Blog

बुद्ध जयंती निमित्त साई सेवा दल यांच्यावतीने आसू येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जयंती निमित्त साई सेवा दल यांच्यावतीने आसू येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न  

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )बुद्ध  जयंतीचे औचित्य साधून तसेच कोरूना प्रादुर्भावत रक्तपुरवठा कमी होत असल्याने साई सेवा दल बहुउद्देशीय संस्था व सिद्धार्थ तरुण मंडळ आसू यांच्या वतीने मौजे असू तालुका फलटण येथील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन गावचे आसू गावचे सरपंच महादेव सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  दिप गंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक अजयशेठ फराटे,भाजप चे युवा नेते विशाल सिंह माने- पाटील,  ग्रा.पं. सदस्य राजेंद्र गोफणे, नितीन गोडसे, जमीर महात,उपसरपंच धनंजय घोरफडे, साई सेवा दलाचे संस्थापक गुरू कर्चे, सोमा भोसले, राहुल रणदिवे, विशाल भुसारे, शाखा कर्चे, नाना सोरटे, adv. जीवन पवार, पत्रकार अविनाश जाधव अजित निकम तसेच साई सेवा दल व सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नातेपुते येथील मधुर मिलन कार्यालय ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून जोर जबरदस्ती केली जातेय -दोशी कुटुंबीयांचा प्रशासनावर आरोप..

 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रतिनिधी )मधुर मिलन हे नातेपुते नजीक मांडवे हद्दीतील प्रसिद्ध असे दोन एकरात मोठे मंगल कार्यालय आहे. तसेच हे मंगल कार्यालय अभिजित दोशी व ऍड.दिपक फडे यांच्या मालकीचे आहे. हे मंगल कार्यालय गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना पेशंट विलगीकरण करण्यासाठी प्रशासनाने देखभाल दुरुस्ती तसेच भाडेतत्वावर ताब्‍यात घेतले होते.कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने इमारत अभिजित दोशी यांच्या ताब्यात दिली होती.परंतु कोणत्याही प्रकारचा इमारत वापरल्याबद्दल मोबदला व देखभाल दुरुस्ती शासनाने दिली नाही तसेच याहीवर्षी कोरोनाची दुसरी लाट आली व प्रशासनाने जोर जबरदस्तीने कोरोना पेशंट विलगीकरण करण्यासाठी इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु या इमारतीत सध्या अभिजीत सनद कुमार दोशी व त्यांचे नातलग वास्तव्यास आहेत. हे प्रशासनास माहित असून देखील प्रशासनाने जोर जबरदस्तीने त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध कार्यालय ताब्यात घेतले आहे व त्या मंगल कार्यालयाला बाहेरून कुलूप लावले आहे.असा आरोप अभिजीत सनद कुमार दोशी कुटुंबियांकडून होत प्रशासनावर आहे. दोशी कुटुंब याचं म्हणणं असा आहे कि आमच्या मंगल कार्यालयात लाखो रुपयांची झाड आहेत.गेल्या वर्षी या झाडांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .प्रशासनाने लाईट बिल सुद्धा दिला नाही आम्ही स्वतःच्या पैशाने लाईट बिल भरून ही झाडे जगवली आहेत.काहीही झालं तरी आम्ही ही आमच्या मालकीची इमारत प्रशासनाला देणार नाही  प्रसंगी आम्ही अमरण उपोषणास बसू अशी भूमिका अभिजित दोशी व कुटुंबीयांनी घेतली आहे.यावर मा. तहसीलदार यांनी सांगितले की ही इमारत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात दिनांक 18/4/2020 रोजी कोरोना संपेपर्यंत अधिग्रहित केली आहे इमारत कोरोना साठी वापरण्यास बंधनकारक आहे लाईट बिल भाडे संदर्भात वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे जेव्हा पैसे येतील तेव्हा देऊ त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे अशाप्रकारे मा.तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी भूमिका मांडली आहे. यावर अभिजित दोशी  यांनी भूमिका मांडली की जर प्रशासनाने जोर,जबरदस्ती केल्यास दोशी कुटुंब मधुर मिलन मंगल कार्यालयात अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. यावर दोशी कुटुंब व प्रशासन यांच्यामध्ये मंगल कार्यालयवरून वाद निर्माण झाला आहे.

मधुर मिलन कार्यालय ताब्यात घेण्यासाठी  प्रशासनाकडून जोर जबरदस्ती  केली जातेय -दोशी कुटुंबीयांचा प्रशासनावर आरोप..

ज्येष्ठ पत्रकार प्रसाद जोगळेकर काका यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)

अकलूज ता. माळशिरस येथील पुरोगामी विचारांचे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रसाद जोगळेकर काका यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.साप्ताहिक गावकुसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली होती. राज्यातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याची वरदायिनी असलेल्या उजनी पाणी प्रश्नावर त्यांनी आज (मंगळवार दि. २५ मे २०२१) सायंकाळी ५ वा. त्यांनी एक व्हिडिओ वार्तापत्र बनवले. त्यानंतर मित्रांशी गप्पा मारत असतानाच सायं ५.२५ वा. त्यांना अचानक चक्कर आली व ते कोसळले. मित्रांनी त्यांना ताबडतोब अकलूज येथील कार्यालयातून डॉ. देवडीकर यांच्या रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. माळशिरस तालुक्याने एक हरहुन्नरी पत्रकार गमावला असल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

उल्हासनगर 2 येथे शिवबा मोफत अन्न छात्रालय चे उदघाटन संपन्न रोज मिळणार पाचशे ते हजार लोकांना जेवण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (संदेश भालेराव कल्याण)

साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान, संत रोहिदास महाराज समाज प्रबोधन मंडळ, व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा यांच्या आयोजनाचे
. दि.२०/०५/२०२१ पासुन शिवबा मोफत अन्न छात्रालय सर्व सामान्य गोरगरीब जनते साठी सुरू झाले असून तर लाॅकडाऊन सुरळीत होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालु असेल.
मार्च २०२० पासुन ते आजतागायत कोरोना सारख्या महामारीमुळे अनेकांचे काम धंदे सुटले आहेत व अनेक परिवारात उपासमारी ची वेळ आली असून एक वेळचे जेवणाची सुध्दा सोय होत नसल्याचे निदर्शनास येताच साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान,
नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस ठाणे जिल्हा,
,संत रोहिदास महाराज समाज सेवा मंडळ ,अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्गीय शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटना मंत्रालय संघटनांनी मिळुन वस्तु स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत घेऊन शिवबा मोफत अन्न छात्रालय उल्हासनगर २ येथील महात्मा गांधीनगर या परिसरात सुरू करण्यात आले आहे.
तरी शिवबा मोफत अन्न छात्रालय चे उदघाटन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके सर
,रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.अण्णासाहेब रोकडे,
समाज सेविका दिपश्रीताई माने-बलखंडे,मंत्रालय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष मा.भारतजी वानखडे, ॲड.स्मिता गोरे,लताताई पडणार,वं.ब.आ.उल्हासनगर शहर अध्यक्ष रेखाताई उबाळे, किरणजी पडवळ, प्रफुल्ल केदारे, एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिशजी सोनवणे ,
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे,
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश मा.शशिकांत वाघ, एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सचिव विनोद एस .रोकडे,एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सहसचिव सुनिलजी ठेंगे ,
एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेशजी भालेराव, एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली शहर जिल्हाअध्यक्ष ॲड.प्रविणजी बोदडे,
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सचिव संदीपजी घुसळे ,संघटक कुशल निकाळे.,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके सर यांनी समस्त दानशूर दात्यांना जे शक्य होईल ती मदत या शिवबा मोफत अन्न छात्रालयाला पुरविण्याचे आव्हान केले आस्ता
ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटनेने विशेष सहकार्य केले
जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी काबंळे,
क.डो.जिल्हाअध्यक्ष प्रविणजी बोदडे,
यांच्या सयोजनाने
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश यान्ही सुध्दा विषेश सहकार्य केले
अध्यक्ष बंदिश सोनवणे व मुंबई ठाणे प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे , कल्याण ग्रामीण अध्यक्ष नितेश गायकवाड एन.डी.एम.जे.
यांच्या संयोजनांने,

तसेच सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी
साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रकाश सोमनाथ जाधव, उपाध्यक्ष पप्पू जाधव, कार्याध्यक्ष दादु चव्हाण, नितीन जाधव, संदिप गवळी,आदर्श कांबळे, प्रविण लोंढे,बबलु कांबळे, राजेश जाधव, यांनी अथक परिश्रम घेतले

नातेपुतेकरांच्या सेवेसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान च्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू

नातेपुतेकरांच्या सेवेसाठी नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दलाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू

नातेपुतेकरांच्या सेवेसाठी नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान च्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू बाबाराजे देशमुख व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

-नातेपुते ता.माळशिरस परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची दवाखान्यात येण्यासाठी गैरसोय होत आहे व ॲम्बुलन्स साठी रुग्णांना जास्त पैसे मोजावे लागतात गरीब आणि गरजू रुग्णांची पैशावाचून हेळसांड होऊ नये यासाठी.साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या ऍम्ब्युलन्स सेवे चे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे व मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले.यावेळी,ॲडवोकेट शिवाजी पिसाळ पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अतुल शेठ बावकर,विशाल साळवे, धनाजीराव पांढरे, दादासाहेब लांडगे ,साई सेवादल अध्यक्ष गुरु कर्चे ,रंजीत काळे,सोमनाथ भोसले व मान्यवर उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस कल्याण पुर्व मध्ये थाटात झाला संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव कल्याण –

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर १० मे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह आनंदवाडी कल्याण पुर्व संचिव विनोद श्यामसुंदर रोकडे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच कल्याण डोंबिवली शहर जिल्हा मा.महासचिव विजयजी कांबळे नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस चे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष ॲड.प्रविणजी बोदडे यांच्या सौजन्याने मिलिंद नगर आनंदवाडी मधील गरजुना शिधा वाटप आयोजन करण्यात आले वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनीलजीं भगत यांच्या हस्ते गरजूंना शिधा वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित ठाणे जिल्हा महासचिव बी.आर.गायकवाड तसेच जेष्ठ मार्गदर्शक अकुंशजी बंचुटे व ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राजेश्री ताई बोदडे(समाजसेविका)सतेच ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्लाय असोसिएशन कल्याण OHE शाखेचे अध्यक्ष सुनीलजीं ठेंगे, धनंजय सिंग, एन डी एम जे क.डों.शहर जिल्हा सचिव संदिपजी घुसळे ,
ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव,
क.डों.श.जिल्हा संघटक कुशलजी निकाळे, तसेच पदाधिकारी नथुराम मोहिते,अविनाश बावस्कर,राखीताई कानडे, निर्मलाताई ठाकुर ,बाळू कुडवे, यांच्या उपस्थित व मिलींद नगर आनंदवाडी प्र.९४ संघटना श्रावस्ती बुध्द विहार कमिटी, समता मित्र मंडळ,संघर्ष मित्र मंडळ,साई श्रध्दा मित्र मंडळ ,वंचित बहुजन आघाडी वार्डतील सर्व कार्यकर्ते व महिला आघाडी यांनी मोलाचे सहकार्य केले

संभाजी फुले गुरुजींनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )-
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक तथा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आणि सोसायटी व्हा चेअरमन संभाजी फुले गुरुजी यांची कन्या स्नेहल हिच्या वाढदिवसानिमित्त दहिगाव ता माळशिरस येथील बावन्न चाळ, गोडसेवस्ती, फुलेवस्ती,दणाणेवस्ती दहिगाव मधील ६० कुटूंबांना कोरोना या महामारीच्या काळात गोरगरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांना वाफेचे मशीन शिवप्रसाद दूध संघाचे चेअरमन शरद बापू मोरे यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून प्राथमिक शिक्षक संभाजी फुलेसर यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला आहे. वाफेचे मशीन वाटप प्रसंगी
संभाजी फुले यांनी स्वच्छता,मास्क, सँनेटायझर, सोशल डिस्टन पाळण्याचे आवाहन केले .
यावेळी सर्व ग्रामस्थांना काळजी घेण्याची आणि ग्रामस्थांना कसलीही अडचण आली तर निश्चितच मदत केली जाईल असेही शरद मोरे यांनी सांगितले.
यावेळी मेजर राजेंद्र हिवरकर, मेजर दादा केंगार, किरण गोडसे,भारत फुले,सोमनाथ शिंदे,वैभव मोरे,राजेंद्र कांबळे,पोपट भगत,भाऊसाहेब फुले, राम माने उपस्थित होते
.

फुले गुरुजींनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
शिवप्रसाद दूध संघाचे चेअरमन शरद बापू मोरे यांच्या हस्ते वाफेचे मशीन वाटप

नातेपुते येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते

नातेपुते ता.माळशिरस येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. नातेपुते येथील श्रीराम मंदिरात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कोरोना काळातील चे सर्व नियम,अटी पाळून शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बालभारती चे सदस्य व इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप़संगी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास संशोधकांच्या व शिला लेखांच्या आधारे तीन जन्मतारखा होत आहेत. शिवजयंती हा विषय स्मरणाचा आणि उत्सव साजरा करण्याचा आहे .शिवजयंती साजरी केल्याने एक वेगळाच उत्साह जीवनात कार्य करण्याची प्रेरणा मिळते. नातेपुते शहरात 1 रुपया वर्गणी पासून आपण सर्वांनी शिवजयंती सुरू केली आहे. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्याचे कारण म्हणजे इंग्रजांचे राज्य होते. समाज संघटीत करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांची  गरज होती. राष्ट्रीय उत्सव म्हणून यामध्ये जन्मतारखेचा विषय येऊ शकत नाही. राष्ट्रकार्यासाठी वाहून घेणारा तरुण तयार व्हावा, व वैचारिक प्रबोधन व्हावे, प्रबोधन व्हावे, त्यानिमित्ताने जनआंदोलन सुरू व्हावे या माध्यमातून मानवी जीवन मूल्य उजळून निघत असतात. शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक सुनील राऊत यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष किशोर पलंगे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. या समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे , विश्व हिंदू परिषदेचे गणेश पागे,धनंजय पवार, राहुल पद्मन, एकनाथ ननवरे ,शशिकांत कल्याणी, महेश बडवे, मंगेश दीक्षित, अमर भिसे, किरण टकले, शक्ती पलंगे, गिरीश पैठणकर, आप्पा लांळगे, रुपेश इंगोले, मुकुंद बंदिष्टे, विवेक राऊत, गौरव पैठणकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

नातेपुते येथे शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.याप़संगी प्रतिमापूजन करताना प्रशांत सरूडकर व इतर मान्यवर दिसत आहेत.

नातेपुते येथील पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात मुस्लिम बांधवांच्या वतीने छ.संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

नातेपुते येथील पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात मुस्लिम बांधवांच्या वतीने छ.संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- नातेपुते येथील पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात रमजान ईद, संत बसवेश्वर जयंती,अक्षय तृतीया चे औचित्य साधून व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  हे प्रतिमा पूजन राष्ट्रीय समाज पक्षाचेअल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा प्रभारी शाहिद मुलाणी,हाजी बशीर भाई मुलाणी, मराठा सेवा संघाचे  सामाजिक कार्यकर्ते प्रणव थोरात, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज आत्तार,जमीर मुलाणी, सलिम मुलाणी, फोंडशिरस येथील मशीदेचे धर्मगुरू, यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी साहेब मुलानी यांनी हिंदू-मुस्लीम भाई भाई चा संदेश दिला. तसेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाचा पत्रकार प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांच्या वतीने सन्मान करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते नातेपुते मल्टीस्पेशालिटी अँड कोविंड हॉस्पिटल चे उद्घाटन


 पुरोगाम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)नातेपुते तालुका माळशिरस येथे नातेपुते मल्टीस्पेशलिटी हाॅस्पिटल &कोवीड सेंटरचे उद्घाटन सोलापुर जिल्ह्याचे पालकमंञी मा ना श्री दत्ताञय भरणे मामा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदचे मा. उपाअध्यक्ष मा श्री शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख हे होते .या वेळी माजी विधान परिषद आमदार अँड रामहरीरूपनवर, राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ कृषी उत्पन्न  बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे , प्रांत अधिकारी श्रीमती शमा पवार मॅडम तहसीलदार जगदीश, नायब तहसीलदार देशमुख साहेब,टविकास अधिकारी स्मिता पाटील एपीआय मनोज नवलकर ,आरोग्य अधिकारी डाॅ रामचंद्र मोहिते ,पंचायत समिती चे सदस्य अजय सकट ,माऊली पाटील,गौतम माने, राष्ट्रवादी युवक ता अध्यक्ष अक्षय भांड,विद्यार्थी ता अध्यक्ष ईद्रजीत रूपनवर, राष्ट्रवादी ता युवती अध्यक्ष अँड किर्ती पालवे,सोमनाथ पिसे यांच्या सह नातेपुते सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, उंबरे दहिगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर,भांब चे सरपंच पोपट सरगर,मारकडवाडीचे सरपंच अमित वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत डाॅ ए पी वाघमोडे,प्रा ढोबळेसर,डाॅ रूपेश माने,डाॅ हणुमंत माने,नितीन माने एम डी सर यांनी सिनिटायझर व मास्क देऊन केले. डाॅ स्मिता वाघमोडे यांनी प्रास्तावीक तर ह.भ.प अमोल सुळ यांनी सुञचांलण केले.

पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे  यांच्या हस्ते नातेपुते मल्टीस्पेशालिटी अँड कोविंड हॉस्पिटल चे उद्घाटन
कोविंड सेंटर उद्घाटनप्रसंगी माजी विधान परिषद आमदार रामहरी रुपनवर मान्यवर आदि
मेडिकल स्टोर चे फीत कापताना पालक मंत्री दत्तात्रय भरणे मामा
रुग्णांची विचारपूस करताना पालकमंत्री भरणे मामा
प्रांत अधिकारी शमा पवार मॅडम यांची कोविंड सेंटर ला भेट
तहसीलदार जगदीश निंबाळकर साहेब यांची कोविंड सेंटरला भेट

You may have missed