Uncategorized

आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व रविंद्र बनसोडे काळाच्या पडद्याआड

आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व रविंद्र बनसोडे काळाच्या पडद्याआड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

आंबेडकरी चळवळीचे तरुण तडफदार नेतृत्व रविंद्र बनसोडे कोरोनाशी लढताना पुणे येथे उपचारादरम्यान काल रात्री अखेरचा श्वास घेतला. रविंद्र बनसोडे हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण आणि तडफदार नेतृत्व होते त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पीडितांना न्यायालयीन लढाईमध्ये मदत केली आहे. त्यामध्ये जांब येथील चंद्रकांत गायकवाड हत्याकांड प्रकरण, पुणे येथील माणिक उदागेहत्या प्रकरण, बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या, प्रकरण खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरण अशा अनेक पीडितांना त्यांनी न्यायालय लढाईमध्ये मदत केली आहे.तसेच अनेक कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते स्वतः महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांसाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट व माहिती अधिकार यासारख्या कायदेशीर प्रशिक्षण शिबिर घेत असत ते स्वतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून एम एस डब्ल्यू व पॉलिटिक्स या विषयावरती पी.एच.डी केली होती.2002 पासून ते नागार्जुन प्रशिक्षण केंद्र नाग लोक नागपूर येथून दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत होते. तसेच त्यांनी पुणे येरवडा येथील माणुसकी संस्था येथे अनेक पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. व ते नॅशनल दलित फॉर जस्टिस या संघटने मध्ये डॉक्टर केवल उके व वैभव गीते यांच्यासोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम करत होते. तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा पुणे प्रतिनिधी पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केला आहे.त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीमध्ये शोककळा पसरले आहे व सर्वत्रर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे .अशा या गुणी चळवळीच्या कार्यकर्त्याला व त्याच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम.

शाहरुख मुलाणी यांची रासप अल्पसंख्याक आघाडी नातेपुते शहर अध्यक्ष पदी निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्याक आघाडी नातेपुते शहराध्यक्षपदी शाहरुख मुलाणी यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी नितीन धायगुडेसाहेब मराठवाडा प्रभारी, अल्पसंख्याक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शाहिद मुलाणी, सोलापूर जिल्हा युवक आघाडी प्रभारी माऊली सरक, अल्पसंख्याक आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रियाजा आतार अल्पसंख्याक आघाडी माण तालुकाध्यक्ष अलताफ मुलाणी रा स प नेते मनोज लांडगे, बाबा बोडरे, तानाजी बोडरे, आनंद दहिवाळ, आदी मान्यवर उपस्थित होते

आंबेडकर जयंतीनिमित्त साई सेवा दल च्या वतीने नातेपुते पोलीस स्टेशनला ऑफिस टेबल भेट

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या साई सेवा दल या संस्थेच्या वतीने नातेपुते पोलीस स्टेशनला ऑफिस टेबल भेट देण्यात आला नेहमी साई सेवा दलाच्या वतीने अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात साई सेवा दल संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकांना व संस्थांना मदत केली जाते टेबल भेटे देते वेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे API मनोज सोलनकरसाहेब,साई सेवा दल संस्थेचे अध्यक्ष गुरु कर्चे,राष्ट्रीय समाज पक्षाचेपक्षाचे अल्पसंख्याक पच्शिम महाराष्ट्र प्रभारी  शाहिद मुलाणी, उद्योजक बाबासाहेब बोडरे, माजी ग्रामपंचायत सदस्य समिर सोरटे, सोलापूर जिल्हा युवक प्रभारी माऊली सरक, अल्पसंख्याक आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रीयाज आतार, सोमनाथ भोसले, विशाल भुसारे कृष्णा थोरात,आदि मान्यवर उपस्थित होते.

कल्याण येथे भीम जयंती उत्साहात साजरी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –दिनांक १४/०४/ २०२१ रोजी पहाटे ००:०० वाजता कल्याण येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण (पश्चिम)येथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्ण कृती पुतळ्यास पुष्पहारअर्पणकरूनअभिवादन.
एन.डी.एम.जे.राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डॉ.केवलजी उके सर यांच्या हस्ते करण्यात आले व मान वंदना कार्यक्रम संपन्न झाला. कल्याण डोबिवली शहर जिल्हा अध्यक्ष अॅड प्रवीणजी बोदडे यांनी सकाळी मोहने व कल्याण पुर्व येथे लाडु वाटुन जयंती चा आनंद व्यक्त केला तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे भारतीय संविधाना च्या १०० प्रत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोफत वाटुन जयंतीचा
आनंद वेक्त केला व जयंतींच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला. जयंती साजरी करण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली अध्यक्ष ॲड .प्रविण बोदडे याच्या हस्ते पुष्प अर्पण करून वअगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली तसेच एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे यांच्या वतीने सुध्दा त्यांच्या ऑल.इंडिया एस.सी.एस.टी रेल्वे असोसिएशन कल्याण OHE शाखेच्या कार्यालयात सुध्दा रेल्वे कर्मचाऱ्यां सोबत सुध्दा छोट्या खाणी जयंती साजरी करण्यात आली नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टिसचे ठाणे जिल्हा संचिव विनोद एस रोकडे यांनी जयंती निमित्त कल्याण पुर्व मधील कर्तव्य निष्ठ डॉक्टर ना कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानचिन्ह दिले व डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती च्या शुभेच्छा दिल्या नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस चे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव व कल्याण डोंबिवली शहर सचिव संदीप मधुकर घुसळे सर,
वंचित बहुजन आघाडी वार्ड क्र ९४ चे जेष्ठ कार्यकर्ते विक्रम जाधव व अविनाश बावस्कर बाळु कुडवे राजेन्द्र सोनावने ,अविनाश जाधव, बौद्धचार्य आनंदजी निरभवणे याच्या उपस्थित बुध्द वंदना घेण्यात आली व नागरिकांना जयंती निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या

 

नातेपुते येथे महामानवास अभिवादन

नातेपुते येथे महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते वेळेस बुद्ध वंदना घेताना बोध आचार्य समीर सोरटे व प्रकाश सोरटे व कार्यकर्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नातेपुते तालुका माळशिरस येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. नातेपुते येथे सालाबादप्रमाणे 1 एप्रिल पासून भीम जयंती जल्लोषात सुरुवात होत असते मोठ मोठे बॅनर संपूर्ण नातेपुते शहरात रोषणाई व निळ्या झेंड्याची झगमगाट तसेच फटाक्यांचे मोठ्या प्रमाणात अतिषबाजी केली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात नातेपुते येथील जयंती चा प्रथम क्रमांक येतो परंतु यावर्षी एक एप्रिल रोजी फक्त सुंदर अशी लाईट डेकोरेशन ची रोषणाई करून 14 तारखेला बारा वाजता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच सकाळी दहा वाजता धम्म ध्वजारोहण व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच प्रतिमा पूजन करून  ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, एडवोकेट पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य साक्षी ताई सोरटे,सरपंच कांचन लांडगे,उपसरपंच अतुल पाटील,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश  साळवे ,नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर,सामाजिक कार्यकर्ते समीर सोरटे,रोहित सोरटे,विनोद रणदिवे,संघर्ष सोरटे,तसेच भिमजयंती उत्सव समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

प्राध्यापक साळवे सर मनोगत व्यक्त करताना
अभिवादनस उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व इतर मान्यवर
अभिवादन कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक करताना रोहित सोरटे
नातेपुते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आली
विराज डेकोरेटर भैय्यासाहेब सोरटे च्या वतीने डेकोरेशन करण्यात आले

पिरळे येथे महात्मा फुले व आंबेडकर जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पिरळे ता.माळशिरस येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.हे शिबिर कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या महाराष्ट्रात रक्त साट्याच्या चे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार करण्यासाठी अडचणी येत आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील रक्तदात्यांना व सामाजिक संस्थांना आवाहन केले होते की रक्तदान शिबिर आयोजित करावे.याच अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने पिरळे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन पिरळे गावचे नूतन सरपंच संदीप नारोळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त संघटनेचे मारुती सरगर,हनुमंत धाईंजे होते.महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते महादेव होळकर,राजाभाऊ नरोळे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले ,ग्रामपंचायत सदस्य संदीप कालिदास दडस ,गोरख साळे, शिवाजी लवटे,गणेश दडस, दादासाहेब शिंदे,नानासाहेब शिंदे,माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे, महादेव शिंदे, दत्ता रुपनवर,दादासाहेब ठावरे,प्रकाश ठवरे, अजित शिरतोडे, हनुमंत बुधावले,विजय खंडागळे,सचिन खिलारे,नाथा साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ग्रामस्थांच्यावतीने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला बापू खिल्लारे ,विवेक गोरे,प्रतीक तोडकर,अधिकराव यमगर,शिवम राहुडकर,अक्षय सुळ,सुजित राहुडकर, प्रकाश ठवरे, किरण सोरटे,बापू पडळकर,राजू बामनिया त्यांच्यासह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदाम बुधावले,मयुर साळवे,नितीन खिलारे,यांनी परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून विकास दादा धाईंजे यांची उपस्थिती
महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना पिरळे ग्रामस्थ
पिरळे गावचे विद्यमान सरपंच संदीप नरोळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य भटक्या फक्त संघटनेचे चे नेते मारुती सरगर व हनुमंत धाईंजे यांनी केले रक्तदान राज्य भटक्या फक्त संघटनेचे चे नेते मारुती सरगर व हनुमंत धाईंजे यांनी केले रक्तदान
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटना अध्यक्ष अजित शिरतोडे यांची सदिच्छा भेट
माजी सरपंच दत्ता रुपनवर व शिवाजी लवटे पाटील प्रतिमा पूजन करताना
नितीन सोरटे सर यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले

कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची अलौकिक ताकत म्हणजे वैभव गिते …ऍड.डॉ.केवल उके

सोने हिरे व मोत्यापेक्षा मौल्यवान सामाजिक काम करणारा अष्टपैलू सामाजिक कार्यकर्ता आहे वैभव गिते..प्रवीण मोरे स्वीय सहाय्यक मा.मंत्री रामदास आठवले,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार,

उभरत्या तरुण कार्यकर्त्यास संपूर्ण पाठबळ दिल्यास तो काय करून दाखवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव गिते…विकास दादा धाइंजे (माजी सरपंच माळशिरस)

बदलत्या जीवनशैलीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना एका माळेमध्ये गुंफण्याचे काम वैभवजी गीतेंना लीलया जमते…संपादक लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल

न्याय हा मागून मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यातून तमाम पीडितांना न्याय मिळून देणारा समतादूत सामजिक जीवनातील परीस ज्याला सहवास मिळेल त्याच सोन करणार सुवर्ण व्यक्तिमत्त्व वैभव गीते आहेत ..अँड अमोल सोनवणे ( बारामती)

समाजाने स्वाभिमान बाळगावा असे समाजमान्य नेतृत्व वैभव गिते…ऍड.सुमित सावंत

प्रामाणिक स्वाभिमानी हे शब्द खरे वाटतात वैभव गीतेंच्या कडे पाहिल्यावर…चर्मकार नेते आजीनाथ राऊत

राजकारणात जाऊन हवे ते पद घेऊ शकणारा पण आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक राहून सामाजिक काम करीत राहणारा समंजस नेता म्हणजे वैभव गिते होय..रमाताई आहिरे

समाजकारण व राजकारणात मोठा नेता असला तरी घरात मोठ्या भावाला वडिलांचा दर्जा देऊन मोठ्या भावाच्यापुढे अगदी नम्र राहून भावाचा आदर करून कुटुंब एकत्र ठेवणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठणारा नेता व माझा जिवलग मित्र आयु. वैभव गिते आहे……आयु. प्रवीण नलावडे सर (वाडिया कॉलेज, पुणे)

महाविद्यालयीन जीवणापासुनच मैत्री या शब्दाला जागणारा जिवलग मित्र आहे वैभव….डॉ.अमोल सावंत

कोणत्याही संकटात परिस्थितीवर स्वार होऊन विजय मिळवायच्या सवयीचा वैभव माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे…भारत गायकवाड

राज्यात अन्याय अत्याचार झाल्यावर अस्वस्थ होणारा अन्यायाविरुद्ध लढून न्याय खेचून आणणारा एकमेव नेता वैभव गिते होय….संजय नारायण झेंडे

वैभव तुझ्यासारखा लढवय्या नेता तयार झाला हीच आमची श्रीमंती…. जेष्ठ नेते पी.एस.गायकवाड

हालाखीच्या परिस्थितीत राहणारा पण प्रस्थापितांना शरण न जाणारा आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी… निवृत्ती (तात्या) रोकडे.

ज्यांच्या बोटाला धरून चळवळ शिकलो त्यांचा आदर,सन्मान कसा करावा याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण…. पंचशीला कुंभारकर

माझ्या थोरल्या भावाच्या खुणानंतर मला शासकीय नोकरी लावून माझ्या कुटुंबाचे पुनर्वसन करणारा नेता वैभवजी गिते आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून मोठ्या भावाची हत्या झाल्यावर मला शासकीय नोकरी लावून आमची उपासमार थांबवणारे सामाजिक कार्यकर्ते वैभव गिते हे आहेत.

नितीन आगेची हत्या झाल्यावर हजारो आले आणि आश्वासने देऊन गेले फक्त एकमेव वैभव गिते आहेत त्यांनी माझ्या मुलीला शासकीय नोकरी लावली व माझे पुनर्वसन केले…. राजू आगे (खर्डा अहमदनगर)

सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन समान न्याय करणारा राजा आहे वैभव गिते..मातंग समाजाचे नेते धनाजी शिवपालक

होलार समाजावर अन्याय झाल्यावर मोठ्या ताकतीने पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणजे वैभव गिते होय…संजय गेजगे होलार समाजाचे नेते

जनतेचा प्रामाणिक विश्वासू चेहरा वैभवजी गिते-

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संपादक प्रमोद शिंदे

संपादकीय

-वैभव तानाजी गिते हे राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेचे राज्याचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. राज्यात ॲट्रॉसिटी कायदा तज्ञ कार्यकर्ता व व्याख्याता म्हणून वैभव गीतेंची घराघरांमध्ये ओळख आहे. अनेक शासन निर्णय,परिपत्रके दिनांकासह तोंडपाठ असणारा आंबेडकरी चळवळीतील आक्रमक प्रामाणिक लढवय्या नेता म्हणून वैभव गीतेंचा नावलौकिक आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परिवर्तनवादी चळवळीतील नेत्यांची आदरयुक्त पओळख असणारा तरुण कार्यकर्ता म्हणूनसुद्धा वैभव गितेंचे नाव आदराने घेतले पजाते.ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या सारख्या कायदा पतज्ञांचे सखोल मार्गदर्शन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची भर तारुन्यापासूनच सोबत लाभल्याने आयुष्याला कलाटणी मिळाली असे वैभव गिते कित्येकदा निसंकोचपणे सांगतात.ज्यांच्या बोटाला धरून शिकलो त्यांच्याप्रती आजन्म आज्ञाधारक बनून अचूक ध्येय गाठेन असे अनेकवेळा सभांमध्ये बोलतात त्यांच्या भाषणांमध्ये शिव,फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेची आक्रमकता,अचूकता,पारदर्शकता,सत्यस्थिती व सद्यस्थिती नवीन जुन्या उदाहरनासह अफलातून मंडण्याचे कौशल्य असल्याने जनता तासंतास वैभव गीतेंचे विचार ऐकायला बसते.
पीडित कुटुंबास दिलेले आश्वासन आणि शब्द खरा करण्यासाठी प्राण पणाला लावणारा नेता म्हणून तरुणांमध्ये क्रेज व चर्चा असणारा नेता म्हणजे वैभव गिते होय!
चळवळीतील कार्यकर्ता जगला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील एकमेव बोलके उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वैभव गिते व विकास धाइंजे या गुरूशिष्याच्या जोडीने साडेतीन लाखाचा एक असे 157 मिनी ट्रॅक्टर वेगवेगळ्या जाती-धर्माच्या बचतगटांना मिळवुन दिले आहेत.जिल्ह्यात अनेक जाती-धर्माच्या नागरिकांच्या घरकुलांना हक्काची शासकीय जागा मिळवून दिली.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वैभव गीतेंच्या कामाचा आवाका आणि तळमळ पाहून सोलापूर जिल्ह्याच्या महत्वाच्या अश्या म्यान्यूअल स्कॅवेंजिंग कमिटी वर विद्यमान सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.पहिल्याच बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.अशी अनेक रचनात्मक कामे सांगता येईल.आंबेडकरी चळवळीतील अनेक प्राध्यापक, विचारवंत,लेखक,वकील,शिक्षक,गायक,शाहीर वैभव गीतेंवर अतोनात प्रेम करतात.एवढ्या कमी वयात महाराष्ट्रभर फिरून जनतेचे प्रश्न सोडवणारा गावपातळीपासून ते राष्ट्रीय प्रश्नांची उकल असणारा जिल्ह्यात,मंत्रालयात,व केंद्रीय शास्त्रीभवन येथे कामाचा व नावाचा दबदबा असलेला नेता म्हणजे
वैभव गिते होय

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा महाराष्ट्रातील एकमेव तरुण तडफदार नेता वैभव तानाजी गीते यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तरुणाई व अत्याचार पीडितांचा आशेचा किरण वैभव गिते
कणखर नेतृत्व
विकास दादा धाईंजे यांचा पट्ट्या

ऐट्रोसिटी कायद्यातील कलम दलितांवर झालेल्या गुन्ह्यात आपोआप लावले जाणे अयोग्य-मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक- ऍड. डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे –दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.डॉ.डी.वाय.चंद्रचूड आणि एम.आर.शाह यांच्या खंडपिठाने आंध्र प्रदेशातील अंध दलित मुलीवरील बलात्काराच्या खटल्यातील अपिलात ऐट्रोसिटी कायद्यातील ३(२)(५) या कलमाचा अर्थ लावतान्ना एखादा भारतीय दंड सहिंतेच्या दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा जातीच्या कारनावरुण झाल्या शिवाय आपोआप ऐट्रोसिटीचा गुन्हा होत नाही असे म्हटले आहे.

दिनांक ३१मार्च २०११ रोजी आंध्र प्रदेश येथील २० वर्षाच्या एका अंध दलित मुलीवर बलात्कार झाला होता आणि या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने दिनांक १९ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीला भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३७६(१) नुसार जन्मठेप व ₹ १०००/- दंड तसेच ऐट्रोसिटी कायद्यातील ३(२)(५) नुसार सुद्धा जन्मठेप व ₹ १०००/- दंडाची शिक्षा ठोठावली होती. मा.आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपीची अपील फेटाळत शिक्षा कायम केली. या विरोधातिल अपिलात मा.सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३७६(१) नुसार जन्मठेप व ₹ १०००/- दंडाची शिक्षा कायम केली परंतू ऐट्रोसिटी कायद्यातील ३(२)(५) नुसार असलेली शिक्षा रद्द केली.

दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी ऐट्रोसिटी कायद्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित कायदा २०१८ कमकुवत करणारा आहे. सदर कायद्यातील ३(२)(५) कलमाचा गैरवाजवी व मर्यादित अर्थ लावून आरोपींना अभय देणारा हा निकाल दुर्दैवी आहे. सन २०१८ प्रमाणे या विषयावर पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.” असे मत अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनी व्यक्त केले.

ऐट्रोसिटी कायद्या च्या कलम ३(२)(५) नुसार गुन्हा जातीच्या कारणावरून झाला पाहिजे, परन्तु याच कायद्याच्या कलम ८(क) मधिल गृहीतानुसार आरोपीला पिडीताची जात माहिती असेल तर तो गुन्हा जातीच्या कारणावरूनच घडला आहे, या ग्रुहिताचा विचार न करता तर्तुदिचा मर्यादित अर्थ लावण्यात आला आहे. या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक
आहे असे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) महाराष्ट्र संघटनेचे राज्य महासचिव एड.डॉ.केवल उके यांनी यावेळी म्हटले
.

कायाद्याचा अर्थ लावण्याच्या सुवर्ण नियम (गोल्डन रूल) या नियमा नुसार कुठल्याही कायाद्याचा अर्थ काढतांना कायदा पूर्णपणे वाचला पाहिजे आणि उद्दिष्ट व ग्रुहितांचा विचार केला पाहिजे. असे असतांना भारतीय समाजाच्या अविभाज्य दुर्लक्षित घटकाच्या संरक्षनाकरिता असलेला घटनात्मक सामाजिक कायदा म्हणजेच ऐट्रोसिटी कायद्याचा वारंवार मर्यादित अर्थ लावणे हा त्यांच्यावारिल दुहेरी अन्याय आहे का? मा.सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत अधिकारांचे मुख्य संरक्षक आहेत असे मानले जाते आणि अनेक उदारमताने दिलेल्या निवाडयात ते सिद्ध झाले आहे मग दलित-आदिवासिंच्या अधिकारा बाबत मर्यादित दृष्टिकोण का? अशी चर्चा या निकालानंतर सर्वत्र होत असल्याचे दिसून येते. या निकालानंतर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे

ऐट्रोसिटी कायद्यातील कलम दलितांवर झालेल्या गुन्ह्यात आपोआप लावले जाणे अयोग्य-मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक- ऍड. डॉ.केवल उके
या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची गरज काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत

प्रांत कार्यालय अकलूज येथे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदेआज दिनांक 8  एप्रिल 2021 रोजी प्रांत कार्यालय येथे फोंडशिरस येथील  सामाजिक कार्यकर्त्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. फोंडशिरस ते सदाशिवनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास संदर्भात फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात, जमीर मुलानी, दिनेश भोसले यांनी प्रांत कार्यालय अकलूज  यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन बांगर्डे ते फोंडशिरस, फोंडशिरस ते सदाशिवनगर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम पुन्हा होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

प्रांत कार्यालय अकलूज येथे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात ,जमीर मुलानी,दिनेश भोसले

You may have missed