खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा एन डी एम जे चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा
खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा
नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके )–महाराष्ट्रामध्ये जातिय आत्याचाराच्या प्रमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन नेहमिच खुन, जाळपोळ, सामुहिक हाल्ले या सारख्या आप्रिय घटना घडतांना दिसुन येत आहेत तसेच २३४ पेक्षा जास्त खुन महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी, बोधांचे झालेले आहेत, आनी या मध्ये बळी पडलेले सर्व पिडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत घरातिल कमावत्या व्याक्तिचा खुन झाल्या नंतर त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळतो परंतु या कुटुंबाच्या वेदना आद्याप पर्यंत या सरकारने जानुन घेतल्या नाहित ह्या सर्व कुटुंबांना घर,जमिन, नौकरी देउन पुनर्वसन करन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट नुसार बंधनकारक असुन देखिल या आघाडी सरकारच्या नाकार्तेपनामुळे हि कुटुंब आद्याप पर्यंत न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट ची योग्य अंमलबजावणी व्हावी या साठी तत्कालिन बिजेपी सरकारने तामिळनाडू सरकारच्या धरतिवर काॅटिजन्सी प्लान आकस्मिकता योजना लागु व्हावी यासाठी समिती गठीत केली होती त्या मध्ये अॅक्ट्रोसिटी तज्ञ तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे राज्य महासचिव अँड डाॅ. केवल उके साहेब यांचा समावेश करन्यात आला होता या समितीने काॅटिजन्सी प्लान चे प्रारूप सासनास सादर केले होते परंतु सत्ता पालट झाल्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात काॅन्टिजन्सी प्लान धुळखात पडला आहे, म्हनुन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या अंमलबजावणी साठी तात्काळ काॅन्टिजन्सी प्लान लागु करावा, त्याच बरोबर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करून दर तिन महिन्यानी प्रकरनांच्या आढावा घेन्यासाठी बैठका घेन्यात याव्यात, त्याच बरोबर जातिय आत्याचारात बळी पडलेल्या पिटितांना अॅक्ट्रोसिटी अॅक्ट मधिल तरतुदी नुसार एफ आय आर झाल्यानंतर आठ दिवसात आर्थसहाय्य देने बंधनकारक आसते परंतु एक वर्ष पुर्न होउन देखिल पिडितांना आर्थसहाय्य दिलेलं नाही म्हनुन हे प्रलंबित आसलेले आर्थसहाय्य तात्काळ देन्यात यावे,
मौजे नांदुसा तालुका जिल्हा हिंगोली येथिल आल्पवईन मुलिचा गळा कापुन निर्घुन खुन केला होता सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन सदर खटला जलदगती न्यायालयात चालऊन आरोपिला दोन महिन्याच्या आत फाशी देन्यात यावी, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या आमलबजावनी साठी समंध महाराष्ट्रामध्ये उपविभागिय स्तरावर उपविभागिय दक्षता व नियंत्रन समित्या गठित करन्यात याव्यात, पिडित व साक्षिदारांच्या आधिकारांची आमलबजावनी करन्यात यावी, दोषसिद्धीसाठी सर्व गंभिर प्रकरनांमध्ये विषेश सरकारी वकिलांच्या नेमनुका करन्यात याव्यात आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतिने हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या शाल्यय शिक्षनमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे आहे जर वरिल मागन्यांची शासनाने पुर्तता तात्काळ न केल्यास जिल्ह्यामध्ये संचारबंदी आसतांना लाॅकडाउनच्या काळात उद्या दिनांक 19/08/2020 रोजी तहसिल कार्यालय औंढा नाग समोर तिव्र आंदोलन करन्याचा इशारा देन्यात आला आहे या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, जिल्हासंघटक विजय दिपके, राहुल पुंडगे, संतोस उत्तमराव सोनुळे, कचरू चव्हान यशवंत पंडित, ईत्यादी पदाधिकारी ऊपसस्थित होते…