Uncategorized

एन.आर. सी.कंपनी कामगार आंदोलनास बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनास पाठींबा


एन.आर. सी.कंपनी कामगार आंदोलनास बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनास पाठींबा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेरावकल्याण तालुक्याचे राहणीमान उंचावणारे व कल्याणच्या विकासात मानाचा तुरा रोवणारी एन आर सी कंपनी वीस वर्षापूर्वी दिमाखात चालू होती या कंपनीमध्ये नायलॉन या नावाचा धागा बनत होता त्याची क्वालिटी एक नंबरची होती त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी ‌ असल्यामुळे एन आर सी कंपनी मोठ्या जोशात चालत होती. त्यामुळे इथल्या पंचक्रोशीतील दहा ते बारा हजार कामगार अतिशय गुण्यागोविंदाने आणि चांगल्या पद्धतीने आपले जीवन जगत होते पण त्यातच 2009 साली या कंपनीला ग्रहण लागून कंपनी अचानकपणे बंद पाडण्याचा निर्णय कंपनीचे संचालक गोयंका घेतला त्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली कामगारांना पी एफ,फंड व ग्रज्युएटी इत्यादी प्रकारचे देणी न देता एका अदाणी नामक भांडवलदारा जमीन खरेदी देवून जमीन विकण्यात आली. अदानी या भांडवलदारांने गेली सात तेआठ वर्ष झाली पण इथल्या कामगाराला एक रुपाया न देता कामगारांची पिळवणूक करु लागला म्हणून येथील कामगारांनी एकत्रित येऊन कंपनी विरुद्ध न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती.त्यावेळी न्यायालयाने कंपनीच्या सर्व कामगारांचे सर्व देणी दिल्याशिवाय विकत घेणा-या भांडवलदाला एक इंच सुद्धा जमीन ताब्यात घेता येणार नाही. कामगारांना न्याय मिळण्यासाठी
येथील संघटीत कामगारांनी वविविध पक्षातील राजकीय लोकांनी उपस्थिती दाखवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलना ठिकाणी भेट देऊन कंपनीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. हे सरकार कामगारांचे शोषन करते आणि भांडवलदारांना पाठीशी घालते अशी टीका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. गेली 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कॉम्रेड उदय चौधरी, भीमराव डोळस, वळसे पाटील साहेब व कार्यकर्ते आंदोलन सहभागी आहे याआंदोलनाला वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोईर, महासचिव विजय कांबळे, संघटक विनोद रोकडे, कल्याण शहरअध्यक्ष प्रवीण बोदडे, संदेश भालेराव, सुरेश पंडीत, सुनिता राजगुरू यांनी पाठिंबा दिला.

ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या नोडल ऑफिसर पदी डॉ.श्री सुरेंद्रकुमार बागडे यांची नियुक्ती

नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देताना राज्य सचिव वैभव गीते

नोडल ऑफिसर नियुक्ती करण्यासाठी राज्य महासचिव डॉक्टर एडवोकेट केवल उके व राज्य सचिव वैभव गिते यांनी पाठपुरावा केला.

लोकप्रिय नेते वैभव गिते यांच्या प्रामाणिक व खडतर पाठपुराव्याला घवघवीत यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेअनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर होणाऱ्या अत्याचारास आळा बसण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015)पारीत केला असून त्याअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम 2016)तयार करण्यात आले आहे.सदर नियमातील नियम क्रं.9 (1) नुसार या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामामध्ये समन्वय राखण्यासाठी राज्य स्तरावर समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक,युटीए,2016/प्र.क्र 310/सामासू दिनांक 27 सप्टेंबर 2017 नुसार श्री.शाम तागडे प्रधान सचिव अल्पसंख्याक विभाग,मंत्रालय,मुंबई यांची नेमणूक झाली होती.शयाम तागडे यांनी प्रत्येक तिमाहिस संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेत ऐतिहासिक व रचनात्मक काम करून दाखवले.सद्यस्थितीत मा.श्याम तागडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव असल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांची नियुक्ती करावी म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय नेते राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयीन स्तरावरील पाठपुरावा केला यामध्ये वैभव गिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यात बौद्ध,अनुसूचित जाती-जमाती (दलित आदिवासींच्या वरील) अन्याय अत्याचार वाढल्याने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करून मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी म्हणून निवेदन देऊन चर्चा करून पाठपुरावा केला.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यांशीही चर्चा केली.एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या कार्यालयाच्यापुढे 25 जानेवारी 2021 रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले होते.अखेर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 1 मार्च 2021 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे एट्रोसिटी ऍक्ट च्या अंमलबजावणीसाठी (IAS) डॉ.श्री.सुरेंद्र बागडे महाव्यवस्थापक,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम, मुंबई यांची नियुक्ती केली आहे.त्यामुळे सुरेंद्रकुमार बागडे यांना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा प्रत्येक तिमाहिस आढावा घ्यावा लागणार आहे. नोडल ऑफिसर ची कार्ये 1) ॲट्रॉसिटी ॲक्ट चा नियमांअंतर्गत नियम 4 मधील उपनीयम (2)आणि (4),नियम 6 व नियम 8 मधील (xi) अंतर्गत राज्यशासनास प्राप्त होणारे अहवाल

2) ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांची सद्यस्थिती 3)अत्याचार प्रवण क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था बाबत स्थितीचा आढावा घेणे
4)अत्याचार पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य त्वरित देण्याबाबत उपाययोजना करणे 5)अत्याचारपीडित व्यक्ती किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना रेशन,कपडे,निवारा,कायदेविषयक सल्ला,प्रवास खर्च,दैनिक भत्ता,आणि वाहनांची व्यवस्था करणे 6)अशासकीय संस्था, संरक्षण कक्ष,विविध समित्या,व कायद्याअंतर्गत इतर तरतुदी अंमलात आणणारे सर्व अधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेणे 7)सुधारित अधिनियमांच्या प्रकरण 4 अ मध्ये नमूद पीडित व साक्षीदारांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे इत्यादी महत्वपूर्ण कर्तव्य नोडल ऑफिसर यांची आहेत.नोडल ऑफिसर यांची नियुक्ती केल्याबद्दल एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव डॉ. केवल उके व राज्य समन्वयक रमाताई आहिरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, यांचे आभार मानले आहेत.
ज्याप्रमाणे मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी ॲट्रॉसिटी च्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करून तात्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

नातेपुते ग्रामपंचायत सरपंच पदी कांचन लांडगे तर उपसरपंच पदी अतुल पाटील यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी.-नातेपुते ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख पाटील कवितके उराडे ठोंबरे भांड या गटाचे व जनशक्ती विकास आघाडीचे उमेदवार सौ कांचन दादा लांडगे या सरपंच पदी व उपसरपंच पदी अतुल राजेंद्र पाटील त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाची चुरशीची व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनशक्ती विकास आघाडी पॅनल विरुद्ध नातेपुते नागरी संघटना पॅनल ची समोरासमोर दुरंगी लढत लागली होती यामध्ये जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे सात उमेदवार ( वार्ड क्रमांक १ ) मधील सनम सिकंदर मुलानी व सोनल गणेश उराडे (वार्ड क्रमांक ४ ) मधून रंजना मारुती पांढरे व विद्या सोमनाथ सावंत (वार्ड क्रमांक ५ ) मधून अनुराधा भारत उराडे, संदीप चंद्रकांत ठोंबरे, अजय चंद्रशेखर भांड हे बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी दहा जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढविण्यासाठी समोरासमोर उभा होते जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे ७ उमेदवार बिनविरोध व उर्वरित निवडणुकीच्या रिंगणात उभा केलेले १० उमेदवार यामध्ये (वार्ड क्रमांक १ ) मध्ये रणवीर अमरसिंह देशमुख, (वार्ड क्रमांक २ ) मध्ये सुखदेव सदाशिव ननवरे ,कांचन दादा लांडगे भारती बापूराव पांढरे (वार्ड क्रमांक 3 ) मध्ये प्रकाश बबन साळवे, अतुल राजेंद्र पाटील (वार्ड क्रमांक ४ ) मध्ये डॉ. नरेंद्र रघुनाथ कवितके (वार्ड क्रमांक ६ ) मध्ये उत्तम गल्लू बरडकर ,स्वाती अतुल बावकर, शितल गणेश बरडकर हे उमेदवार निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्‍याने निवडून आले त्यामुळे यावेळेस जनशक्ती विकास आघाडीचे सरपंच होणार हे नक्की होते व शासकीय आरक्षणानुसार यावेळी सरपंच पदी सौ कांचन दादा लांडगे व उपसरपंच पदी अतुल राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नातेपुते दहिगाव चौकात ग्रामपंचायत पटांगणामध्ये फटाकडे उडवून जल्लोष साजरा केला

फोंडशिरस सरपंच पदी पोपट बोराटे व उपसरपंच पदी दादा रणदिवे यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रशांत खरात-नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत  फोंडशिरस येथे सरपंच पदी पोपट बाबा बोराटे तर उपसरपंच पदी दादा शिवाजी रणदिवे यांची वर्णी लागली आहे. सरपंच पदाच्या निवडीच्या वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी एस यु तपासे, ग्रामसेवक लोंढे,यांनी काम पाहिले.यावेळी सदस्य कांतीलाल देवकर,प्रदीप गोरे,रंजना बोडरे,अनुसया काळे, सुचिता शिंदे,भानुदास मोठे,सुशीला धायगुडे,मंगल भोसले,सिंधू वाघमोडे,राजेंद्र पाटील,आप्पा बंडगर,मनीषा वाघमोडे,रुक्मिणी ढोबळे,हेमलता गोरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.पार्टी प्रमुख म्हणून भानुदास पाटील,मधुकर पाटील,लक्ष्मण कोडलकर,राहुल खिलारे,युवराज रणदिवे,रामा धायगुडे,तात्या वाघमोडे,दादासाहेब ढवळे,महेंद्रा  वाघमोडे,हनुमंत गोरे,विष्णू गोरे,विवेक गवळी,दादासाहेब पाटील,सुनील पाटील,राजेंद्र रणदिवे,रामभाऊ ढोबळे,बापूराव बोराटे,प्रशांत खरात,आदी उपस्थित होते.सरपंच पद निवड झाल्यानंतर गुलाल उधळून जल्लोष करत बाणलिंग मंदिर येथे सर्व सदस्यांनी दर्शन घेतले.

राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्यावतीने सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला

कल्याण डोंबिवली महानगर पालिका सफाई कामगार सुभाष वाळकु नागवंशी यांच्या मुलीं चा विवाह थाटात झाला संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव मुलगी स्नेहा हीचा विवाह सागर रामदास जाधव( शिक्षण BA/LLB) यांच्याशी झाला
सुभाष नागवंशी हे के.डी.एम.सी मध्ये सफाई कामगार आसुन त्यांनी आथांग कष्ट करून आपल्या पाच मुलांच शिक्षण वेग वेगळ्या माध्यमातून पुर्ण केल मोठा मुलगा प्रविण सुभाष नागवंशी हा एस.बी.आय बँकेत मॅनेजर पदावर काम करत आहे तर मुलगी स्नेहा सुध्दा काॅमर्स मधुन ग्रॅज्युएट झाली आहे हे सुभाष नागवंशी एक सर्व सामान्य माणूस यांच कैवतुक करायच म्हणजे यांनी केलेल्या मेहनतीच फळ आज दिसून आल की ह्या वैक्ती च्या मुलीच्या लग्नात प्रमुख उपस्थिती …..
मा.सुनिल मेश्राम I.A.S अधिकारी,
मा. डाॅ.विजय कदम, मा श्यामदादा गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष Rpi(S),
मा.गणपतशेठ गायकवाड स्थानिक आमदार, मा.विवेक विश्वास घायवट प्रशासकीय अधिकारी,
महेश गायकवाड नगरसेवक,
विशाल पावशे नगरसेवक, निलेश शिंदे नगरसेवक, शरद पाटील, कल्याण धुमाळ मा.नगरसेवक, रितेश खराडे मा.नगरसेवक, बाळाराम गायकवाड जिल्हा अध्यक्ष Rpi,
संदेश भालेराव ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटक,
माया कांबळे जिल्हा अध्यक्ष वं.ब.आ.,
तानाजी सहाणेसर,
विश्वास घायवट( Lic ब्रँच मॅनेजर), मयंक करनानी (S.B.I.A.S.M.),
विलास बु.गायकवाड एस. आय. (K.D.M.C ),गोरक्षनाथ भनगडे एस.आय. (kdmc),
एस.के.पाटील सी.एस.आय.(kdmc)
सलिम शेख एस.आय.(kdmc)
सुरेश ना.पंडित उपाध्यक्ष (वं.ब.आ.),
जहीर कुरेशी ,विजय मोरे ,संतोष जाधव, व आप्तेष्ट नातेवाईक आणेकाने सोशल नेटवर्किंग द्वारे शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या साक्षीने बुध्द पध्दतीने आणि कोरोना काळाचा विचार करून योग्य ते अंतर ठेवून सॅनेटाईजर मास्क वापरून लग्न सोहळा संपन्न झाला

प्रख्यात समाजसेवक अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस थाटात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संदेश भालेराव- महाराष्ट्र तील कर्तव्यनिष्ठ व्यक्ती, संकट काळी पीडितांच्या मदतीला धाव घेणारे, गरजूंना मायेचा हाक देणारे, अन्याला वाचा फोडणारे, मरेल पण अन्याय-अत्याचाराच्या घटनेत कधीही तडजोड न करणारे, कुठल्याही अमिषाला कधीही बळी न पडणारे, सर्व धर्म समभाव अशी भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे, महाराष्ट्र तील अभ्यासू व्यक्तिमत्व, सामजिक पत्रकारितेमध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे, स्वबळावर पत्रकारांची टीम निर्माण करणारे, सोशल न्युज नेटवर्क च्या माध्यमाने सरकार ला धारेवर धरणारे कर्तव्य निष्ठ पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव

तसेच आपल्या लेखणी ने भ्रष्ट अधिकारी यांची झोप मोडणारे कार्य सम्राट आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीज चे राज्य महासचिव आपल्या कार्याने ने ओळखले जाणारे, मानवधर्म पाळून लोक हित जपणारे, शेकडो हृदयाचा पाठीराखा, अन्याय अत्याचार ग्रस्त पत्रकारांच्या व वंचित समाजातील गरजु पिडीतांच्या हाकेला धाव घेणारे कायदेतज्ज्ञ सुधारित ॲक्ट्राॅसिटी ॲक्ट २०१५ चे जनक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार, कला क्षेत्रात बदल घडवणारे कर्तव्य निष्ठ आमचे आदर्श गरजू वंतांना प्रगतीचे मार्ग धाकवणारे , महाराष्ट्र तील नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे राज्य महासचिव अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.

अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो ! आयुष्याच्या या पायरीवर त्यांच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येवो, त्यांच्या इच्छा, आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे, यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय धार्मिक, व्यापार , कला क्षेत्रात प्रगती होवो तसेच तयांच्या कडून शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे थोर विचार समाजात रुजवावे व आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच तथागता चरणी मंगलमय सदिच्छा व्यक्त करत राज्यच न्हवे तर संपूर्ण देशातुन समाजमाध्यमांवर शुभेच्छाचा वर्षाव होत होता.

कल्याण पश्चिमेतील सावित्रीबाई फुले सभागृहात त्याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखिल आयोजित करण्यात आला होता. याला नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क वंचित बहुजन आघाडी नॅशनल रेल्वे यूनियन चे कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य एन डी एम जे राज्य समन्वयक रमाताई आहिरे
एन.डी.एम.जे. मुंबई ठाणे प्रदेशचे पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष बंदिश सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, संघटक शशिकांत वाघ तसेच ठाणे जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष प्राध्यापक बनसोडे सर, जिल्हा सचिव विनोद रोकडे, जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे, जिल्हा संघटक संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली एन. डी.एम.जे.
अध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, सचिव संदीप घुसळे, संघटक कोंगळे, कल्याण पुर्व अध्यक्ष जितेंद्र बुकाने आणि
पत्रकार मंडळी डॉ.आदर्श भालेराव, राहुल सावंत, प्रमोद सावंत, गायक व कवी दिलीपनंद गायकवाड, गौतमराजे कायदेतज्ञ ॲड.अनिल काबंळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रथम बद्ध वंदना घेउन आणि वाढदिवसाचा केक कापुन शाल व फुलांचा गुछ देऊन वाढदिवस संपन्न झाला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, काव्य, गायन,चारोळी व प्रबोधानपर भाषने सुद्धा झालीत.

कार्यक्रमाचे औचित्य साधून शहापुर तालुक्यातील कार्यकारिनि तयार करून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटना तयार करून दिलीप थोरात, गुरुनाथ कशिवले,सागर रोकडे अन्य कार्यकर्त्यां ना नियुक्तीपत्र दिले
व सुञसंचालक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी मधुकर घुसळे (गीत सोनिया चि उगवली सकाळ फेम )यांचे चिरंजीव एन डी एम जे कल्याण डोंबिवली सचिव संदीप घुसळे यांनी केले आपल्या काव्य च्यां माध्यमातून ॲड.डॉ.केवल उके साहेबांन चा वाढदिवसा चा कार्यक्रम संपन्न झाला.

पिरळे ग्रामपंचायतीवर महिलाराज सरपंच अलका नरोळे तर उपसरपंच कमल खिलारे

पिरळे ग्रामपंचायतीवर महिलाराज सरपंच अलका नरोळे तर उपसरपंच कमल खिलारे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे ग्रामपंचायतीची नुकतेच सरपंचपदाची निवडणूक झाली असून या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर महिलाराज आले असून सरपंच पदी अलका रामलिंग नरोळे तर उपसरपंच पदी कमल दादा खिलारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम निवडणुका झाल्या व नंतर सरपंच आरक्षण जाहीर झाले.यात पिरळे ग्रामपंचायतीवर उद्योजक संदीप संदीप नरोळे यांच्या आई अलका नरोळे या सरपंच पदी तर सामाजिक कार्यकर्ते उमेश खिल्लारे यांच्या आई कमल खिलारे उपसरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस रणवरे, ग्राम विकास अधिकारी रमेश जमदाडे,सदस्य अमोल बाळू शिंदे, रेश्मा सुनील दडस, विद्या दशरथ लवटे, वर्षा भिमराव वाघमोडे,सुनिता आबा शिंदे,सुशीला रघुनाथ वाघ, व कर्मचारी उपस्थित होते.सरपंच व उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण झाले असून सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा ग्रामस्थांच्या वतीने पवार वस्ती,नरोळे वस्ती व अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच पार्टी प्रमुख संदीप नरोळे,अशोक तोडकर,बाळू शिंदे,गणेश दडस,उमेश खिल्लारे, दत्तात्रेय लवटे व इतर लोकांचा अकलूज येथे जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील,धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. पार्टी प्रमुख संदिप नरोळे बोलताना म्हणाले की आम्ही सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत कारभार पारदर्शक होण्यासाठी शपथ घेतली आहे नेहमीच गावच्या विकासासाठी काम करत राहू.

सरपंच अलका रामलिंग नरोळे उपसरपंच कमल दादा खिलारे
जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार्टी प्रमुखांचा सत्कार
कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार्टी प्रमुखांचे सत्कार
धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते
उपसभापती अर्जूनसिंह मोहिते पाटील व पंचायत समिती यांच्या वतीने येथील पार्टी प्रमुखांचे सत्कार करण्यात आले
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने पिरळे गावचे नूतन सरपंच यांचा सत्कारकरण्यात आला
पुरोगामी न्यूज परिवाराच्या वतीने उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला

मालवण येथे दलित मानवाधिकार कार्यकर्ता कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

मालवण येथे दलित मानवाधिकार कार्यकर्ता कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र -प्रमाणे शिंदे-

.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र यांच्यावतीने मालवण येथील सेफ्राॅन हाॅटेल येथे 20 व 21 दोन दिवसीय राज्य स्तरीय मानवाधिकार कार्यकर्ता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मानव अधिकार व अत्याचार पीडित या वर होणारे अन्याय अत्याचार तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट  कायद्या संदर्भात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे राज्य महासचिव तथा आंतरजातीय विवाह मसूदा कायदा समिती सदस्य ॲड डॉ केवल उके, तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय समन्वयक ॲड नवीन गौतम यांच्या हस्ते व उच्च न्यायालय मुंबई चे ऍड बि जी बनसोड,नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीज महाराष्ट्र संघटनेचे  कार्यकारणीतसेच राज्य कार्यकारणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच दिल्ली येथून एडवोकेट राहुल सिंग, ॲड देब जाणी मुंबई एडवोकेट तनय गांधी यांनी ऑनलाइन गूगल मीट च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या शाळेसाठी सोलापूर,लातूर, पुणे, रायगड, मुंबई ,हिंगोली, वाशिम ,रायगड सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग येथील रिपाईचे नेते तानाजी कांबळे, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र चे राज्य सचिव वैभवजी गिते,प्रा.रमाताई अहिरे, राज्य सहसचिव पि एस खंदारे,बि पी लांडगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे, आदींची उपस्थित होती.
पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्याचे मनोबल वाढवावे व कार्यकर्त्यां कशा तणाव पूर्ण कशा कार्य करेल.तसेच कार्यकर्त्यांवर येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी दिल्लीवरून आलेले श्री नवीन गौतम, अॅड डॉ केवलजी उके, वैभव गिते,प्रा.रमाताई अहिरे,पि एस खंदारे, प्रमोद शिंदे आदींनी पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील फोंडशिरस येथील आरोपीस एक वर्ष श्रम कारावासाची शिक्षा

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील फोंडशिरस येथील आरोपीस एक वर्ष श्रम कारावासाची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते -प्रमोद शिंदे- नातेपुते तालुका माळशिरस पोलिस ठाणे हद्दीत फोंडशिरस येथील दोघांना मारहाण केल्या प्रकरणी आरोपीना एक वर्षाचा श्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा माळशिरस कोर्टाने सुनावले आहे.यासंदर्भात हकीकत अशी की फोंडशिरस येथील  फिर्यादी वसंत वाघमोडे व त्याच्या आई विमल वाघमोडे दोघेही राहणार फोंडशिरस तालुका माळशिरस शेतामध्ये पिकात पाणी धरत असताना दिनांक 24/1/2013 रोजी सकाळी 11 वा. सुमारास शेतीच्या वादातून आरोपी बालचंद्र कोडलकर,वसंत कोडलकर या दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन शिव्यागाळी केली. त्यामुळे आरोपींविरुद्ध नातेपुते पोलीस ठाणे येथे भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 14 /2013 भादवि कलम  325,323, 504,34 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आला आली होती.सदर गुन्ह्यातील साक्षीदार फिर्यादी पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांचा साक्ष पुराव याकामी महत्त्वाच्या ठरल्या. दिनांक 3/2 /2021 रोजी मे.जी.एम.नदाफ सो प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माळशिरस यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींना भादवि कलम 325 कलमान्वये दोषी ठरवून आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये द्रव्य दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.सदर गुन्ह्याचे कामकाज सरकारी वकील श्री एस.एन.तरळगट्टी व नातेपुते पोलीस ठाण्याचे कोर्ट ऑडली पोलीस हेड कॉन्स्टेबल 394 शिवाजी घाडगे व तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार कंते यांनी कामकाज पाहिले.

नातेपुते येथे विविध मागण्यांसाठी एक दिवशीय आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी )नातेपुते ता.माळशिरस येथे एन.डी.एम.जे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास वर्गीय.बहु संस्था, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने नातेपुते येथे धरणे आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन विविध मागण्यांसाठी करण्यात आले होते या आंदोलनात1)सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील सन 2011पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकुल करण्यात यावीत 2)गायरान, गावठाण, शेती महामंडळ ई जागेवरील अतिक्रमणे कायम करावीत 3)ज्या ग्रामसेवकांनी अतिक्रमण सर्वे व्यवस्थित केला नाही त्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी 4)गायरान, गावठाण, शेती महामंडळ येथील फेरसर्वे करण्यात यावा 5)पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी या या मागण्या साठी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी  एन.के साळवे, विकास(दादा) धाईजें,समीर सोरटे, उमाजी बोडरे,प्रमोद शिंदे,अजित शिरतोडे, प्रशांत खरात,सोमा भोसले, गुरू करचे,बाबा ननवरे,संतोष देवकाते,अनिल काळे,प्रेम देवकाते,अजित पांढरे,दत्ता कांबळे,सचिन झेंडे, विशाल झेंडे, रवी झेंडे,अप्पा गाडे, नितीन मोरे, प्रशांत साळवे,विशाल गायकवाड, नाना गायकवाड,धर्मअशोक सावंत,ठोंबरे रियाज भाई, बाळासो चव्हाण ई सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन मंडल अधिकारी चव्हाण साहेब,तलाठी उन्हाळे भाऊसाहेब यांनी स्वीकारले. आंदोलनाचे आयोजन  समाजीक कार्यकर्ते विशाल साळवे,सागर बिचुकले, सुनील ढोबळे, रणजित कसबे, अनिल लांडगे व कार्यकर्त्यानी केले होते.

You may have missed