प्रमोद शिंदे

रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवा निमित्त दिली सदिच्छा भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी श्री गाणेशोत्सवानिमित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळो बिहार राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची भाजपने पक्ष प्रभारी म्हणून महत्वपूर्णज जबाबदारी दिल्याबद्दल ना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

बिहार निवडणुकीसंदर्भात चर्चा करताना नामदार रामदास आठवले व विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणीस

कोरोना अमृत व्यक्तीवर स्वतःतहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले अंत्यसंस्कार

कोरोना अमृत व्यक्तीवर स्वतःतहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले अंत्यसंस्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)इंदापूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून त्यामध्ये एका व्यक्तीचा कोरोना covid-19 ने मृत्यु झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली यावर इंदापूर तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ.सोनाली मेटकरी मॅडम यांनी स्वतः रात्री एक वाजता स्मशानभूमी मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांच्या सोबत त्या मृत व्यक्ती वरती अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तिच्या नातेवाईकांचा मॅडमचे आभार मानण्यासाठी फोन आला असता त्यांचा चांगला समाचार तहसीलदार मेटकरी मॅडम यांनी घेतला.
याअगोदर गेल्यावर्षी चिखली येथील निरा नदी पात्रात सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी येथील इसम पाण्याच्या पुरात अडकली होती. तेव्हा देखील तत्परता दाखवून तहसीलदार सोनाली मेटकरी मॅडम यांनी पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या सहकार्याने यंत्रणा लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले होते.या कोरोना काळातही चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळून आपले कर्तव्य चोख बजावल्यामुळे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोना मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांनी संदेश दिला की PPE किट घालून मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करावेत PPE कीट घातल्यानंतर कसल्याही प्रकारचा धोका नाही स्वतःच्या नातेवाईकाचा अंत्यसंस्कार केल्यानंतर समाधान वाटते त्यांनी प्रशासनासोबत येऊन यात सहभागी व्हावे. यामुळे प्रशासनाचा भार ही कमी होईल.

अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा- सोशल मीडियातून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा- सोशल मीडियातून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –अभिनेता-दिग्दर्शक मुळशी पॅटर्न मधील खलनायक भाईचा बड्डे गीत फेम अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर संविधानाचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्याची सोशल मीडियातून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी होत आहे. अभिनेता प्रवीण तरडे यांनी स्वतःच्या घरी गणेश उत्सव साजरा करताना पुस्तक बाप्पा ही संकल्पना घेऊन गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना केली परंतु हि प्रतिष्ठापना सर्वश्रेष्ठ भारतीयांची अस्मिता असलेले भारतीय संविधानावर लाकडी पाट ठेऊन त्यावर श्रीगणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल केल्यामुळे ते भलतेच अडचणीत सापडले आहेत. भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संविधानाला आपली अस्मिता समजतात गणेश मुर्ती संविधानावर बसवल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सोशल मीडिया वरती प्रवीण तरडे वरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माफीचा व्हिडिओ व्हायरल करून समस्त जनतेची माफी मागितली आहे. परंतु माफी मागितल्यानंतर कार्यकर्ते प्रवीण तरडे ला माफ करणार का?व गुन्हा दाखल करणार का? हे येणारा काळच ठरवेल.

अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा सोशल मीडिया वरून मागणी
सोशल मीडियातून प्रवीण तरडे यांचा निषेध होत असलेले पोस्ट व्हायरल
प्रवीण तरडे यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका
प्रवीण तरडे नी अखेर घेतली माघार समस्त भारतीयांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे मागितली माफी
माफी मागितल्यानंतर ही तरडे यांच्या वर टीका सुरू

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माऊली सरकार यांच्यावतीने जिलेबी भरून शासकीय कर्मचाऱ्यांचे केले तोंड गोड

*स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माऊली सरकार  यांच्यावतीने  जिलेबी भरून शासकीय कर्मचाऱ्यांचे केले तोंड गोड *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नातेपुते येथे  राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माऊली सरक व मित्रपरिवार यांच्यावतीने नातेपुते परिसरातील शासकीय कर्मचारी ,पोलीस स्टेशन तलाठीऑफिस,ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व इतर सामाजिक कार्यकर्ते यांना तंत्र दिनाच्या आनंदोत्सवात जिलेबी चे वाटप करून तोंड गोड करण्यात आले .यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव नितीनजी धायगुडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाहीद मुलाणी,राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अण्णासाहेब पांढरे, नातेपुते शहर अध्यक्ष अमरजीत जानकर, तसेच तानाजी बोडरे, गणेश बोडरे, उपस्थित होते.

जिलेबी वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते माऊली सर व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी

नातेपुते येथे पै.अक्षय भांड यांचे कडून जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त फोटोग्राफर यांचा सत्कार

*अक्षय भांड यांचे कडून जागतिक फोटोग्राफर  दिनानिमित्त फोटोग्राफर यांचा सत्कार*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुक्याचे युवा नेते पै.अक्षय भांड यांनी नातेपुते भांड गॅस एजन्सी येथे जागतिक फोटोग्राफी दिन साजरा करत माळशिरस तालुक्यातील  फोटोग्राफर  यांचा सत्कार केला अक्षय भांड म्हणाले की 
फोटोग्राफी ही कला आहे. सृष्टीतील सौंदर्य जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त फोटोग्रााफर यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.तसेच त्यांनी नातेपुते व नातेपुते परिसरातील सर्व फोटोग्राफर मंडळीचा सत्कार केला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून व पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी.भांड गॅस एजन्सी चे मालक आप्पासाहेब भांड ,पत्रकार प्रमोद शिंदे, प्रशांत खरात ,टोग्राफर व फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष महादेव नवगण,सचिव अविनाश लिपारे,माळशिरस तालुका अध्यक्ष ज्ञानेश निकम,जाकिर मुलाणी,महेश टोमके, प्रकाश पद्मन, राहुल बोत्रे,तुषार देसाई,हंसराज  लाळगे,मंजूर मुलाणी,सोमनाथ लाळगे,गणेश शिंदे,सुखदेव गेजगे,प्रशांत बरडकर,राहुल पिसे,सागर रिठे,राजू एकळ,प्रज्वल बोत्रे,दत्ता बोत्रे,,नवनाथ कुराडे,संजय बनकर ,सुमित जाधव, आदी भंडारे,दिपक जाधव,किरण राऊत, कार्यकर्ते उपस्थित होते.

पै.अक्षय भांड यांचे कडून जागतिक फोटोग्राफर  दिना नातेपुते परिसरातील फोटोग्राफर यांचा सत्कार

खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा एन डी एम जे चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा

खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा
नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके )महाराष्ट्रामध्ये जातिय आत्याचाराच्या प्रमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन नेहमिच खुन, जाळपोळ, सामुहिक हाल्ले या सारख्या आप्रिय घटना घडतांना दिसुन येत आहेत तसेच २३४ पेक्षा जास्त खुन महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी, बोधांचे झालेले आहेत, आनी या मध्ये बळी पडलेले सर्व पिडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत घरातिल कमावत्या व्याक्तिचा खुन झाल्या नंतर त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळतो परंतु या कुटुंबाच्या वेदना आद्याप पर्यंत या सरकारने जानुन घेतल्या नाहित ह्या सर्व कुटुंबांना घर,जमिन, नौकरी देउन पुनर्वसन करन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट नुसार बंधनकारक असुन देखिल या आघाडी सरकारच्या नाकार्तेपनामुळे हि कुटुंब आद्याप पर्यंत न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट ची योग्य अंमलबजावणी व्हावी या साठी तत्कालिन बिजेपी सरकारने तामिळनाडू सरकारच्या धरतिवर काॅटिजन्सी प्लान आकस्मिकता योजना लागु व्हावी यासाठी समिती गठीत केली होती त्या मध्ये अॅक्ट्रोसिटी तज्ञ तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे राज्य महासचिव अँड डाॅ. केवल उके साहेब यांचा समावेश करन्यात आला होता या समितीने काॅटिजन्सी प्लान चे प्रारूप सासनास सादर केले होते परंतु सत्ता पालट झाल्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात काॅन्टिजन्सी प्लान धुळखात पडला आहे, म्हनुन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या अंमलबजावणी साठी तात्काळ काॅन्टिजन्सी प्लान लागु करावा, त्याच बरोबर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करून दर तिन महिन्यानी प्रकरनांच्या आढावा घेन्यासाठी बैठका घेन्यात याव्यात, त्याच बरोबर जातिय आत्याचारात बळी पडलेल्या पिटितांना अॅक्ट्रोसिटी अॅक्ट मधिल तरतुदी नुसार एफ आय आर झाल्यानंतर आठ दिवसात आर्थसहाय्य देने बंधनकारक आसते परंतु एक वर्ष पुर्न होउन देखिल पिडितांना आर्थसहाय्य दिलेलं नाही म्हनुन हे प्रलंबित आसलेले आर्थसहाय्य तात्काळ देन्यात यावे,
मौजे नांदुसा तालुका जिल्हा हिंगोली येथिल आल्पवईन मुलिचा गळा कापुन निर्घुन खुन केला होता सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन सदर खटला जलदगती न्यायालयात चालऊन आरोपिला दोन महिन्याच्या आत फाशी देन्यात यावी, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या आमलबजावनी साठी समंध महाराष्ट्रामध्ये उपविभागिय स्तरावर उपविभागिय दक्षता व नियंत्रन समित्या गठित करन्यात याव्यात, पिडित व साक्षिदारांच्या आधिकारांची आमलबजावनी करन्यात यावी, दोषसिद्धीसाठी सर्व गंभिर प्रकरनांमध्ये विषेश सरकारी वकिलांच्या नेमनुका करन्यात याव्यात आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतिने हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या शाल्यय शिक्षनमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे आहे जर वरिल मागन्यांची शासनाने पुर्तता तात्काळ न केल्यास जिल्ह्यामध्ये संचारबंदी आसतांना लाॅकडाउनच्या काळात उद्या दिनांक 19/08/2020 रोजी तहसिल कार्यालय औंढा नाग समोर तिव्र आंदोलन करन्याचा इशारा देन्यात आला आहे या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, जिल्हासंघटक विजय दिपके, राहुल पुंडगे, संतोस उत्तमराव सोनुळे, कचरू चव्हान यशवंत पंडित, ईत्यादी पदाधिकारी ऊपसस्थित होते…

माळशिरस येथे स्वातंत्र्य दिन व वामन दादा कर्ङक यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

*माळशिरस येथे स्वातंत्र्य दिन व वामन दादा कर्ङक यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप* 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) – माळशिरस  नालंदा बुद्ध विहार  येथे  भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच भिम शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिध्दार्थनगर येथे आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धांईजे यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील शाहीर लोक कलावंत  यांना  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात आले. हे वाटप राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर तसेच आंबेङकरी चळवळीच्या कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उत्तमराव जानकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोककलावंत शाहीर यांनी स्वरचित कोणावरती व  भीम गीते सादर करून शाहिरी जलसा सादर केला यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, पांडुरंगतात्या वाघमोङे जेष्ठ नेते अशोकबापु धाईजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट,माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत,नगरसेवक भगवान थोरात,विशाल साळवे,रणजीत कसबे ,प्रदिप धाईजे,लोकशाहिर जितेंद  धाईजे, रणजित धाईजे,बाळु काटे,किरण धाईजे, तसेच माळशिरस तालुक्यातील  लोककलावंत शाहीर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष किशोर धाईजे,युवक अध्यक्ष बुध्दभूषण धाईजे ,बुध्दभूषण बनसोङे, अतुल धाईजे  अनिल धाईजे यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे आयोजन विकास दादा धाइजे यांनी केले होते तसेच हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करून करण्यात आला.

महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढेंचे नाव काळ्या आक्षराने लिहिल्या जाईल… जगदीप दिपके एन डी एम जे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष

महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढेंचे नाव काळ्या आक्षराने लिहिल्या जाईल असे मत जगदीप दिपके यांनी व्यक्त केले

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दलित समाजातील कार्यकर्ते नाराज होत असल्याचं दिसून येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून दलित नेत्यांची सामाजिक न्याय मंत्री सक्रिय नसल्याबाबत व्यक्त होत आहे नाराजी सोशल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली( मोहन दिपके) –बोद्ध दलित आदिवासींवर होनार्या आत्याचाराच्या प्रमानात मोठ्या प्रमानात वाढ झालेली असुन खुन, जाळपोळ, बलात्कार, सामुहिक बलात्कारांच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमानात वाढ झालेली आसतांना सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढे मुग गिळुन गप्प बसलेले आहेत, दलित आत्याचाराऊन त्याना काही देन घेन नसल्यासारख ते वागतायत..
सामाजिक न्यायमंत्री पदाचा पदभार घेऊन येवढे दिवस होउन देखिल दलित आदिवासी बोद्धांवर आत्याचार होउ नये म्हनुन त्यांच्याकडुन कोनत्याही ठोस उपाय योजना झालेल्या नाहित, कदाचित त्या उपाययोजना दलित आदिवासी बोद्धांवर होनार्या आत्याचाराचं प्रमान वाढावं यासाठी ईच्छापुर्वक केल्या नसाव्यात….
खरोखरच दाईच्या आनी माईच्या प्रेमात खुप मोठे अंतर आसते रिपाई चे राष्ट्रिय सरचिटनिस माझी सामाजिक न्याय मंत्री आविनाशजी माहातेकर साहेब यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या कार्यकाळात बोद्ध दलित आदिवासींवर आत्याचार होउ नये म्हनुन पोलिस आधिक्षक, पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस आधिकार्यांच्या बैठका घेउन फक्त दोन महिन्याच्या कार्यकाळात कडक पावले उचलली, आज पर्यंत अनेक मंत्र्यांना पाच पाच वर्ष मंत्रीपद भोगुन जे जमले नाही ते अविनाश महातेकरांनी दोन महिन्याच्या कार्यकाळात करून दाखवले होते, आज लाॅकडाउनच्या काळात बोद्ध दलित आदिवासींवर आन्याय आत्याचाराने थैमान माजवलेले आसतांना सध्याचे सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंडे व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजात कदम यांना आत्याचाराचे काही देने घेने नाही आसेच दिसुन येत आहे, दररोज खुन, बलात्कर, जाळपोळ आनी सामुहिक हाल्ले होत आहेत संपुर्न महाराष्ट्राने बिड जिल्ह्यातिल पारधी समाजातिल तिहेरी हात्याकांड, विराज जकताप खुन प्रकरन, औरंगाबाद जिल्ह्यातिल भिमराज गाकवाड यांची गळा कापुन हात्त्या करून त्यांच्या आई वडलांवर जिवघेना हाला, हिंगोली जिल्ह्यातिल प्रियंका काबळे यांची गळा कापुन हात्त्या आशी कितितरी मानुसकिला काळिमा फासनारी खुन प्रकरन सबंध महाराष्ट्रातिल जनतेने उघड्या डोळ्याने पाहिली आहेत परंतु एकाही पिडित कुटुंबाला वरिल दोन्ही मंत्री महोदयांनी भेट दिली नाही, किंवा पोलिस प्रशासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला कोनत्याही सुचना दिल्या नाहीत, दलित आदिवासिंवर होनार्या आत्याचारांची रक्तरंजित मालिका उघड्या डोळ्यानं पाहुन हातावर हात देउन बसन्याचं काम सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढे यांनी केल आहे या वेतिरिक्त कोनत्याही उपाय योजना त्यांनी केल्या नाहित..
खुन, जाळपोळ, बलात्कार, सामुहिक हाल्ले या सारख्या गंभिर प्रकरनात पिडितांना पाहाजे आसा विषेश सरकारी वकिल देता यावा वेळो वेळी विविद्ध आयोग, प्रशासकिय व न्यायालईन पातळीवर पाठपुरावा करता यावा व आरोपिंना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी आर्थसहाय्य सामाजिक न्याय विभागामार्फत देन्यात येते परंतु हे सर्व आर्थसहाय्य एफ आय आर झाल्या नंतर आठ दिवसाच्या आत देन्यात यावे आशी कायद्यात तरतुद आहे व ते पिडितांचे आधिकार आहेत, परंतु आरोपिंना शिक्षा होऊ द्यायची नाही आरोपी सहज सुटले पाहिजेल म्हनुन मागिल एक वर्षापासुन एकाही पिडितांना आर्थसहाय्य देन्यात आलेलं नाही, पिडितांच्या आधिकारांची आमलबजावनी होत नाही तरी सामाजिक न्याय मंत्री कोनतिच अॅक्शन घ्यायला तयार नाही म्हनुन सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढेंचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या आक्षराने लिहिल्या जाईल यात शंकाच नाही शिवाय सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढे व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजात कदम हे दोन्ही मंत्री बौद्ध, मातंग, चर्मकार, दलित आदिवासी समुदायातिल नाहित म्हनुनच आम्ही म्हनतो दाईच्या आनी माईच्या प्रेमात जमिन आसमानचा फरक आहे

वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी अकलूज बस डेपो याठिकाणी डफली बजाओ आंदोलन

वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी अकलूज बस डेपो याठिकाणी डफली बजाओ आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (अकलूज) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बससेवा सुरू करून जनतेचे जीवन पुर्वरत पद्धतीने सुरळीत करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज बस डेपोसमोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ८०% लोकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, १५% लोकांमध्ये त्या तयार होतायेत. त्यामुळे सरकारने उर्वरित ५% लोकांना शोधून त्यांची काळजी घ्यावी परंतु त्यासाठी ९५% लोकांना वेठीस धरू नये. लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे, सर्वसामान्यांचे रोजगार बंद पडल्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे अशावेळी जनतेला कोरोनापेक्षा पोटाच्या प्रश्नाची अधिक चिंता आहे.
सदर आंदोलन हे जनतेसाठी असुन सर्वसामान्यांचे रोजगार व दैनंदिन जीवन सुरू झाले पाहिजेत. प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून सार्वजनिक वाहतूक सुरू करून जनतेचे जीवन सुरळीत करावे असे मत वंचितचे माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज कुमार यांनी व्यक्त केले. परिवहन सेवा म्हणजे लालपरी ही सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा घटक असुन लॉकडाऊनच्या काळातही याच लालपरीने संतांची पालखी पंढरपूरला आणली होती त्यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करून लॉकडाऊन संपवावा अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा ईशारा वंचितचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी दिला. या आंदोलनामुळे सरकारचे डोके ठिकाणावर येईल त्यासाठी डफली जोरात वाजवून आम्ही सरकारला जागे करत असल्याचे मत विजय बनसोडे यांनी व्यक्त केले. सरकारने याची दखल त्वरित न घेतल्यास पुढील आंदोलन अजुन तिव्र करण्यात येईल अशी भावना संदीप घाडगे यांनी व्यक्त केली. आंदोलनाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनील ओव्हाळ यांनी करून आंदोलनाची रूपरेखा स्पष्ट केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज कुमार, माळशिरस तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, गोपाळ घार्गे-देशमुख, विजय बनसोडे, माळीनगरचे सरपंच अभिमान जगताप, संदीप घाडगे, चंदनशिवे सर, सुनील ओव्हाळ, ऍड.भोसले, प्रदीप झेंडे, आकाश जगताप, जितेंद्र साळवे, सुरज वाघंबरे, सागर जगताप, प्रकाश दनाने, बाळासाहेब गायकवाड, मिलन धाइंजे, बंटी चंदनशिवे, अमोल भोसले, सुरज लोंढे, साबळे, गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एम पि एस सी च्या आॅनलाईन परिक्षेला एन डी एम जे चा विरोध

एम पि एस सी च्या आॅनलाईन परिक्षेला एन डी एम जे चा विरोध

उच्च न्यायालयाच्या प्रबंधकाकाकडे एन डि एम जे ची आॅफलाइन परिक्षेची मागनी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दीपक)-सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) त्याच्या मार्फत घेन्यात येनार्या सर्व परिक्षा आॅनलाईन पद्धतिने घेन्याचे ठरवले आहे…
आॅनलाईन परिक्षापद्धत मोठ्या प्रमानात धोक्याची असुन त्यामध्ये फ्राॅड होन्याची दाड शक्यता आसल्याने व एखांद्या कंपनिला टेंडर देउन त्यांच्या मार्फत परिक्षा घेने घटनाबाह्य आसुन या आॅनलाईन पद्धतीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होन्याची शक्यता आसल्याने या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेन्यात येनार्या आँनलाईन परिक्षापद्धतिच्या विरोधात आम्ही असुन या पद्धतिचा आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस च्या वतिने जाहिर निषेध करतो अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके यांनी म्हनटले आहे… व या संदर्भात मुंबई उच्चन्यायालयाच्या प्रबंधकांना निवेदन दिले आहे सदर निवेदनामध्ये आॅनलाईन परिक्षा पद्धत व्हेरिफायबल नाही यामध्ये झालेला फ्राॅड पडताळुन पाहता येत नाही…
आॅफ लाईन ला सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका शेफ राहतात आनी विषेश म्हनचे ह्या सर्व उत्तरपत्रीका सि सि टि व्ही कॅमेर्याच्या कक्षेत राहतात… आनी आर टि आय मध्ये विद्यार्थ्याला कोनाचिही उत्तरपत्रिका सहज मिळु शकते… त्याच बरोबर आँनलाईन परिक्षा घेत आसतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग एखांद्या कंपनीला परिक्षा घेन्याचे टेंडर देनार व ज्या कंपनिने टेंडर घेतले ती कंपनी परिक्षेच सर्व कामकाज पाहनार मुळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची निर्मीतिच परिक्षा घेन्यासाठी झालेली असुन परिक्षा घेने हे आयोगाचे मुलभुत काम आहे ज्या कामासाठी आयोगाची निर्मिती घटनेने केली आहे तेच मुख्य काम आयोग झुगारुन लावतोय, आनी ज्या कंपनीला काॅन्ट्रक्ट दिलाय ती कंपनी फ्राड करनार नाही याची जबाबदारी कोन घेनार आॅनलाईन परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सर्वरवरच डायरेक्ट बदलता येते व बदललेली उत्तर पत्रिका कशी कळणार त्याच बरोबर आँनलाईन परिक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला फक्त त्याचीच उत्तरपत्रिका मिळते ईत्तर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका मिळनार नाही आनी आॅफलाईन परिक्षे मध्ये कोनत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आर टी आय मध्ये मिळते म्हनजेच इथे right to information चे देखिल आयोग हानन करित आहे, आॅफलाईन परिक्षे मध्ये उत्तर पत्रिका बदलता येत नाही त्या सुरक्षित असतात, त्यांच्यावर पर्वेक्षक व विद्यार्थ्यांच्या स्वक्षर्या असतात शिवाय सर्व उत्तरपत्रिका सि.सि.टि.व्ही. कॅमेर्याच्या कक्षेत असतात म्हणून त्या मध्ये फ्राॅड करने खुप अवघड आसते,
तसेच आयोगाने तिनलाख प्रश्र्नांची कोष्शन बॅक तयार करून ति सिस्टीमवर राहील व ती ईनक्रिप्टेड आसेल परंतु ज्या यंत्रनेकडे त्या कोष्शन बॅक ची सेक्युरीटी आहे त्यांनिच फ्राॅड केला तर म्हनुन प्रत्यक परिक्षेच्या वेळस १०० प्रश्न काढुन ते सुरक्षित ठेवन सोपं की तीनलाख प्रश्न सांभाळुन ठेवनं सोप्प आहे, या सर्व बाबी संशस्पद आसुन गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतात म्हनुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेन्यात येनार्या परिक्षा आॅफलाईन घेन्यात याव्यात व जर आयोग आॅनलाईन परिक्षा घेन्यावरच अवलंबुन आसेल तर ती परिक्षा घेत आसतांना व्हि व्हि पॅड प्रनालीची वेवस्था करावी अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने मुंबई उच्चन्यायालयाचे महाप्रबंधक, व राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे तहसिलदार औंढा नागनाथ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले युवा जिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके कचरू बळिराम चव्हान ईत्यादी पदाधिकार्याच्या स्वाक्षर्या आहेत….

You may have missed