सत्यशोधक चळवळीचे रघुनाथ ढोक सर वाढदिवस विशेष
रघुनाथ श्रीरंग ढोक हे माण(वावरहिरे) व नातेपुते चे रहिवाशी असून त्यांचे बालपणीचे शिक्षण वावरहिरे,नातेपुते,चंद्रपुरी व पुणे माध्यमिक तसेच कॉलेज शिक्षण बीकॉम व नुकतेच 25 वर्षानंतर एम ए मराठी पूर्ण केले आहे.गेली अनेक वर्षांपासून पुणे येथे रहात आहेत.ते गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र परिसरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन, मुद्रणम्हर्षी डॉ प.भ.कुलकर्णी,अखिल भारतीय माळी प्रबोधन शिक्षण संस्था व इतर संस्थेचे माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांना विविध संस्थेचे पुरस्कार मिळाले असुन मानाचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेने सामाजिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील 15 ऑगस्ट 2018 रोजी पालकमंत्री व अन्नपुरवठा मंत्री खा.गिरीष बापट यांचे शुभहस्ते व महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांचे उपस्थित दिला होता.तसेच ते पंढरपूर येथे समता पुरस्कार, पुणे येथे सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.सद्या त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय, धर्मीय,स्वजातीय,घटस्फोटीत, विधवा,बीजवर,आंतरराष्ट्रीय व दिव्यांग असे 20 सत्यशोधक विवाह मोफत स्वखर्चाने अनेक ठिकाणी जाऊन लावले.त्या मध्ये बरेच सत्यशोधक विवाह त्या त्या भागात पहिले होते.तसेच या कोव्हिडं 19 मध्ये देखील 5 सत्यशोधक विवाह बाहेर गावी जाऊन देखील लावले आहेत.
ते पुणे येथे पुणे विध्यार्थी गृह इजि. कॉलेज मध्ये नोकरी करीत असून संस्थेचे पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील काम करीत सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांनी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले रंगीत पुस्तक मराठी ,हिंदी,इंग्रजी सिक्कीम चे राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील तर जर्मन नांदेड विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.विद्या सागर व महापौर आणि मान्यवरांचे उपस्थित लेखक म्हणून प्रकाशित केले तसेच दीनांची साउली,विध्येची अधिष्ठात्री सावित्रीबाई फुले,व इतर पुस्तके प्रकाशित केली आहेत.दरवर्षी गरीब ,गरजू,गुणवंत विध्यार्थ्यांनचा सत्कार करीत असतात तसेच मान्यवरांचे देखील सन्मान करीत असतात.त्याचप्रमाणे ते महात्मा फुले यांचे वेशभूषेत बरेच ठिकाणी सहभाग घेतात तसेच दिवाळीमध्ये बळीराजा भूमिकेत ईडा पिडा टळो बळीच राज्य येवो या साठी सहभाग घेत असतात.ते फुले शाहु आंबेडकर यांचे कृतिशील पाईक असून ते अंधश्रद्धा, कर्मकांड यातून सर्व समाजाला बाहेर काडून विवाह प्रसंगी नाहक आर्थिक उधळपट्टी करून कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रयत्न करीत असतात तसेच ते विवाह देखील जमवितात.दरवर्षी सर्व समाजातील विधवा,घटस्फोट, व विधुर वधु वर यांचा मोफत मेळावे घेत असतात.त्यांनी पहिल्यादा हरियाणा कुरुक्षेत्र येथे सावित्री जोतिबा ग्रंथलयास गेल्या वर्षी छगन भुजबळ यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने थोरसमाज सुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचे 3 पुटी फायबर चे पुतळे स्वखर्चाने 72 ग्रंथ भेटीसह पुण्यातून अनेकांना रेल्वेने स्वखर्चाने नेऊन तिकडे चांगला प्रथमच असा कार्यक्रम केला.तर त्यांनी आपले गावी मोफत सत्यशोधक सर्व समाजाचे विवाह लावणेसाठी वधु वर यांचे काही साहित्य,तसेच साऊंड सिस्टीम सर्व आधुनीक सोयीस्कर अशी सोयीसह सोय केली आहे.कारण माण चे लोकांनी विवाह वर होणारा खर्च त्यांनी वधु वर यांचे भविष्यासाठी वापरावा हा उद्देश असून त्या ठिकाणी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,थोरसमाजसुधारक महात्मा फुले,स्त्री शिक्षणाचे जननी सावित्रीबाई फुले ,भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 पुटी फायबर चे पुतळे बसवून स्मारक केले आहे त्याचे उदघाटन झाले नसले तरी त्या ठिकाणी विवाह व इतर सत्यशोधक कार्य होत आहेत त्यासाठी त्यांनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र यांची निर्मिती केली आहे. सर्वाना आपलेशे वाटावे असे काम केले असले तरी सर्व समाजाने त्याचा फायदा ग्यावा अशी अपेक्षा आहे.समाजाचे काहीतरी देणे आहे आणि मानवनिर्मित जात मोडीत काडून सर्व स्त्री पुरुष समान आहेत फहक्त सर्वांनी मानवताधर्म पाळावा असे त्यांना नेहमी वाटते.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊ या.
त्यांना आजच्या 1 ऑगस्ट 2020 दिनी वाढदिवसाच्या …तर्फे हार्दिक शुभेच्छा.
पत्रकार संपादक प्रमोद शिंदे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क9975903040