प्रख्यात समाजसेवक अॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस थाटात संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संदेश भालेराव- महाराष्ट्र तील कर्तव्यनिष्ठ व्यक्ती, संकट काळी पीडितांच्या मदतीला धाव घेणारे, गरजूंना मायेचा हाक देणारे, अन्याला वाचा फोडणारे, मरेल पण अन्याय-अत्याचाराच्या घटनेत कधीही तडजोड न करणारे, कुठल्याही अमिषाला कधीही बळी न पडणारे, सर्व धर्म समभाव अशी भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे, महाराष्ट्र तील अभ्यासू व्यक्तिमत्व, सामजिक पत्रकारितेमध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे, स्वबळावर पत्रकारांची टीम निर्माण करणारे, सोशल न्युज नेटवर्क च्या माध्यमाने सरकार ला धारेवर धरणारे कर्तव्य निष्ठ पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव
तसेच आपल्या लेखणी ने भ्रष्ट अधिकारी यांची झोप मोडणारे कार्य सम्राट आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीज चे राज्य महासचिव आपल्या कार्याने ने ओळखले जाणारे, मानवधर्म पाळून लोक हित जपणारे, शेकडो हृदयाचा पाठीराखा, अन्याय अत्याचार ग्रस्त पत्रकारांच्या व वंचित समाजातील गरजु पिडीतांच्या हाकेला धाव घेणारे कायदेतज्ज्ञ सुधारित ॲक्ट्राॅसिटी ॲक्ट २०१५ चे जनक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार, कला क्षेत्रात बदल घडवणारे कर्तव्य निष्ठ आमचे आदर्श गरजू वंतांना प्रगतीचे मार्ग धाकवणारे , महाराष्ट्र तील नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे राज्य महासचिव अॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.
अॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो ! आयुष्याच्या या पायरीवर त्यांच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येवो, त्यांच्या इच्छा, आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे, यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय धार्मिक, व्यापार , कला क्षेत्रात प्रगती होवो तसेच तयांच्या कडून शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे थोर विचार समाजात रुजवावे व आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच तथागता चरणी मंगलमय सदिच्छा व्यक्त करत राज्यच न्हवे तर संपूर्ण देशातुन समाजमाध्यमांवर शुभेच्छाचा वर्षाव होत होता.
कल्याण पश्चिमेतील सावित्रीबाई फुले सभागृहात त्याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखिल आयोजित करण्यात आला होता. याला नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क वंचित बहुजन आघाडी नॅशनल रेल्वे यूनियन चे कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य एन डी एम जे राज्य समन्वयक रमाताई आहिरे
एन.डी.एम.जे. मुंबई ठाणे प्रदेशचे पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष बंदिश सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, संघटक शशिकांत वाघ तसेच ठाणे जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष प्राध्यापक बनसोडे सर, जिल्हा सचिव विनोद रोकडे, जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे, जिल्हा संघटक संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली एन. डी.एम.जे.
अध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, सचिव संदीप घुसळे, संघटक कोंगळे, कल्याण पुर्व अध्यक्ष जितेंद्र बुकाने आणि
पत्रकार मंडळी डॉ.आदर्श भालेराव, राहुल सावंत, प्रमोद सावंत, गायक व कवी दिलीपनंद गायकवाड, गौतमराजे कायदेतज्ञ ॲड.अनिल काबंळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम बद्ध वंदना घेउन आणि वाढदिवसाचा केक कापुन शाल व फुलांचा गुछ देऊन वाढदिवस संपन्न झाला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, काव्य, गायन,चारोळी व प्रबोधानपर भाषने सुद्धा झालीत.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शहापुर तालुक्यातील कार्यकारिनि तयार करून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटना तयार करून दिलीप थोरात, गुरुनाथ कशिवले,सागर रोकडे अन्य कार्यकर्त्यां ना नियुक्तीपत्र दिले
व सुञसंचालक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी मधुकर घुसळे (गीत सोनिया चि उगवली सकाळ फेम )यांचे चिरंजीव एन डी एम जे कल्याण डोंबिवली सचिव संदीप घुसळे यांनी केले आपल्या काव्य च्यां माध्यमातून ॲड.डॉ.केवल उके साहेबांन चा वाढदिवसा चा कार्यक्रम संपन्न झाला.