहे, ग्रामपंच्यायतिच्या स्थानिक निधी मधुन व चौदावा वित्त आयोगातुन मिळनारया निधी पैकी ५ टक्के निधी आपंगावर खर्च करने बंधनकारक असुन देखिल तालुक्यातिल एकाही ग्रामपंचायतिने आपंगावर/दिव्यांगावर मागिल ५ वर्षापासुन निधी खर्च केलेला नाही तालुक्यातिल सर्व ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवक व सर्व सरपंच जानुन बुजुन दिव्यांगाच्या सर्वांगिन विकासासाठी आसलेला हक्काचा निधी खर्च करन्यास टाळाटाळ करत आहेत या पुर्वी देखील नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने तालुक्यातिल सर्व दिव्यांगाचा/आपंगाचा हक्काचा निधि खर्च करून दिव्यांगाचा सर्वांगिन विकास साधावा अशी मागणी अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांच्याकडे केरन्यात आली होती त्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी जे.एम.शाहु यांनी तालुक्यातिल सर्व ग्रांमपंचायतिंना अपंगांच्या सर्वांगिन विकासासाठी निधी खर्च करावा असे आदेश दिले होते,
परंतु तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतिंनी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दिली आहे,
अपंगांना हक्काचा निधी आपंगावर खर्च होत नसल्याने एन डि एम जे संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकार्यांनी अपंगांना सोबत घेउन मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तात्काळ आपंगावर होनारा निधी अपंगांच्या कल्ल्यानासाठी खर्च करावा अन्यथा दिनांक १९/०३/२०२० रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर बोंबाबोंब आंदोलन करन्यात येईल असा इशारा देखिल निवेदनाद्वारे देन्यात आला आहे, सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हानिरिक्षक अ हाफिज अ हादी, जिल्हा संघटक विजय आनंता दिपके, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, समाधान किसन कोकाटे, संगिता बाई सखाराम धाबे, व ईत्तर अपंग बांधवांच्या स्वक्षर्या आहेत…

सारोळा खुण प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी डिवायएसपिंनी पाठवला न्यायालयात अहवाल

सारोळा खुण प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी डिवायएसपिंनी पाठवला न्यायालयात अहवाल

दोषारोपपञ न्यायालयात पाठवण्या ऐवजी आरोपींना वाचवण्यासाठी पाठवला दोषमुक्तीचाच अहवाल

जवळा नि प्रतिनिधी: आजिनाथ राऊत
उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा (बुद्रुक) येथील बौध्द समाजातील सहदेव कठारे यांची 19 आक्टोंबर 2019 रोजी पन्नास रुपये देण्याच्या कारणावरुन दांडक्याने जबर मारहाण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती,
सदर कुटुंबाला नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस संघटणेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी भेट देऊन घटनेची सखोल माहिती घेतली होती.तसेच पिडीतांसह जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,तपास अधिकारी डी.वाय.एस.पी,ना.ह.स.पोलीस अधिकारी,यांना भेटून सर्व बाबी तपासात घेऊन सखोल तपास करण्याची मागणी करुन लेखी निवेदनसुंध्दा देण्यात आले होती.
परंतु तपास अधिकारी यांनी घटणेला पाच महिने उलटुन गेले आहेत तरीसुध्दा आरोपींवर दोषारोपपञ विशेष न्यायालयात दाखल केलेले नाही याउलट खुन प्रकरणातील आरोपींना वाचवण्याच्या हेतुने खुनाच्या गुन्ह्यातुन दोषमुक्त करण्यासाठी जिल्हासञ न्यायालयात अहवाल पाठवला आहे.मा.न्यायालयाने पिडीतास बाजु मांडण्यासाठी 3 मार्च 2020 हि तारीख नेमण्यात आली होती,पिडीतांना मदत करण्यासाठी एन.डी.एम.जे.संघटना जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत तसेच अँड.बालीका बनसोडे-राऊत हे उपस्थित होते मा.न्यायालयात पिडींताची बाजु मांडण्यासाठी अँड.बालीका बनसोडे-राऊत यांनी काम पाहुन प्रभावीपणे बाजु मांडली पिडीतांना त्यांची बाजु मांडण्यासाठी पुढील 17 मार्च 2020 हि तारीख नेमण्यात आली आहे.
या घटनेचा तपास योग्यरीत्या केलेला नाही,मयताच्या अंगावरील रक्ताचे डाग पडलेले कपडे तपासात न घेता घरातील दुसरेच कपडे तपासात घेतले असल्याचे या घटणेतील मयताचे नातेवाईक सांगत आहेत.
या खुन प्रकरणाला नाट्यमय वळन लागल्याने जनतेतुन उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत सद्या तपास करत असलेल्या तपास अधिकारी डी.वाय.एस.पी.यांनी केलेल्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे तसेच डि.वाय.एस.पी. आरोपींना पाठीशी घालुन त्यांना वाचवण्याच्या उद्देशाने आरोपींच्या बाजुनेच तपास केला असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
हे खुण प्रकरण मंञालय विधान भवन येथे घेऊन जाऊन सदर कुटूंबास न्याय मिळवुन देण्यासाठी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस(NDMJ) या संघटणेच्या वतीने आवाज उठवणार असल्याचे संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्रभर दलीतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात न्यायालयीन बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ बी.जी.बनसोडे साहेब उपस्थित होते तसेच मयत सहदेव कठारे कटुंबातील मयताची मुलगी,पत्नी, मुले उपस्थित होते

नितीन आगे खर्डा खून खटल्याचे पडसाद दिल्लीत उमटले

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य सु.श्री.डॉ.स्वराज विद्वान यांची निवासस्थानी जाऊन वैभव गिते यांनी भेट घेतली

नितीन आगे खून खटल्यातून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी खटल्यातून अचानक माघार घेतल्याने नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क( प्रमोद शिंदे)- अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या आंदोलनामुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील साहेब यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाच्या गृह विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासननिर्णयानुसार नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवून एक प्रत राजू नामदेव आगे यांना पाठवली आहे.त्यामुळे राजू आगेंच्या अडचणीत भर पडली आहे.उमेशचंद्र यादव पाटलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे
मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.
महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री अनिल देशमुख व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अन्यथा मागील दिवस पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच आरोपी पुन्हा निर्दोष होऊ शकतात यापूर्वीच मा.जिल्हा सत्र न्यायालयात राजू आगे यांनी मागणी करून सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली नसल्याने न्यायालयात नितीन आगेंची बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही असा आरोप नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या राज्य समनवयक रमाताई आहिरे यांनी केला आहे.
हा खटला महत्वपूर्ण व संवेदनशील तर आहेच शिवाय आंबेडकरी जनतेच्या भावना यामध्ये गुंतल्या आहेत पुढील सुनावणी 12 मार्च 2020 ला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे आहे त्यामुळे
एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या आदेशानुसार राज्य सचिव वैभव गिते यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य सु.श्री.डॉ स्वराज विद्वान यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन नितीन आगे खटल्याचे गांभीर्य महाराष्ट्र शासनाचा हलगर्जीपणा लक्षात आणून दिला व निवेदन दिले. आयोगाच्या सदस्य विद्वान यांनी तात्काळ सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले यावेळी ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे उपस्थित होते.

संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये ॲट्रॉसिटी चा समावेश करावा- ॲड. डॉ.केवल ऊके

संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये ॲट्रॉसिटी चा समावेश करावा- डॉ.केवल  ऊके
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (प्रमोद शिंदे )-भारतीय संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये ॲट्रॉसिटी समावेश करण्यात यावा अशी मागणी एन.डी.एम.जेचे राज्य महासचिव ॲड.डॉ .केवल उके यांनी केली पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दिनांक ११ फेब्रुवारी २०२०, डॉ.सुभाष काशिनाथ महाजन वि.महाराष्ट्र राज्य (फौजदारी अपिल क्र.४१६/२०१८) या केस मध्ये दिनांक २० मार्च २०१८ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने एट्रोसिटी कायद्या संदर्भात एक महत्वपूर्ण आणि निराशाजनक निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निकलामुळे संपूर्ण देशात अनुसूचित जाती-जमाती समुदायामध्ये प्रचंड नैराष्य पसरले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती क़ायदा (एट्रोसिटी एक्ट) हां पूर्णपणे निष्क्रिय झाला होता. त्यामुळे  केंद्र शासनाने  एट्रोसिटी कायद्यात सुधारना करून अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम २०१८ पारित करुन कलम १८ऐ चा समावेश केला व कायदा पूर्ववत केला. या सुधारित कायद्याच्या कलम १८ऐ च्या घटनात्मक वैधते संदर्भात श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती. 
दिंनाक १० फेब्रुवारी २०२० रोजी तिन सदस्यांच्या संवैधानिक खंडपीठाचे जस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस विनीत सरन आणि जस्टिस एस.रविन्द्र भट यांनी या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला. या निकाला नुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने पूर्वचौकशी करण्याची काहीही गरज नाही. सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्या आधी नियुक्ती अधिकारी किंवा इतर आरोपी करिता पोलिस अधिक्षकाची परवानगी घेणे आवश्यक नाही. तसेच एट्रोसिटी च्या गुन्ह्यात न्यायालय अटकपूर्व जामिन देवू शकत नाही असे निर्देश देण्यात आले आहेत. 
” एट्रोसिटी कायद्या संदर्भात अनेक टिका टिपण्णी होत असून न्यायालयात अवास्तव याचिका दाखल होत आहेत, हे टाळण्याकरिता व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम २०१५ या कायद्याचे न्यायिक पुनरवलोकना पासून सरंक्षण करण्याकरीता भारतीय संविधानाच्या अनुसूची-९ मध्ये एट्रोसिटी कयाद्याचा समावेश कारावा” असे एन.डी.एम.जे. राज्य महासचिव डॉ.केवल उके यांनी म्हटले. 
तसेच राज्य सचिव वैभव गीते म्हणाले की”मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अतिशय स्वागतार्ह आहे, केंद्र व राज्य शासनाने या निर्देशांचे काटेकोर पणे पालन करून अनुसूचित जाती-जमाती समुदायाचे अधिकार सुनिश्चित करावे” तसेच आत्याच्या ग्रस्त पीडितांचे जमीन पेन्शन व नोकरी देऊन तात्काळ करून पुनर्वसन करावे.

उद्यापासून सरकारी बँका सलग 3 दिवस बंद

उद्यापासून  सरकारी बँका  सलग 3 दिवस बंद*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -संपामुळे (strike) सरकारी बँका (Government bank) उद्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद (Closed) राहणार आहेत. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (३१ जानेवारी) आणि शनिवार (१ फेब्रुवारी) रोजी संप पुकारला आहे. २ फेब्रुवारीला रविवार आहे. त्यामुळे सलग ३ दिवस सरकारी बँकांचं कामकाज बंद राहणार आहे.

 इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (United Forum of Bank Unions) ने दोन दिवसीय संप (strike) पुकारला आहे. १ फेब्रुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र बँक कर्मचारी (Bank employee) संपावर ठाम आहेत. बँक कर्मचारी संघटनांनी १२.२५ टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) ने फेटाळून लावली आहे. याशिवाय विशेष भत्ते आणि कायम स्वरूपी पाच दिवसांचा आठवडा या मागण्या सरकारने फेटाळल्या आहेत. त्यामुळे  बँक कर्मचारी संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्चमध्ये आणखी ३ दिवस संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व करणाऱ्या नऊ संघटनांचे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्व करते.

इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे.

न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेचे सात दिवसीय निवासी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (मुंबई) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई येथील एन एस एस तर्फे सात दिवसाच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन पँराडाईम फॉर्म हाऊस गोंडले तालुका सुधागड पाली जिल्हा रायगड येथे करण्यात आले होते.
एन एस एसचे एकूण 30 विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी डाँ.केवल उके यांनी दरवर्षी प्रमाणे अनेक कार्यक्रम राबविले जसे ग्रामीण स्वच्छता अभियान आरोग्य पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण शिक्षण प्रचार आणि प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन विद्यार्थी विकास सार्वजनिक वाचनालयाची स्थापना वनराई बंधारा बांधकाम सायबर सिक्युरिटी अवेरनेस प्रोग्राम निविध पथनाट्य व्यसनमुक्ती लसिकरण जागृकता इ.विद्यार्थ्यानी नांदगाव येथे वनराई बंधारा बाधला कृषी अधिकारी श्री गजानन अाव्हाल यांच्या मार्गदर्शनाने 300 गोणी रेती आणि माती भरून विद्यार्थ्यांनी हा बंधारा पूर्ण केला. सर्व विद्यार्थ्यांनी आणि कार्यक्रम अधिकारी डॉ केवळ उके यांनी जीवतोड मेहनत करून हा बंधारा बांधला. गायी गुरांसाठी गावातील लोकांसाठी पाणी साठवून रहावे आणि पावसाळ्यातील पाणी साठविण्यास मदत हवी या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला.
आरोग्य संबंधित विचार करता न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे पाऊल उचलले गर्भवती महिलांसाठी आवश्यक माहिती गोवर रूबेला वर उपाय लसिकरणाबंध्दल माहिती दिली आणि महत्वाचे म्हणजे टिबी यासारख्या आजारावर उपाय आणि त्यांची माहिती पथनाट्यद्वारे देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली नांदगाव येथे सर्वे करून माहिती गोळा केली आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राशी संपर्क साधला. सार्वजनिक ठिकाणी माहितीपुस्तिका वाटणे पथनाट्य संभाषणाव्दारे विद्यार्थ्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
आणि लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहिली मानकर आरोग्य सहाय्यक सौ स्वप्नजा देशमुख आरोग्य सहाय्यक श्री यशवंत वारगुडे विभागीय पर्यवेक्षक महेश भोसले आणि सुधागड तालुक्यातील सर्व आशा सेविका विद्यार्थ्यांनी नांदगाव पाली गोंडाले बावळोली भार्जेवाडी कातकरवाडी दांडवाडी दिघे दिघेवाडी इ. गावात सार्वजनिक कार्यक्रम केले. पालीममध्ये टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायबर सिक्युरिटी आणि जनरल हायजिन या विषयावर माहिती दिली. नांदगाव येथे सर्वे करण्यात आला स्वस्त आहात तर मस्त आहात सौ साक्षी वैशमपयन यांच्या मार्गदर्शनाने हा सर्वे करण्यात आला. मॅडमनी विद्यार्थ्यांना हवी ती मदत केली आणि हा सर्वे यशस्वीरित्या पूर्ण केला. अशाप्रकारे न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई येथील एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे कार्य गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे याचे पुर्ण श्रेय या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी डाँ.केवल उके यांना जाते. तसेच एन एस एसचे प्रतिनिधी आकांक्षा कुमारी शंतनु गडाले व ओमराजे पाटील यांनी देखील या कार्यात मोलाचे योगदान दिले

*पुन्हा एकदा खर्डा रक्ताने माखला* *खर्डा नितीन आगे खून प्रकरणातील मुख्यआरोपी रोहित गोलेकरसह इतरांनी दगडाने ठेचून आदिवासी मुलाचा केला खून*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे)-  अहमदनगर जिल्हय़ात खर्डा येथील एका पारधी इसमाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय- 40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात भादवि कलम 302, 34, 504, 506 ,तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी याप्रकरणी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत बाळू बजरंग पवार वय 40 याचे पैसे आरोपींकडे असल्याकारणाने मयत बाळू पवार याने घरी जाऊन पैसे मागितले म्हणून याचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान बाळूच्या घरी जाऊन घरासमोर डोक्यात दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले बाळू यास उपचाराला बार्शी येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील आकाश बाळू वाळस्कार योगेश बिभीषण वाळस्कर या दोघांना अटक केली आहे सदर घटनेचा तपास एपीआय चव्हाण करत आहेत.२०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे यांच्या खुनातील प्रकरणात मुख्य आरोपी रोहित गोलेकर यांचे नाव असून त्याने आणि इतर चार साथीदार सोबत घेऊन असाच नितीन आगे यांचा खून केला होता, नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता.  उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फुटल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते. सदर खटल्याचे पुन्हा चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत.

You may have missed