राष्ट्रीय ओबीसी बीग्रेड संघटने च्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड
राष्ट्रीय ओबीसी बीग्रेड संघटने च्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड
प्रतिनिधी नातेपुते – ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मूलभूत प्रश्नासाठी सदैव लढा देणारी राष्ट्रीय ओबीसी बिग्रेड या संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय श्री किशोरजी शेटे सर यांनी पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड केलेली आहे आप्पासाहेब कर्चे गेली 15 वर्ष मनसेच्या माध्यमातून समाजसेवेचे व राजकारणाचे काम करीत आहे तसेच लोणारी समाज सेवा संघाचे स्टार प्रचारक व रवींद्र भाऊ धंगेकर युवा मंच संस्थापक अध्यक्ष या माध्यमातून त्यांचा तरुण युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे त्यांची काम करण्याची पद्धत व व सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका अन्यायावर तुटून पडणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे ओबीसी समाजाच्या राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड संघटने ची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येत आहे या निवडी दरम्यान आप्पासाहेब कर्चे बोलताना म्हणाले ही संघटना माननीय किशोर जी शेटे सर विद्याताई आदमाने मॅडम काकासाहेब बोराडे निर्मलाताई कदम ज्ञानेश्वर काळे मल्लिनाथ चौधरीसाहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र भर युवा आघाडी जाळे उभारून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अशा प्रकाराचे काम उभा करून एक आदर्श संघटने समोर उभा करीन व त्यासाठी सदैव प्रामाणिकपणे काम करीन