आंतरराष्ट्रीय

अपंग60 वर्षाच्या सुशीला मुलीस 80 वर्षाच्या हौसा आईचा आसरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रमोद शिंदे)-सुशीला भीमराव शिंदे साठ वर्षाच्या या अपंग मुलीस 80 वर्षाच्या हौसा आईचा आसरा घ्यावा लागत आहे व 80 वर्षाची आई आपल्या साठ वर्षाच्या मुलीचे आनंदाने लालन पालन करत आहेसुशीला भीमराव शिंदे यांना ताप आला होता तेव्हापासून त्यांच्या पायांना लकवा भरला होता.तेव्हापासून त्यांचा सांभाळ आई हौसाबाई भीमराव शिंदे वय 80 वर्ष व वडील भीमराव शिंदे हे करीत आहेत हौसाबाई शिंदे यांना शेती नाही राहायला घर नाही अशा परिस्थितीत आई-वडील मोलमजुरी करून व शेळ्या मेंढ्या राखून अपंग मुलगी सुशीला यांचा सांभाळ करत आहेत बाहेर जाताना 80 वर्षाची आई हौसा या सुशीला यांच्या अपंग गाडा सायकलला पाठीमागून धक्का देतात व पाहिजे तिथे त्यांना घेऊन जातात.त्यांना अद्यापही शासनाची कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही म्हणून त्यांनी त्यांची व्यथा एन डी एन जे प्रसिद्ध महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रमुख प्रमोद शिंदे व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर यांच्याकडे मांडली असता पत्रकार प्रमोद शिंदे यांनी त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाईल असेही सांगितले.

उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी स्वखर्चातून कळंबोली वीरपुरी येथे स्वखर्चाने केला रस्ता

कळंबोली विरपुरी येथे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी स्वखर्चातून कित्येक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

माळशिरस तालुक्यातील पिरळे पंचायत समिती गणातील कळंबोली नजिक विरपुरी येथे बऱ्याच वर्षापासून शेती महामंडळच्या कामगार कॉलनी ला येणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना चिखलाला सामोरे जावे लागत होते आणि यामध्ये कायम छोटे मोठे अपघात होत असल्याने पावसाळा दरम्यानच्या काळात उद्योजक .सतिशतात्या ढेकळे साहेब हे गाव भेट दौऱ्यावर असताना विरपुरी येथील तरुण मित्र परिवार यांनी सतिशतात्या ढेकळे यांना भेटून सदर रस्त्याच्या दुरुस्ती व इतर अडीअडचणी बाबत सांगितले असता सतिश तात्यांनी एका मिनिटांत रस्त्याच्या दुरुस्ती बाबत होकार दिला आणि आज सदर हा रस्ता उद्योजक सतिशतात्या ढेकळे साहेब यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी करून देण्याचा शब्द त्यांनी दिला आणि आज अखेर अवघ्या 2 ते 3 दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्यामुळे विरपुरी येथील सर्व नागरिक व तरुण मित्र परिवार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून सर्व नागरिकांनी असा दमदार कामाचा माणूस आपल्या हक्काचा अशी उद्योजक सतिश ढेकळे यांना देऊन विरपुरी ग्रामस्थ यांच्या वतीने सतिश ढेकळे यांचे आभार मानले तसेच सतीश तात्या तुम्हीच आमचा विकास करू शकता पिरळे गणातून आपण निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा भावना सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या

नीरा नदीत वाहून जाणाऱ्या पिरळे येथील विद्यार्थ्याला भोरकर वाडीच्या युवकांनी वाचवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी) पिरळे येथील वर्धमान विद्यालय वालचंद नगर येथे इयत्ता बारावी सायन्स मध्ये शिकणारा ओंकार दुर्योधन हाके या विद्यार्थ्याला भोरकरवाडी येथील युवकांनी वाचवलेयासंदर्भात हकीकत अशी की  पिरळे येथील दुर्योधन हाके यांचे चिरंजीव ओंकार दुर्योधन हाके व मुलगी गौरी हाके हे वर्धमान विद्यालय वालचंदनगर येथे शिकण्यासाठी आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा असल्याने पिरळे गावामधून वालचंदनगर या ठिकाणी शाळेसाठी जाण्यास एस.टी किंवा इतर वाहन नाही त्यामुळे सकाळी लवकर दोघेही मोटरसायकलवर शाळेत पेपर असल्याने गेले होते.पेपर सुटल्यानंतर परत येताना नीरा नदी पुलावर अचानक पाणी वाढू लागले होते.पाणी पुलाच्या वर थोडे असल्याने बहिण गौरी ही गाडीवरून खाली उतरली व ओंकार हाके हा विद्यार्थी घरी जाण्यासाठी गाडी घेऊन पुलावरून निघाला असता अचानक पाण्याचा वेळ वेग वाढल्याने गाडीसह तो निरा नदीत दोन किमी अंतर रावर वाहून गेला.ओंकारला पोहायला येत असल्याने इथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला बाहेर येण्यासाठी मार्गदर्शन केले व भोरकरवाडी ता इंदापूर येथील बिरजू वाघमोडे व अक्षय जाधव तसेच दुर्गामाता मंडळातील त्यांच्या साथीदाराने स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या साह्याने ओंकार हाके या विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे.बिरजू वाघमोडे आणि अक्षय जाधव यांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.तसेच पिरळे येथील पालकांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते कळंबोली येथील नीरानदी पूल व कुरबावी नदी पूलावर चांगल्या पद्धतीचे संरक्षक खांब बॅरॅकेट बसवावेत व नातेपुते-पिरळे-वालचंदनगर ,-वालचंदनगर-पिरळे-नातेपुते तसेच बांगार्डे पिरळे नातेपुते एस.टी बस पिरळे मार्गे सुरू कराव्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. एस.टी बस सेवा लवकर सुरू नकेल्यास एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यां पालकासह तीव्र रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.

समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सोसायटीच्या सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते ( प्रतिनिधी )

नातेपुते येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सभासदांना सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते नऊ टक्के लाभांश वाटप करण्यात आला. संस्थेचा अॅडेट वर्ग अ असुन  संस्थेने दोन कोटी कर्जवाटप केले आहे. संस्थेचे चेअरमन संचालक यांच्या प्रयत्नाने व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची शंभर टक्के वसुली झाली असल्याचे  संस्थेचे मार्गदर्शक बाबाराजे देशमुख यांनी सांगितले. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,
नातेपुते नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, संस्थेचे चेअरमन विलास काळे, व्हाईस चेअरमन धनाजी देशमुख, रेणुका पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन जठार, बाळासाहेब काळे, महेश शेटे, संपत पांढरे, नारायण बोराटे, हनुमान जठार, रावसाहेब पांढरे, राहुल काळे, सुनील काळे, धनाजी पांढरे, सोनबा खरात, काशिनाथ सोनवणे, हर हर महादेव पतसंस्थेचे चेअरमन सागर इंगोले, सुभाष इंगोले, मोहन वाघमोडे, सचिव दशरथ साळुंखे, सहाय्यक प्रमोद कुलकर्णी तसेच सर्व संचालक सभासद उपस्थित होते

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या राजकुमार हिवरकर यांचे पालक मंत्र्यांना निवेदन

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या राजकुमार हिवरकर यांचे पालक मंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेमाळशिरस तालुक्यात व परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून बाळासाहेबांची (शिवसेना शिंदे गट)तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा,तरकारी,पालेभाज्यायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दिवाळी सारखा सण तोंडावर आला असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.सध्या शेतकरी अडचणीत आला असून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी.शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी व कष्टकऱ्यांचे आहे.तरी जिल्हाधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर नातेपुते शिवसेना गटनेते दादाभाई मुलाणी,जावेद शेख,संतोष गोरे,फोंडशिरस शाखाप्रमुख राजू मुलाणी व इतर शिवसैनिक हजर होते यावेळी माळशिरस तालुक्याच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

एन डी एम जे आंदोलनाचा दणका, आंदोलनानंतर बांधकाम विभागाला आली जाग, खड्डे बुजवण्याचे काम सुरू

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी)पिरळे-फोंडशिरस व माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त व्हावेत म्हणून एन डी एम जे राज्य प्रसिद्धी प्रमोद शिंदे यांच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर बांधकाम विभागाने याची दखल घेत तात्काळ पिरळे-फोंडशिरस, पिरळे-दहिगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व इतर प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.प्रसंगी या खड्ड्यांमुळे अपघातालाही सामोरे जावे लागत होते.तसेच या ठिकाणी अनेक लोकांचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाले आहे.वेळोवेळी बांधकाम विभागाला सांगून देखील याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत होते.आंदोलनानंतर बांधकाम विभागाला जाग आली व तात्काळ खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले.सदर आंदोलनास माळशिरस तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच पिरळे,फोंडशिरस, एकशिव,तांबेवाडी येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता.

राहिलेले रस्त्यांचे खड्डे हे पाऊस थांबल्यानंतर दुरुस्त करण्याच्या आश्वासन संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.जर राहिलेले पश्चिम भागातील रस्ते वेळेत दुरुस्त झाले नाहीत तर बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती स्व.बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर आहे-मंगेश चिवटे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती स्व.बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर आहे-मंगेश चिवटे 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)+मुख्यमंत्री कार्यालय आरोग्य विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे हे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना फोंडशिरस येथे शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.    त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांच्या विचारसरणीवर आधारित आहे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हीच कार्यपद्धती ते पुढे घेऊन जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समाजकारणाला महत्त्व देतात त्यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे.मुख्यमंत्री तरुणांना लाजवेल असं काम करीत करतातज्या ज्या वेळी मानव जातीवर संकट आले त्या त्यावेळी नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः दीडशे कार्यकर्त्यांसह केरळ व कोल्हापूर येथील महापुरात लोकांना मदत केली आहे. स्वतः शिंदे साहेब कमरे एवढ्या पाण्यामध्ये जाऊन लोकांना कपडे अन्न लागणारे औषध देऊन मदतीचा हात दिला आहे.साडेतीन लाख रुग्णांवर उपचार करण्याचे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब हे वेगवेगळ्या हॉस्पिटल ला भेट देऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आजपर्यंत साडेतीन हजार लोकांवर उपचार केले आहेत. माळशिरस तालुक्यात सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी उभारण्यात आलाआहे.कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली पाहिजे शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर म्हणाले की तालुक्यातील आम्ही सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब शिवसेना प्रमुख शिवाजी सावंत साहेब जिल्हाप्रमुख शेवटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ताकतीने काम करेल व आपल्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे बोलत होते.या कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख नगरसेवक संतोष आबा वाघमोडे  नगरसेवक गेजगे, सतीश सपकाळ, शिवसेना शहरप्रमुख समीर शेख,दादाभाई मुलांनी,जावेद शेख, सरपंच पोपटराव बोराटे शहरप्रमुख संतोष गोरे, सूत्रसंचालन गोरे यांनी केले.

पिरळे येथे स्मशान भूमी व्हावी म्हणून एन डी एम जे च्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)पिरळे तालुका माळशिरस जि. सोलापूर येथे व माळशिरस तालुक्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही अशा गावांमध्ये हायटेक स्मशानभूमी व्हावी म्हणून नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस( एन डी एम जे)व पिरळे ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन राज्य महासचिव डॉ.केवल उके,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे,राज्य सचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.तसेच या आंदोलनात पिरळे -फोंडशिरस-एकशिव-तांबेवाडी, पिरळे-दहिगाव गुरसाळे,-कुरबावी,रस्त्यामध्ये पडलेले खड्डे बुजवून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा, वालचंदनगर-दहिगाव-नातेपुते रोडवर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावा.पिरळे ते  किर्दक वस्ती रस्ता, तसेच पिरळेशिवते-बुधावले वस्ती रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशा प्रकारची मागणी एन डी एम जे चे राज्य प्रसिद्ध प्रमुख प्रमोद शिंदे यांनी निवेदनात केली आहे. तहसीलदार जगदीश निंबाळकर साहेब यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले.लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. लवकरात लवकर या मागण्यांवरती कार्यवाही न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.यावेळी नायब तहसीलदार तुषार देशमुख साहेब उपस्थित होते.तसेच या आंदोलनासआंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे,किसान मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, शिवसेना शिंदे गटाचे नेते राजकुमार हिवरकर,सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर शेतकरी संघटनेचे नेते भीमराव फुले,राष्ट्रवादीचे रणजीत कसबे, पत्रकार सचिन रणदिवे प्रहार संघटनेचे संजय पवळ यांनी पाठिंबा दिला.तसेच पिरळे गावचे उपसरपंच उमेश खिलारे,प्रमोद भोसले,गोरख साळवे, जय मल्हार आद्य क्रांतिवीर संघटनेचे नेते पप्पू बुधावले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रल्हाद साळवे, ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस, सचिन झेंडे, प्रफुल्ल बल्लाळ,आप्पा गाडे,जयपाल बल्लाळ,सागर पवार तसेच पिरळे व परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

नातेपुते नगरपंचायत चे लेखी आश्वासनानंतर बिपिन सातपुते यांनी आपले आमरण उपोषण थांबविले

नातेपुते नगरपंचायत चे लेखी आश्वासनानंतर बिपिन सातपुते यांनी आपले आमरण उपोषण थांबविले
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क नातेपुते
नातेपुते नगरपंचायत हद्दीतील सिटी सर्वे नंबर 486 या सरकारी
मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा तोंडी व लेखी अर्ज विनंती करूनही न्याय मिळत नसल्याने गुरुवार दि. ६ ऑक्टोबर सकाळी ११ वाजल्यापासून नातेपुते नगरपंचायत समोर बिपिन सातपुते नगरपंचायतसमोर आमरण उपोषणाला बसले होते.यासंदर्भात मुख्याधिकारी खांडेकर यांची भूमिका स्पष्ट नसल्याने,त्यांच्या भूमिके विरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ आली होती. पत्रकार व सामाजिक कार्ये यांच्या प्रयत्नाने बिपीन सातपुते यांना न्याय मिळण्याची पहिली पायरी यशस्वी झाली आहे.

सविस्तर माहिती,नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीत येणारा सरकारी मालकीचा सिटी सर्व्हे नंबर ४८६ रस्त्यावरील अतिक्रमण खुले करण्याबाबत सतत तोंडी व लेखी स्वरुपात तक्रार करूनही नातेपुते नगरपंचायत टाळाटाळ करत होती. नातेपुते शहरात कोष्टी गल्ली येथे सिटी सर्व्हे नंबर ४८४,४८५,४८७,४८८ अशी मालमत्ता खरेदी केली. सदर ठिकाणी त्यांनी राहण्यासाठी बांधकाम करायचं होते. परंतु त्या ठिकाणी जाण्या योग्यतेचा रस्ता नसल्याने बांधकाम करू शकत नाही. सरकारी सिटी सर्व्हे नुसार त्या ठिकाणी रस्ता आहे, त्याच ठिकाणी रस्ता मिळावा म्हणून ते दोन वर्षापासून सतत प्रयत्न करीत आहेत.यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार नगरपंचायतीकडे केला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रांना दोन वर्षा पासून कोणतेही प्रकारची लेखी उत्तर देण्यात आले नाही. नगरपंचायत च्या संबंधित अधिकाऱ्यांनी सिटी सर्व्हे नंबर ४८६ रस्त्याची मोजणी बाबत आज तागायत निर्णय न घेतल्यामुळे गेले दोन वर्षे त्यांचे बांधकाम होऊ शकले नाही, त्यांनी न्याय मिळणे बाबत नगरपंचायतीची भूमिका स्पष्ट न दिसल्याने त्यांना पुढील कोणतेही बांधकाम करता येत नाही त्यामुळे त्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. सतत पाठपुरावा करूनहि कोणत्याही प्रकारची कसलीच दखल घेतली जात नाही म्हणून ते गुरुवार दि.६ आक्टोंबर पासून नातेपुते नगरपंचायत समोर न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. याबाबत नगरपंचायत ने तत्काळ कारवाई करून भूमी अभिलेखा कडे तात्काळ मोजणीचे पैसे भरून त्याचे चलन घेतले व याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले की ,भूमी अभिलेख संबंधित जागेचे चलन भरून घेतले आहे व लवकरच मोजणी करून पुढील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बिपीन सातपुते यांचे समाधान झाल्याने नातेपुते नगरपंचायत चे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी उपोषणकर्ते बिपीन सातपुते यांना ज्यूस देऊन उपोषण थांबविले. बिपीन सातपुते उपोषण सोडल्यानंतर मी माझ्या हक्कासाठी उपोषणाला बसले असताना मला पाठिंबा कार्यकर्त्यांनी दिला पत्रकारांनी बातम्या लावून सहकार्य केले त्यामुळे न्याय मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे नगरपंचायतने यापुढेही मला सहकार्य करावे ही अपेक्षा आहे.

पिरळे येथे एन डी एम जे कडून स्मशानभूमीची मागणी होताच तात्काळ गटविकास अधिकारी यांच्याकडून जागेची पाहणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-पिरळे ता.माळशिरस येथे ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी होत आहे. पिरळे गावची लोकसंख्या ही 6000 पेक्षा जास्त असून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा या गावांमध्ये अद्याप ही स्मशानभूमी नाही म्हणून एन डी एम जे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख व पुरोगामी महाराष्ट्र चे संपादक पत्रकार प्रमोद शिंदे यांनी स्मशानभूमी होण्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी व मा उपविभागीय अधिकारी तसेच मा.तहसीलदार यांना तात्काळ स्मशानभूमी करण्याचे निवेदन दिले होते व एका महिन्यात स्मशानभूमी न झाल्यास आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे व राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वाखाली 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला होता.
यावर मा.प्रांत अधिकारी अकलूज यांनी तहसीलदार माळशिरस यांना स्मशानभूमी संदर्भात कारवाई करण्याचे आदेश काढले तसेच जिल्हाधिकारी यांनी स्मशानभूमीचे प्रस्ताव मागणी केली असता.
पिरळे गावच्या सरपंच अलका नरोळे,उपसरपंच कमाल खिलारे सर्व सदस्य व ग्रामसेवक हनुमंत वगरे यांनी तात्काळ विषयाचे गांभीर्य घेत प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला.या प्रस्तावामध्ये जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी शेड,रस्ता,संपूर्ण वॉल कंपाऊंड,सुशोभीकरण,दफनभूमी सुशोभीकरण, वॉल कंपाऊंड, पाण्याची व्यवस्था,सौर ऊर्जा वरील पंप पेवर ब्लॉक,विंधन विहीर, स्मशानभूमी दफनभूमी येथे अद्यावत लाईटची सोय असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
परंतु शासनाने जवळपास एक कोटीचा निधी देऊन स्मशानभूमी हायटेक करावी अशी मागणी एन डी एम जे चे राज्य प्रसिद्धीप्रमुख व पुरोगामी महाराष्ट्राचे संपादक प्रमोद शिंदे व ग्रामस्थ करीत आहेत. स्मशानभूमी जागा पाहण्यासाठी माळशिरस गटविकास अधिकारी विनायक गुळवे साहेब पंचायत समिती विस्तार अधिकारी विठ्ठल कोळेकर हे उपस्थित होते.त्यांना उद्योजक संदीपशेठ नरोळे, ग्रामसेवक हनुमंत वगरे यांनी जागे संदर्भात माहिती दिली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस,शिवाजी लवटे पाटील,दत्तात्रेय लवटे,तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील, ग्रामसेवक,कर्मचारी अनिल वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.जागे संदर्भात संजय पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

सदर स्मशानभूमी संदर्भात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल ने बातमी प्रसिद्ध केली होती

You may have missed