Uncategorized

*माणिक उदागे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यात वैभव गीते यांचा सत्कार*

*माणिक उदागे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यात वैभव गीते यांचा सत्कार* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून चिखली पिंपरी चिंचवड पुणे येथील गावातील गावगुंडांनी माणिक उदागे या तरुणाचा जातीयद्वेषातून अपहरण करून दगडाने ठेचून हत्या केली होती त्या जातीयवद्याना 6 वर्ष    पाठपुरवठा करूनआरोपी सागर कांन्हू खंडाळे ,सतीश दत्तात्रय बाठे, निलेश हिराजी ताटे,विशाल बाळासाहेब मेमाणे, या चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी  डॉक्‍टर केवल उके  यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न केले व माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे यास नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले म्हणून माळशिरस तालुक्याच्या वतीने वैभव तानाजी गीते एन डी एम जे राज्य सचिव यांचा सत्कार विकास दादां धाईंजे यांच्या उपस्थित करण्यात आला या वेळी पत्रकार प्रमोद शिंदे, बाबासाहेब सोनवणे, फलटण येथील पारधी समाजाचे नेते शिंदे सर ,पंढरपूर येथील  मातंग समाजाचे नेते  धनाजी शिव पालक, दत्ता कांबळे ,प्रसिद्धीप्रमुख अनिरुद्ध गायकवाड ,पोलीस पाटील  संजय नवगिरे, संगीत नवगिरे , बाळासाहेब गायकवाड काका,  रवि झेंडे, नवनाथ भागवत ,गणेश गायकवाड ,नानासाहेब गायकवाड ,विशाल गायकवाड, व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कारुंडे येथील वयोवृद्ध ताई बाजीराव गायकवाड व   कुटुंबीय यांच्यावतीने वैभव गीते यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी,रवींद्र झेंडे, नवनाथ भागवत  ,अनिरुद्ध बाजीराव गायकवाड बादल भागवत  ,नाना गायकवाड, गणेश गायकवाड ,विशाल गायकवाड उपस्थित होते

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुध्द विहार, भेकराईनगर, पुणे येथे जागतिक महिलादिन उत्साहात


दिनांक 8 मार्च 2020 रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुध्द विहार, भेकराईनगर, पुणे. येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित वृंदावनी बनसोडे, कल्पना पवार, शुभांगी पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर केक कापून महिला दीन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी मा. दिगंबर कदम, मा. राजेश पोळ यांनी महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. बाबासाहेब कांबळे यांनी केले.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक आयु. शिवाजी वाघमारे, अध्यक्ष राजीव प्रधान, सचिव प्रवीण नलावडे, राहुल लंकेश्र्वर, हिंदुराव कांबळे, दशरथ हावळे, अमोल जोगदंड, नितिन कांबळे, मयुर गायकवाड, सचिन नरवाडे, व संस्थेचे सर्व सदस्य उपासक, उपासिका उपस्थित होते.

शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर  शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून  फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना  रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण  करून  त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड  लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे  यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आज गुरुवार दि. 12 मार्च रोजी राजसभा निवडणुकीचा अर्ज भरणार




पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )मुंबई दि. 11 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे आज गुरुवार दि.12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. राज्यात भाजपशी युती असल्याने रिपाइं एन डी ए चा घटक पक्ष आहे. भाजप रिपाइं युती चे उमेदवार म्हणून ना रामदास आठवले उद्या राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार असून या वेळी त्यांच्या समवेत भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भाजप प्रदेश अध्यक्ष चांद्रकांतदादा पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील.

येत्या दि. 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 7 जागांसाठी राज्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 मार्च पर्यंत आहे. ना रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत येत्या 2 एप्रिल रोजी संपत आहे.ते यापूर्वी 2014 च्या राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून ना.रामदास आठवले यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
राज्यसभेसाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणुन रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. उद्या गुरुवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ना रामदास आठवले राज्यसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज विधानभवन येथे भरणार आहेत. भाजप ने मित्रपक्ष म्हणून राज्यसभेची महाराष्ट्रातील एक जागा रिपाइं( आठवले) या पक्षाला सोडली असल्याने ना रामदास आठवले आपल्या रिपाइं च्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

ईगल फौंडेशनचा राज्यस्तरीय गरुडझेप गौरव सोहळा थाटात

ईगल फौंडेशनचा राज्यस्तरीय गरुडझेप गौरव सोहळा थाटात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )-राजश्री शाहु स्मारक कोल्हापूर येथे रविवार दि 8/3/2020 याठिकाणी ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय गरूडझेप कार्यगौरव सोहळा अत्यंत उत्साहात,थाटात व प्रचंड गर्दीमध्ये पार पडला.
हा दैदिप्यमान सोहळा आयोजित करून तो अतिशय सुरेख ,शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडला.प्रा तौहिद मुजावर यांचे यावेळी मनशांती हा यशाचा मूलमंत्र या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.प्रा.मुजावर यांचे व्याख्यान ही एक सर्वांसाठी एक पर्वणीच ठरली.अत्यंत प्रेरणादायी विचारांनी त्यांनी सर्व सभागृह खिळवून ठेवल होते .यावेळी आमदार श्री महादेव जानकर,सौ.अरुंधती धनंजय महाडिक, पोलीस निरीक्षक संजय मोरे,विलासराव कोळेकर,यांनी समारंभास शुभेच्छा दिल्या. व्यासपिठावर डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, लयभारी संदेशचे संपादक प्रशांत लाड, जिजामाता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष कुलकर्णी, आदींची विशेष उपस्थिती होती.या सोहोळ्याचे नेहमीप्रमाणे प्रभावी सुत्रसंचालन श्री कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.स्मिता गिरी यांच्या ‘काव्य-विभोरी ‘ या कविता संग्रहाचे व दै.झुंजार सेनापती यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या प्रसंगी सौ.स्मिता लंगडे,डॉ.लक्ष्मी भारती,सौ.अरूंधती महाडिक ,सौ.पुजा कदम,,कु.जयश्री चव्हाण, डॉ.राजेंद्र पाटील,कँप्टन गणपतराव घोडके,प्रा.तौहिद मुजावर, प्रा.डॉ.महेशकुमार मोटे आदी कर्तृत्ववान व्यक्तींना दर्जेदार मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ईगल फौंडेशनचे उपाध्यक्ष सागर पाटील, शेखर सुर्यवंशी,प्रकाश वंजोळे, प्रा.तुकाराम पाटील ,सुभाष भोसले, दिपक पोतदार, सौ.श्रद्धा पाटील, अशोक शिंदे,कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी ,तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सचीन बैरागी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संजय नवले,रायगड संपर्कप्रमुख संजय गायकवाड आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

तुकाराम गाव तांबेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात*

तांबेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) तुकाराम गाव तांबेवाडी ता. माळशिरस येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाची परंपरा आशि की माळशिरस तालुक्यातील हे पश्चिमेकडील शेवटच्या टोकाचे गाव आहे. हा उत्सव एकशे आठ वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. या गावाला तुकाराम गाव असे म्हटले जाते 1912 पासून तुकाराम महाराज बिजो उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाची सुरुवात तरडगाव चे ह.भ.प बापू दादा महाराज यांनी केली आहे. तर ह.भ.प  सोनोपंत मामा दांडेकर महाराज यांनी 1962 साली संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात बीज उत्सव होत होता आता हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक बीजो उत्सवासाठी या तुकाराम गावात येतात. .याठिकाणी दरवर्षी 3000 किलोचा महाप्रसाद केला जातो. या उत्सवासाठी गावातील ग्रामस्थ तन-मन-धनाने अहोरात्र काम करतात हा सोहळा दरवर्षी होळी आणि धुलीवंदन दरम्यान येतो परंतु या गावात एकशे आठ वर्षापासून धुलीवंदन, धुळवड साजरी केली जात नाही. हा सोहळा नवमीला सुरू होतो व बीजेला समाप्त होतो. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते व कीर्तन सेवा ठेवली जाते. याहीवर्षी ही सप्ताहाचे आयोजन केले होते या सप्त्या मध्ये.मध्ये ह-भ-प दत्तात्रय महाराज गलांडे लासुरणे, ह-भ-प सोमनाथ महाराज घोगरे देशमुखवाडी, ह भ प सुनील महाराज यादव, ह भ प केशव महाराज लासुरने, ह भ प हनुमंत महाराज फुले, ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह-भ-प कैलास महाराज केंजळे, ह भ प माणिक महाराज निंबाळकर चे कीर्तन सेवा झाली आहे.धुलीवंदन या दिवशी दिंडीचे आयोजन केले जाते. व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी चे पूजन करून गाव प्रदक्षणा वाजत गाजत मोठ्या उत्साहात केली जाते दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन केले जाते अशाप्रकारे आगळावेगळा कार्यक्रम तुकाराम गाव तांबेवाडी येथे दरवर्षी साजरा केला जातो .

तांबेवाडीत संत तुकाराम महाराज बीजोत्सव १०८वर्षाची परंपरा उद्या होणार मोठा उत्सव


          पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) : तांबेवाडी (तुकाराम गाव) ता. माळशिरस येथील श्री संत तुकाराम मंदिरात दिनांक ४ मार्च ते ११ मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहासह तुकाराम गाथा पारायण महोत्सव संपन्न होत आहे यावर्षी संत तुकाराम महाराज बिजोत्सवाचे १०८ वे वर्ष असून तांबेवाडी (तुकाराम) गावात प्रसन्न व भक्तिमय वातावरण झाले आहे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह-भ-प दत्तात्रय महाराज गलांडे लासुरणे, ह-भ-प सोमनाथ महाराज घोगरे देशमुखवाडी, ह भ प सुनील महाराज यादव, ह भ प केशव महाराज लासुरने, ह भ प हनुमंत महाराज फुले, ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह-भ-प कैलास महाराज केंजळे, ह भ प माणिक महाराज निंबाळकर यांची कीर्तन सेवा चालू असून दिंडी पालखी  प्रदक्षिणा मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे सर्व परमार्थ प्रेमी भाविक आणि परिसरातील सर्व श्रोते  जनानी लाभ घ्यावा असे संयोजकांनी कळविले आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मौजे तांबेवाडी गाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे पवित्र ते कुळ पावन तो देश | जिथे हरीचे दास जन्म घेते | अशा पवित्र भूमीमध्ये स्वल्प वाटे चला जाऊ | वाचे गाऊ विठ्ठला | या न्यायाने वै. हरीभक्त पारायण सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर आणि वै. गुरुवर्य राजाराम बापू पवार, शेलार मामा, साधू अण्णा शिंदे महाराज यांचे आशीर्वादाने आयोजित केले आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी तनमनधनाने श्रवण सुखाचा आनंद घ्यावा असे आव्हान ग्रामस्थ तांबेवाडी (तुकारामगाव) यांनी केले आहे

नितीन आगे खर्डा खून खटल्यातील विशेष सरकारी वकील यादव यांची अचानक माघार*

नितीन आगे खर्डा खून खटल्यातील विशेष सरकारी वकील यादव यांची अचानक माघार*
* एन.डी.एम.जे करणार आजाद मैदानावर आंदोलन – वैभव गिते*

चौकट* खटल्याला नाट्यमय वळण *

* वैयक्तिक कारणांमुळे मी या खटल्यातून माघार घेत आहे .सदर खटला चालवण्यासाठी प्रवास खूप दूरचा आहे व मला एवढ्या लांब प्रवास करणे शक्य नाही म्हणून मिया खटल्यातून माघार घेतली आहे असे मत विशेष सरकारी वकील उमेश चन्द्र यादव पाटील यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ला बोलताना सांगितले.*

नातेपुते (प्रमोद शिंदे )अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या रेट्याने शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाच्या गृह विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासननिर्णयानुसार नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवून एक प्रत राजू नामदेव आगे यांना पाठवली आहे.त्यामुळे राजू आगेंच्या अडचणीत भर पडली आहे.उमेशचंद्र यादव पाटलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे
मा. उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह व सामाजिक न्याय विभागाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अन्यथा मागील दिवस पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच आरोपी पुन्हा निर्दोष होऊ शकतात यापूर्वीच मा.जिल्हा सत्र न्यायालयात राजू आगे यांनी मागणी करून सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली नसल्याने न्यायालयात नितीन आगेंची बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही असा आरोप दलित संघटनांकडून केला जातोय
हा खटला महत्वपूर्ण व संवेदनशील तर आहेच शिवाय आंबेडकरी जनतेच्या भावना यामध्ये गुंतल्या आहेत पुढील सुनावणी 12 मार्च 2020 ला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे आहे ज्यांना शक्य आहे अशा सर्व नेत्यांना,कार्यकर्त्यांना,वकिलांना,समाजबांधवांना,नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी मदत करण्याची विनंती केली आहे
तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्यास आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी दिला आहे.

नातेपुते नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनात मोर्चा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे):  नातेपुते तालुका माळशिरस  येथे  नागरिकत्व  सुधारणा कायदा  समर्थ समर्थनात भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी  आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की  हा कायदा  हिंदू-मुस्लीम  यांच्या हिताचा असून  सर्वांनी  या समर्थन केले पाहिजे. या देशाचं भाग्य आहे की हा देश चांगल्या लोकांच्या हातात गेला आहे. तसेच यावेळी  अतुल तेरखेडकर, सरपंच भानुदास राऊत प्रा .हनुमंत दुधाळ हनुमंत सुळ ॲड. प्रदीप गावडे, सचिन शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, सरपंच ऍड. भानुदास राऊत, उपसरपंच सुनंदा उराडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, गटनेते दादासाहेब उराडे, धनगर आरक्षण कृती समितीचे हनुमंतराव सूळ, बाळासाहेब सरगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक सचिन शिंदे, राहुल पदमन, प्रवीण काळे, गणेश पागे, संजय उराडे, नंदकुमार धालपे, देविदास चांगण, रूपेश इंगोले व हजारो नागरिक उपस्थित होते. राहुल पदमन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रवीण काळे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात
. सुरवातील संविधान  पूजन करून करण्यात आली .  महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून,  रॅली काढण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकामध्ये  तिरुपती पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे यांना निवेदन देण्यात आले तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकता सुधारणा कायदा समर्थन समितीने यांनी विशेष परिश्रम घेतले. 

लिखिते व सिंग परिवारासारखे यापुढे सत्यशोधक विवाह सार्वजनिक ठिकाणी झालेस बहुजन समाज जागृत होईल- खासदार श्रीनिवास पाटील

लिखिते व सिंग परिवारासारखे यापुढे सत्यशोधक विवाह सार्वजनिक ठिकाणी झालेस बहुजन समाज जागृत होईल- खासदार श्रीनिवास पाटीलब्राम्हण कुटुंबात प्रथमच पुण्यनगरित सत्यशोधक पध्दतीने विवाह संपन्न झाला” !!!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे– फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फॉउंडेशन, पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे प्रथमच ब्राम्हण कुटुंबात महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यसोधक पध्दतीने सत्यशोधक अॅड.सिद्धार्थ विठ्ठलराव लिखिते,एल एल एम,लंडन स्थायिक (पुणे ) आणि सत्यशोधिका डॉ.कवल प्रित कौर हरभजन सिंग, लुधियाना – पंजाब,लंडन उच्चशिक्षित वधु वर यांचा पुणे येथील श्रृती मंगलकार्यालयात निकतेच संपन्न झाला.हा सत्यशोधक विवाह विधिकर्ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे चे माजी शहराध्यक्ष व महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशनसमिती, महाराष्ट्र शासन चे सदस्य आणि संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक ह्यांनी महात्मा फुले यांचे वेशभुषेत तर प्रा.गायत्री लडकत ह्यांनी सावित्रीबाई फुले यांचे वेशभुषेत सहकारी हनुमंत टिळेकर,प्रा.सुदाम धाडगे यांचे सोबत मराठी,हिन्दी आणि इंग्रजी भाषेत प्रथमच लावला होता. या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की या विद्यानयुगात अंधश्रद्धा,कर्मकांड , महुर्त न पहाता लिखिते आणि सिंग परिवाराने सत्यशोधक विवाह करून जो आदर्श दिला ती वाटचाल पुढे चालू रहावी.तसेच असे विवाह रघुनाथराव ढोक यांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी लावले तर बहुजन समाज लवकर जागृत होईल,यासाठी मोलाची मदत करु असे आश्वासन दिले तर माजी मंत्री व पुणे विद्यार्थी गृहाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष राधा कृष्ण विखे पाटील यांनी आशीर्वाद पर शुभाशीर्वाद दिले.या सत्यशोधक विवाहाचे नोंदणी रजिस्टर मध्ये साक्षीदार म्हणून खासदार श्रीनिवास पाटील व माजी मंत्री विखेपाटील यांनी सह्या केल्या हे विशेष होते तसेच यांचे शुभहस्ते वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व महात्मा फुले आणि सावित्रिमाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली. मुंबई, नाशिक पुणे येथील विविध 71 शैक्षणिक संस्था पदाधिकारी यांना भारतीय सविंधान 2014 व 2019, सावित्रिमाई फुले व इतर ग्रँथ 71वा प्रजासत्ताक दिनानिमित भेट दिले. विवाह प्रसंगी डॉ. देवीसिंग शेखावत , पुणे विध्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे,कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे , कुलसचिव सुनील रेडेकर व सर्व विश्वस्त न्यायाधीश,वकील, परदेशी मित्र परिवार उपस्थित होता. हा विवाह आंतरराष्ट्रीय , आंतरराज्यीय , आंतरधर्मीय , आंतरजातीय पुण्यनगरित पहिला सत्यशोधक पद्ध्तीने संपन्न झाल्यामुळे व अक्षता म्हणून फुलांच्या पाकळया व टाळया वाजवून अनेकांनी वधु वर व त्यांचे परिवारांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुरुवातीला वधु वरांचे हस्ते महात्मा फुले आणि सावित्रिमाई फुले यांचे पुतळयास व कै. विठ्ल लिखिते यांचे फ़ोटो ला श्रीमती पौर्णिमा लिखिते यांनी पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ ढोक,आभार प्रदर्शन प्रा.कांबळे तर मोलाचे सहकार्य मंगेश लिखिते,आकाश ढोक यांनी केले.या वेळी मोठ्या संख्येने ब्राम्हण व इतर समाज उपस्थित होता.