विश्वसम्राट बळीराजा मिरवणूकीचे उद्या 15 वे वर्ष
विश्वसम्राट बळीराजा मिरवणूकीचे यंदा 15 वे वर्ष
पुणे (प्रतिनिधी )पुणे-सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि बळीराजा गौरवसमिती,पुणे तर्फे दरवर्षी बलिप्रतिपदा दिनी दि.28ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथे महात्मा फुले वाडा(समता भूमी) ते लाल महाल अशी बळीराजा ची भव्य मिरवणूक काढली जाते
यंदाचे हे 15 वे वर्ष आहे.सदर मिरवणूकीत
दरवर्षी प्रमाणे हमाल पंचायत चे डॉ.बाबा आढाव यांचे शुभहस्ते फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून नंतर बळीराजाला हार घालून फळ,भाजीपाला,
धनधान्याने, सजविलेल्या बैल गाडीतून धनधान्य फळे,भाजीपाला, वाटत वाटत फुले वाडा ते वस्ताद लहुजी साळवे तालीम कडून,लाल महाल पोहचणार आहे..लाल महालातील मॉं जिजाऊ साहेब यांना बळीराजा झालेले रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल.त्यानंतर समारोप होताना प्रबोधन पर भाषणे आणि पानसुपारी चा कार्यक्रम होईल.
तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्यने या विश्वसम्राट बळीराजा मिरवणुकीत सामील होऊन ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो ,तसेच नव्या रूपातील वामनी विचार गाडण्यासाठी नक्की सहभाग घ्यावा आणि आपल्या परिसरात बलिप्रतिपदा दिनी खरा शेतकरी राजा बळीराजा यांची सर्वत्र भव्य मिरवणुक काढावी असेआवाहन प्रा.प्रतिमा परदेशी, तोडकर,किशोर ढमाले,सचिन बगाडे, आकाश ढोक,प्रतीक परदेशी यांनी केले आहे