Blog

सरकारचं दिवाळीत ₹२१०० खास गिफ्ट, कुणाला होणार फायदा? किटमधील २५ वस्तूंची यादी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यात यावर्षीअनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाने अगदी झोडपून काढले होता.लाखो नागरिकांचे नुकसान आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहेत. अक्षरशः अनेकांचे संसार वाहून गेले आहेत.सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार माजला होता. १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीकाठच्या जवळपास ११ हजार ८०५ घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक वस्तू वाहून गेल्या. अन्नधान्यांचे नुकसान झाले. या नागरिकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या नागरिकांना शासनाकडून जीवनावश्यकवस्तूंचे किट मिळणार आहे. यामध्ये २५ वस्तू असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.दिवाळीला २१०० रुपयांच्या वस्तू भेट१८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु आहे. त्याआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आ हेत. मात्र, अजूनही पंचनामे सुरु आहेत त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दिवाळी चांगली जावी, यासाठी काही वस्तू पूरग्रस्त नागरिकांना दिल्या जाणार आहेत. या वस्तू २१०० रुपयांच्या असणार आहेत.पूरग्रस्त नागरिकांना दिवाळीत टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, मेणबत्ती, तेल, गहू, साखर, चने, डाळ, तेल, गूळ अशा अनेक वस्तू दिल्या जाणार आ हेत. एकूण २५वस्तू असणार आहेत. या किटची किंमती २१०० रुपये असणार आहे. याचसोबत पूरग्रस्त कुटुंबियांची दिवाळी चांगली जावी, त्यांना नवीन कपडे खरेदी करता यावे, यासाठी पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई देण्याचेही काम सुरु आहे

नातेपुते येथील सुप्रसिद्ध अजित ज्वेलर्सला आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे 
नातेपुते येथील सुप्रसिद्ध  अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ या सोने- चांदी दुकानाला विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीत-सिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. अजित ज्वेलर्स नातेपुते येथे गेली सहा सात वर्षांपसून चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यांच्याकडून चोख सोने-चांदी व ग्राहकांना चांगली सेवा दिली जाते. ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांनी नातेपुते येथे दहिगव रोडला दुसरी शाखा काढली असून या शाखेला सुद्धा चांगल्या प्रकारचा  मिळत आहे त्याच अनुषंगाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ या दुकानाला भेट दिली.तसेच मोहिते पाटील कुटुंबाकडून रुपनवर परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, राजेंद्र काकडे साहेब, डॉक्टर वाघमोडे, नातेपुते नगरपंचायतचे मा.उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, माऊली सरक, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच.अजित ज्वेलर्सचे मालक अजित रुपनवर, राजू रुपनवर, महावीर रुपनवर, तसेच रुपनवर परिवाराच्या वतीने विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –
उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ” स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषयावर प्रा.डॉ.सी.एम साळुंखे यांचे व्याख्यान झाले. UNESCO (युनेस्को) च्या यादीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांची माहिती प्रा.डी.एस थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. तसेच गड किल्ल्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन महाविद्यालयात करण्यात आले. “शहीद भगतसिंग जयंती” निमित्त त्यांच्या जीवनावर प्रा.तेलसंग एच.बी यांनी आपले विचार मांडले. “स्वच्छ नारी सशक्त परिवार” कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रूग्णालय, नातेपुते यांच्या सहकार्याने मुलींची ब्लड तपासणी करण्यात आले. तसेच २ ओक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त प्रा.एम.बी सावंत यांचे व्याख्यान घेण्यात आले. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या अध्यक्षा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल च्या सदस्या मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील,महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक मा.डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, मा.सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब निकम अध्यक्षस्थानी होते. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीशचंद्र मुळीक,प्रा.उत्तम सावंत यांनी परिश्रम घेतले.तसेच प्रा.डॉ.सुनिता सूर्यवंशी, प्रा.श्रीकांत पवार, प्रा.डॉ. डी.जी. शहाणे, प्रा.डॉ.संभाजी बनसोडे, प्रा.अजित भोपळे,प्रा.वैभव गवळी,प्रा.डॉ.कमल कांबळे, सौ.मंगल पवार,कु.दिपाली मसुगडे, प्रा.रेडेकर, मुख्यलिपिक हनुमंत वाघमोडे,श्री.नागराज करपे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सावधान आता पावसानंतर अजून एक संकट महाराष्ट्रावर येणार चक्रीवादळाची ‘शक्ती’ धडकणार;मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते पुढील काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मुसळ
पुढील चार दिवस हवामान खात्याने म राठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली आहे.
५ ऑक्टोबर रोजी पालघर ठाणे, नाशिक धुळे नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. तर परभणी, हिंगोली, धाराशिव लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना, नंदुरबार जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी पालघर,
संगरा 20 पथ हेत विभासन्यू म्हणून
धार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपले. गा वागावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. शेत पाण्याखाली गेली. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ही सगळी परिस्थिती आटोक्यात येते ना येते तोपर्यंत चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्धात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात शक्ती नावाची चक्रीवादळ सक्रिय झाले असून कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आहेत.
ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर मुंबई, रायगड, पुणे, सात  ारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जा लना, जळगाव या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे. ८ ऑक्टोबर रोजी परभणी हिंग  ोली तसेच रत्नागिरी सातारा सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्याला येलो अलर्ट आहे.

जि प शाळा पिरळे येथील माजी मुख्याध्यापक दादासाहेब साळवे डी.एस फाउंडेशन यांच्या वतीने 23 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संच भेट

 पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री दादासाहेब साळवे सर (D. S. फाउंडेशन) यांच्या वतीने विजयादशमी निमित्ताने जि प शाळा पिरळे येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  23 नवनीत शिष्यवृत्ती प्रश्न संच  विद्यार्थ्यांसाठी मोफत देण्यात आले नेहमीच डी एस फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कॉलरशिप पुस्तक संच दिले जातात दादासाहेब साळवे हे सध्या पाठक वस्ती या ठिकाणी कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग असतो. तसेच पिरळे येथील प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच संदीप शेठ नरोळे यांनी सुद्धा 6500 रुपये शिष्यवृत्ती व पुस्तक संचासाठी भेट दिले. पिरळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार/मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीने व शिक्षण समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी जि प शाळेच्या मुख्याध्यापक मोरे मॅडम, माजी सरपंच संदीप नरोळे, अशोक आप्पा तोडकर, अध्यक्ष सुदाम बुधावले, उपाध्यक्ष श्री पांडुरंग कोकरे सामाजिक कार्यकर्ते अमोल वाघ, शिक्षक संजय ढवळे सर,हनुमंत फुले सर,शेंडगे मॅडम,राऊत मॅडम, शिंदे मॅडम,अमोल खरात सर, उदयसिंह पाटील सर, यांच्यासह सर्व स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

भारतीय महिला क्रिकेट संघाने सुद्धा पाकिस्तानला धूळ चारली

: भारतीय महिला संघाने पाकिस्तानला आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात दणदण-ीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तान संघाला १५९ धावांवर सर्वबाद केलं आणि शानदार विजय मिळवला. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, भारताने आता पाकिस्तानला पराभूत करून आपली बिजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या विजयासह, भारताने सलग १२ व्यांदा पाकिस्तानला पराभूत करून आपला विक्रम कायम ठेवला आहे. यासह, विश्वचषकात पाकिस्तान महिला संघावर सलग पाचवा विजयमिळवला आहे.भारतीय संघाने पाकिस्तानवरविजय मिळवल्यानंतर हरमनसह संपूर्ण संघ थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाला. यासह आशिया चषकातील सामन्यांप्रमाणे महिला विश्वचषकातही भारताच्या महिला संघाने पाकिस्तानी संघातील खे-ळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तर नाणेफेकीदरम्यानही हरमनप्रीत कौरने फातिमा सनाशी हस्तांदोलन केलं नाही, ना नजरानजर झाली. नाणेफेकगमावल्यानंतर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत २४७ धावांवर गारद झाला. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी महिला संघ ४३ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला आणि टीम इंडियाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.भारताने दिलेल्या २४८ धाब-पंच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली आणि २६ धावांत त्यांनी तीन विकेट गमावल्या. यानंतर, सिद्रा अमीनने एका टोकाला पाय घट्ट रो-वून ठेवत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण दुसन्या टोका-कडून नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. या सामन्यात सिद्रा अमीन-ने १०६ चेंडूत ८१ धावा केल्या. दरम्यान, आठ पाकिस्तानी खेळाडूंना डाबात दुहेरी आकडा गाठता आला नाही. नाणेफेक गमावून प्रथम फलंद-जीला उतरल्यानंतर, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मानधना तिच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकली नाही आणि २३ धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्याने भारताच्या धावांची गती कमी झाली. त्यानंतर प्रतिका रावल ३१ धावा करत बाद झाली. हरलीन देओलने काही शानदार फटके खेळले पण ती ४६ धावांवर बाद झाल्याने तिचं अर्धशतक हुकलं. दीप्ती शर्मानेही चांगली सुरुवात केली, पण ती २५ धावांवर बाद झाली. स्नेह राणाने देखील चांगले फटके खेळले. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने २० चेंडूत ३५ धावांची दमदार खेळी करत भारताला २४७ धावांपर्यंत पोहोचवलं.

मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा ‘बॉम्ब’; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

 महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क : प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार, उद्योजकांसह, छोट्या व्यापाऱ्यांनाही ग्राहकांना शॉक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

 https://youtu.be/y_WCsuCMnQU?si=diHmnC-yVLoDIMB6

दिवाळीच्या तोंडावर महावितरणनेवीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल; सणसुदीत खरेदी-खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भारही जोडला गेला आहे.१ ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. १ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे. १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, ही दरवाढ येत्या काही महिन्यांतही सुरूच राहील. महावितरणचे म्हणणे आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.घरगुती ग्राहकांवर असा पडणार भार श्रेणी        प्रति युनिट – इंधन समायोजन शुल्क बीपीएल        १५ पैसे१ ते १०० युनिट        ३५ पैसे१०१ ते ३०० युनिट        ६५ पैसे३०१ ते ५०० युनिट        ८५ पैसे    ५०१ पेक्षा जास्त        ९५ पैसेइलेक्ट्रिक वाहन चार्जिंग महागणार, शेतकऱ्यांनाही बसणार फटकाइलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता चार्जिंगसाठी प्रति युनिट ४५ पैसे अधिक द्यावे लागतील. मेट्रो व मोनोरेलसाठी ४५ पैसे प्रति युनिट अधिक द्यावे लागणार. शेतकऱ्यांनाही वीज दरात प्रति युनिट ४० पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.उद्योजक -व्यापाऱ्यांवर दुहेरी मार : उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना या वीज दरवाढीचा दुहेरी मार सहन करावा लागणार आहे. संपलेल्या ३० सप्टेंबर रोजीच ‘कुसुम घटक ब’ साठी निधी उभारण्यासाठी राज्य सरकारकडून औद्योगिक व व्यापारी वीज दरावर ९.९० पैसे प्रति युनिट एवढा कर लावला होता. आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी प्रति युनिट ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट एवढा इंधन समायोजन शुल्क लादण्यात आला.

नातेपुते येथील शेंडगे कापड दुकान होलसेल टेक्स्टाईल मार्केट या भव्य दोन मजली कापड दुकानाच्या उद्घाटन दिनांक 9/10/2025 रोजी संपन्न होत आहे.आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏


https://youtu.be/y_WCsuCMnQU?si=diHmnC-yVLoDIMB6


आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क 9975903040 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल ला लाईक👍🏻 शेअर💫 आणि सबस्क्राईब 🛎️करा🙏

राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार पंजाबराव डख

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –


गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने विराम घेतल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला होता. या काळात अनेकांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आणि कापणीची तयारी करण्यासाठी वेळ मिळवला होता. मात्र, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार ही शांतता अल्पकालीन ठरणार असून ४ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळणार आहे. या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असून त्यांना आपल्या पिकांच्या सुरक्षिततेबाबत नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हाकार्यकारणी शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौक येथील मराठी पत्रकार संघात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी नूतन कार्यकारणीची घोषणा केली. सचिवपदी एनडीटीव्हीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सौरभ वाघमारे, चिटणीस दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक शिराळकर, सरचिटणीस बी. आर. न्यूज चॅनेलचे आदित्य केंगार, उपाध्यक्ष दैनिक विश्ववार्ताच्या श्रुती माने – गांधी, आणि पुढारी न्युज चैनलचे सोलापूर जिल्हाप्रतिनिधी अनिकेत गायकवाड, सहसचिव इन सोलापूर न्यूजचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे, कार्यकारणी सदस्य दैनिक आरंभचे अर्जुन घोडके तर साहिल माने यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवडी करण्यात आली.यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी सागर सुरवसे,  एबीपी माझाचे प्रतिनिधी अफताब शेख, व्हिडिओ जर्नालिस्ट विजय आवटे, लोकशाही न्यूज चॅनेलचे वसीम अत्तार, अय्युब कागदी, मुजम्मील शहानूरकर आदींची उपस्थिती होती.

संजय राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात: “बाळासाहेबांच्या मृत्यूची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल”

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होते, मात्र ते आता गरळ ओकत आहेत, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काही लोक त्यांची विटंबना करत असून, याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.संजय राऊत म्हणाले की, “ज्या माणसाला (रामदास कदम) पक्षाने १२ वर्षे विधान परिषदेवर पाठवले, विरोधी पक्षनेतेपद आणि मंत्रिपद दिले, त्यांनी अशी विधाने करताना लाज बाळगली पाहिजे. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना भरपूर संधी दिली.”बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण करून देत राऊत म्हणाले, “जेव्हा बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होतो. आम्ही काही मोजकेच लोक तिथे होतो. रामदास कदम तेव्हा कुठे होते?”राऊत यांनी पुढे म्हटले की, “उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, पण महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकत आहे.”या सर्व आरोपांवर अधिक माहिती देण्यासाठी आज दुपारी १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद होणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. “पद आणि पैशासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हे रामदास कदम यांनी दाखवून दिले आहे,” असे ते म्हणाले.एकनाथ शिंदे आणि इतर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जे लोक भाजपच्या चरणी विलीन झाले आहेत आणि अमित शहांच्या ‘जोड्यांची’ शस्त्र म्हणून पूजा करत आहेत, ते कधीही बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानू शकत नाहीत.” “आम्ही अजून जिवंत आहोत आणि पुढे काय करायचे ते आम्ही पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.